✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दिशा : फ्रान्झ काफ्का

म
महासंग्राम यांनी
Mon, 11/28/2016 - 13:45  ·  लेख
लेख
दिशा : मूळ कथा फ्रान्झ काफ्का अगदी छोटीशी असलेली गोष्ट काफ्का ने १९१७ ते १९२३ दरम्यान लिहिली गेल्याचं मानलं जातं, पण काफ्का जिवंत असतांना हि प्रकाशित होऊ शकली नाही. काफ्काच्या मृत्यूपश्चात १९३१ साली The Great Wall of China (German: Beim Bau der Chinesischen Mauer) या कथासंग्रहात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. ------------------------------------------------------------------------------------------------------------ "हे जग दिवसेंदिवस लहान होत चाललं आहे." दुःखी चेहऱ्याने उंदीर म्हणाला. आधी तर हे जग किती मोठं होतं, तेव्हा मला खूप भीती वाटायची. मी कायम इकडून-तिकडे धावत असायचो आणि शेवटी मला आजूबाजूला भिंती दिसायला लागल्या, तेव्हा तर मला खुप आनंद झाला होता". "पण या लांबच लांब भिंती खूपच वेगाने एकमेकींकडे वेगाने ओढल्या जात आहेत ना कि क्षणात मी भिंतीच्या शेवटच्या टोकाला पोहचलो पण, जिथे पिंजरा ठेवला आहे आणि मी तिकडे ओढल्या जातो आहे." "तुला फक्त दिशा बदलायची गरज आहे, बस्स." मांजर म्हणाली आणि त्याला खाऊन टाकलं. पूर्वप्रकाशित : ब्लॉग आणि Franz kafka- मराठीमधे या फेसबुक ग्रुपवर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
3240 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

+१

वरुण मोहिते
Mon, 11/28/2016 - 14:03 नवीन
बाकी द कंप्लिट नॉवेल ऑफ फ्रान्झ काफ्का वाचून पहा सुचवेन . नुसत्या द ट्रायल या कथेमध्येच कितीतरी लघुकथांची बीजे सापडतील .
  • Log in or register to post comments

सुचवणीबद्दल धन्यवाद, नक्कीच

महासंग्राम
Mon, 11/28/2016 - 14:09 नवीन
सुचवणीबद्दल धन्यवाद, नक्कीच वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

रूपकात्मक कथा आवडली. राज्य

एस
Mon, 11/28/2016 - 14:04 नवीन
रूपकात्मक कथा आवडली. राज्य (State) हे स्वातंत्र्यावर वेगवेगळ्या मार्गाने निर्बंध कसे आणते हा Anarchism चा पुरस्कार करणाऱ्यांचा अभ्यासाचा विषय आणि पाया आहे.
  • Log in or register to post comments

मंदार,

जयंत कुलकर्णी
Mon, 11/28/2016 - 14:09 नवीन
मंदार, छोट्या गोष्टीत अर्थ बरोबर लागण्यासाठी काही शब्दांचे आयोजन करावे लागते. किंवा काही वाक्ये तोडावी लागतात किंवा काही शब्द टाकावे लागतात. उदा. आधी हे जग किती मोठं होतं. तेव्हा मला खूप भीती वाटायची. "पण या लांबच लांब भिंती इतक्या वेगाने एकमेकींकडे वेगाने ओढल्या जात आहेत ना कि क्षणात मी भिंतीच्या शेवटच्या टोकाला पोहचलो. पण तेथे पिंजरा ठेवला आहे आणि मी तिकडे ओढला जात आहे." "तुला फक्त दिशा बदलायची गरज आहे, बस्स." मांजर म्हणाली आणि तिने त्याला खाऊन टाकलं. हा अर्थात माझा तुम्ही मागितलेला नसताना दिलेला सल्ला आहे. मानायलाच हवा असे मुळीच नाही.... तुम्ही काफ्का वाचताय हेच माझ्यासाठी खूप आहे. :-)
  • Log in or register to post comments

काका, तुम्ही कायमच सकारात्मक

महासंग्राम
Mon, 11/28/2016 - 14:20 नवीन
काका, तुम्ही कायमच सकारात्मक आणि चांगलं सांगितलं आहे. तुमच्या कथा वाचूनच कथा वाचायची आणि अनुवाद करायची आवड निर्माण झाली. तुम्ही सांगितलेलं नक्कीच लक्षात ठेवेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

आधी हे जग किती मोठं होतं. ! *

जयंत कुलकर्णी
Mon, 11/28/2016 - 14:10 नवीन
आधी हे जग किती मोठं होतं. ! *
  • Log in or register to post comments

वाचतेय...

यशोधरा
Mon, 11/28/2016 - 14:12 नवीन
वाचतेय...
  • Log in or register to post comments

तुम्ही ही स्वतः भाषांतरीत्

मराठी_माणूस
Mon, 11/28/2016 - 14:24 नवीन
तुम्ही ही स्वतः भाषांतरीत्/रुपांतरीत केली आहे का ?
  • Log in or register to post comments

मराठी अनुवाद मी केलाय.

महासंग्राम
Mon, 11/28/2016 - 14:54 नवीन
मराठी अनुवाद मी केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा