मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला .....
Disclaimer : आमचा चहावाला आणि मोदी पूर्वी चहा विकायचे याचा काहीही नाही...
---------------------------------------------------------------------------------
मोदी सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली त्याचा सर्वात जास्त परिणाम आमच्यावर झाला .... (नोटा बदलायचा प्रॉब्लेम नव्हताच .. कारण आम्ही कायमच कॅशलेस असतो ... ) पण या निर्णयामुळे जणू चक्रीवादळच आले. थोबाडपुस्तक आणि कायअप्पा यांच्यावर मेसेजचा खच पडला. कितीही डिलिट केले तरी थांबायलाच तयार नाहीत. त्यातून हे सर्व मेसेज परस्पर विरोधी ... त्यामुळे आमच्या मनात गोंधळ मजला.
मोदींची ही कृती म्हणजे काळ्यापैशाविरुद्ध घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे की सामान्य लोकांची गैरसोय करणारा आणि प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट ? नक्की सत्य काय आहे?
रागा - केजरींनी जोरात गळा लढला होता तर भक्तमंडळींची थोपुवर जोरदार बॅटिंग चालू होती..
यातून मार्ग काढण्यासाठी न्युज चॅनेल लावला तर तेथे रणदीपसिंग सुरजेवाला नावाचा माणुस ५००, १००० ची नोट आणि P-नोट एकाच वाक्यात गुंफत होता ... त्यामुळे माहिती मिळवाचा हाही मार्ग बंद झाला ....
त्यामळे सामान्य लोकांना त्रास होतोय का ? हा प्रश्न आम्हाला सतावत होता. आमच्या गाण्याला विचारले तर त्याने मलाच प्रतिप्रश्न केला
आपण सामान्य लोक नाही?.. गण्या
हो.... तसे आपण सामान्य ... मी
आपल्याला त्रास झाला? ... गण्या
नाही ... मी
मग झालेतर ... उगाच टाइमपास करू नकोस...
पण माझे समाधान होत नव्हते...
कुठल्याही समस्येचा मुळापासुन विचार करा असे आम्हाला ऑफिस च्या एका वर्कशॉप मध्ये शिकवले होते...
पण आफिसच्या वातारवरणात मला कधीच असा विचार करणे जमत नाही ... त्यामुळे बाहेर पडलो ..
समोरच आमचा चहावाला.. मनाशी ठरवलं .. मस्त चहा घेऊ आणि याचा मुळापासुन विचार करू...
चहा घेता घेताच विचार आला .... हा चहावाला पण सामान्य माणूसच.. यालाच विसरू त्याला काही त्रास झाला का ?
मग काय ... पुढे झालो...
नमस्कार माउली ... आमचा चहावाला हा माळकरी .. त्यामुळे आम्ही त्याला माऊलीचा म्हणतो ...
नमस्कार माउली ...
आज निवांत दिसताय ..माझ्यापुढे चहाचा दुसरा ग्लास धरत माउलींचा प्रश्न...
मोदींनी लय गोची केली हो ... मी सरळ मुद्द्याला हात घेतला ....
का काय झाल ? .. माउली
५००-१००० च्या नोटा बंद केल्या की ... मी
जाऊद्या हो.. पैसे काय नंतर द्या .. माउली
नाही तस नाही.. धंद्यावर काही परिणाम ?
काही नाही ... रोजचा गल्ला घरीच ठेवायचो .. आठ पंधरा दिवसांनी बँकेत भरायचो.. आता काही दिवस पोराला सांगितलं रोज बँकेत भरायला..
दुधाचे पैसे महिन्याला देतो .. बाकीचं सामान आणतो लागलं की ...
हे सांगत असताना माउलींनी एका कडून ५०० ची नोट घेतले व सुट्टे परत केले...
मी चाटच पडलो ... माऊलींची काहीच तक्रार नव्हती..
मग खरा प्रॉब्लेम कोणाला आहे? मलाही नाही, आमच्या गण्यालाही नाही आणि माउलींनाही नाही..
कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही..
समाधानाने मान हलवली ... परत येताना माउलींच्या गाडीकडे नजर टाकली ... नेहमी प्रमाणेच गर्दी होती.. सर्व छान चालू होते.. कुणाचीच काही तक्रार नव्हती ..
