नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....)

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in जनातलं, मनातलं
5 Oct 2016 - 9:41 am

नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....)

माझा मूळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया ह्यावर बराच गदारोळ झाला आणि शेवटी तो फक्त वाचन मात्र झाला.. आता हा लेख तसाच लेखाच्या उत्तरार्धार्धात चोप्य करतोय , मिपाच्या धोरणांत बसत नसल्यास उडवून फक्त लिंक द्या (http://www.misalpav.com/node/19318)

पण आता पूल खालून बरच पाणी गेलय , लेख लिहिल्या पासून अनेक घटना पाहतोय आणि थोडा फार गंभीर होत गेलो , बोको हराम ने ओलीस धरलेल्या शेकडो मुली , इसिस ने लिलाव करत असलेल्या गतिमंद मुलींचे विडिओ , निर्भया प्रकरण , नर्स अरुणा शानबाग ह्यांचा मृत्यू , आत्ताची बोपर्डी सारखी अनेक प्रकरण आणि सैराट सारखे दुर्दैवी बळी गेलेल्या मुली

बाकी काही आशादायक प्रकार पाहून जसे कि ऑफिसात फक्त हिंदू नव्हे तर मुस्लिम आणि ख्रिस्ती मुली पण त्याच रंगाचे कपडे परिधान करतात , इतकाच काय नवरात्रीत एखादी कस्टमर व्हिसिट असेल तर त्यातल्या लेडीज पण आज कुठला रंग आहे असं विचारून त्याच रंगांचे कपडे परिधान करून येताना पाहिल्यावर आता हळूहळू हि गोष्ट वैश्विक होते आहे हे जाणवलं

आता रंगाची खरी ताकद कळतेय , ह्या रविवारी तर मुलीने बाबा तू पण गुलाबी नाही तर Violate रंगाचा टी -शर्ट घातलाच पाहिजे असं हट्ट धरून फुगून बसली तर तेंव्हा तर हसू आवरताना पंचाईत झाली

असो आता खरंच मस्त वाटत .. एकाच रंगांची न्हाऊन गेलेली सृजन सृष्टी सर्वच समाजाला शक्ती देईल आणि एक सुधृढ समाज स्थापन होईल ह्या (भाबड्या) आशावादावर नवरात्र साजरा करिन म्हणतोय __/।\__

नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा !!!

-----------------------------------------------------
मूळ लेख (2 Oct 2011)
-----------------------------------------------------

नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही !

.. कुठलीही नवी जुनी गोष्ट सांगायची तर परवा ठरलेला असतो, पण ही कालची, परवाची , तेर्वा ,एरवाची आणि येणार्‍या उद्या , परवाची पण आहे पण गोष्ट आहे असो

अहो कालचीच गोष्ट स्टेशनवर उतरलो तर समस्त स्त्री वर्ग छान पैकी हिरव्या रंगांत न्हाउन गेला होता.
सगळ्या बायका , मुलीनी छान पैकी हिरवा रंगाच्या ठेवणितल्या साड्या घातल्या होत्या. ज्याना पूर्ण पणे ह्या रंगाचे पारंपरिक कपडे घालायचे नव्हते त्यानी जीन्स आणि हिरवे टॉप घातले होते. थोडा वेळ एकदम छान वाटल. पुढे रिक्शेच्या रांगेत पुढे मागे हिरवाच रंग होता.

माझा नंबर आल्या नंतर मागच्या एक (पिवळ्या देठाचा) हिरव्या बाईने झप्कन पुढे येऊन रिक्षा पकडली , आणि माझ्या सारख्या अ-हिरव्या पामरकडे तुछ्छ कटाक्ष टाकून पुढे निघून गेल्या.

पुढे ऑफिस मध्ये पाय टाकल्या वर काळजाचा ठोका चुकला , समस्त महिला वर्ग हिरव्या रंगात तोरयात वावरत होता. काय कळेना काय चालू ते. त्यातल्याच एक जवळच्या मैत्रिणीला कॉफी पिताना जिवा-वर उदार होईन आज सगळे हिरव्या रंगात काय अस विचारताच अजुन एक तुछ्छ कटाक्ष मिळाला , तरी पण तिने दया येऊन सांगून टाकल म्हणे आजकाल नवरात्रीला एका दिवशी एक असा रंग ठरवून टाकायचा आणि त्या रंगाचे कपडे घालायचे.

एवढ कळल्यावर पुढे आणखीन काही विचारण्याच धाडस झाल नाही. पण का कोण जाणे मला अचानक अस वाटायला लागल की सतत आपल्यावर कुठल्या तरी हिरव्या रंगाची आज पाळत आहे.

लेडी बॉस (त्या पण हिरव्याच) बरोबर काही मीटिंगा फार जड गेल्या , जणू काही मला कॉर्नर करण्यात येत होत. बर कॅण्टीन मध्ये जाऊन रिलॅक्स करू तर तिकडे तोच हिरवा रंग.
आता मला अस पक्क वाटायला लागल की हे दुसर तिसर काही नसून स्त्री शक्तीचे शक्ति-प्रदर्शन आहे. एका रंगाच्या निमित्ताने का होईना सगळ्या बायका एकत्र येत आहेत.

आता आज करडा उद्या पिवळा नंतर लाल , बापरे त्यातून काही सुटका नाही , मला तर अशी भीती वाटटायला लागलये दसर्याला समस्त पुरूष वर्गाच रावण दहन होत नाहीए ना ?

धोक्याची सूचना द्यायाच काम मी केल साभाळुन राहा रे मुलानो . मित्रांनो , काका आणि मामंनो :) ह्या नऊ रात्री वैरी होऊ शकतात.
ह्या वर उपाय काय आहे हे पण सुचवा ,

माझा विचार होता की गणपतीला दहा दिवस दहा रंगाचे शर्ट आपण घालू पण बायका तेव्हा ही आपल्ल्याला बॅंड वले म्हणून हिणवु शकतात , एक बैल पोळा आहे किंवा अजुन काही सण ?

सर्व हुश्शार मिपा परिवारनानी काय ते विचार करून फायनल सांगा :) उगाच्च भोचक म्हणी जश्या खाई त्याला खवखावे , चोर की दाढी मे तिनका इत्यादी टाकु नका :)

(इथेही मिपा-कारणिना सिंगल आउट करत नाहीए)

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

विचारमंथन आवडले, पटले.

विचारमंथन आवडले, पटले.

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2016 - 10:51 am | माम्लेदारचा पन्खा

आता खरे उच्चशिक्षण मंत्री शोभता !

माझीही शॅम्पेन's picture

5 Oct 2016 - 3:41 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद माप साहेब .. शिक्षणबरोबरीनेच अनुभव हा फार मोठा गुरू आहे !!!