परत ऑफिस आलो.. थोपु / कायप्पा वर मेसेजाचा ओघ तसाच होता.. रागा / केजरीचे रडे अजूनही थांबले नव्हते ....
आणि या सगळ्यापासून दूर .. तिकडे ते मोदी आणि इकडे आमचे माउली .. दोघेही निवांत होते...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाता जाता :
तुम्हारे महेल चौबारे , यही राहे जायेंगे प्यारे
अकड किस बात कि प्यारे
यहीं सब कुछ चुकांना है..
साजन रे झूठ मत बोलो .....
वाचने
13185
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
सहमत आहे ....
मोठ्या किंमती च्या चलनी नोटा
एक साधे तर्क शास्त्र आहे ....
In reply to मोठ्या किंमती च्या चलनी नोटा by Rajesh188
एकदम बरोबर
In reply to एक साधे तर्क शास्त्र आहे .... by मुक्त विहारि
काय विचारांची झेप? काय तो
In reply to एकदम बरोबर by Rajesh188
हो ना ....
In reply to काय विचारांची झेप? काय तो by सुबोध खरे
काचेच्या घरात वैग्रे ....
In reply to काय विचारांची झेप? काय तो by सुबोध खरे
हो....
In reply to काचेच्या घरात वैग्रे .... by सुनील
Cashless payments are growing
In reply to मोठ्या किंमती च्या चलनी नोटा by Rajesh188
अरे .. जुना धागा वर आलेला
ते स्वयंघोषित सर्वज्ञ आहेत.
In reply to अरे .. जुना धागा वर आलेला by अमर विश्वास
कदाचित,
In reply to ते स्वयंघोषित सर्वज्ञ आहेत. by सुबोध खरे
आज सकाळी, तुमचे विचार वाचले ...
In reply to अरे .. जुना धागा वर आलेला by अमर विश्वास
काल परवाच, हा विषय एका गृपमध्ये निघाला ....
खरं आहे ... माझ्याही
निश्चलनीकरणाचा मला, माझ्या
काही गोष्टी, कधीच समजत नाहीत
In reply to निश्चलनीकरणाचा मला, माझ्या by श्रीगुरुजी
नोटबंदी
In reply to काही गोष्टी, कधीच समजत नाहीत by मुक्त विहारि
मला किंवा माझ्या आजुबाजूच्या माणसांना काहीच त्रास झाला नाही ...
In reply to नोटबंदी by प्रसाद_१९८२
भ्रष्टाचाराला आळा बसला हे म्हणता येत नाही.
In reply to नोटबंदी by प्रसाद_१९८२
घरबांधणी त्यासाठी लागणारी
In reply to भ्रष्टाचाराला आळा बसला हे म्हणता येत नाही. by बबन ताम्बे
हेच म्हणतो. ज्या आवेशात
In reply to निश्चलनीकरणाचा मला, माझ्या by श्रीगुरुजी
आता दोन हजाराची नोट देखील
बंद केलेली नाही ...
In reply to आता दोन हजाराची नोट देखील by प्रसाद_१९८२
माझे मत सांगतोय..
अशा रितीने समांतर
In reply to माझे मत सांगतोय.. by गणेशा
🙏
यामुळे respect करा..
In reply to माझे मत सांगतोय.. by गणेशा
४४ लाख ८० हजार रुपये white
हे त्याच्या उत्पन्नात ऍड झाले
निश्चलीकरण कल्पना आणि
असंघटीत क्षेत्रे आणि छोटे
In reply to निश्चलीकरण कल्पना आणि by Vichar Manus
हो.
In reply to निश्चलीकरण कल्पना आणि by Vichar Manus
रोखीचे व्यवहार म्हणजे नो
कॅशचा व्यवहार जितका कमी
In reply to रोखीचे व्यवहार म्हणजे नो by अमर विश्वास
मुरखाचा बाजार आहे
नोट बंदी होणार ह्याची पूर्व
In reply to मुरखाचा बाजार आहे by Rajesh188
त्यांचे प्रतिसाद वाचले की ....
In reply to नोट बंदी होणार ह्याची पूर्व by अमर विश्वास
काय ठरलं मग?
राजेश १८८ साहेब अंतर्धान
In reply to काय ठरलं मग? by अहिरावण
हा हा हा
In reply to राजेश १८८ साहेब अंतर्धान by अमर विश्वास
प्रत्येक गोष्टीचे......