श्रीगणेश लेखमाला - मी वाचनवेडा
श्रीगणेश लेखमालेची कल्पना वाचून डोक्यात पहिला विचार आला, तो म्हणजे सर्वात आवडीच्या छंदाबद्दल - वाचनाबद्दल काहीतरी लिहू या. पण काय लिहिणार..? आपले वाचन वल्ली-बॅटमॅनसारखे फोकस्ड नाही, सागर भंडारे, मृत्युंजय यांच्यासारखे चौफेर नाही, सुशींच्या पुस्तकांना वाहून घेतलेल्या अजिंक्य विश्वाससारखी आपल्यात चिकाटी नाही, इंग्लिश वाचनाकडे अजून फारसे बघितलेले नाही आणि कविता-शेरोशायरीचा गंध नाही.. त्यामुळे 'नक्की काय लिहिणार?' हा प्रश्न होताच.
भेळ खाल्ल्यानंतर भेळेचा कागद वाचणे, वाचनालयातून घरी चालत येताना रस्त्यावरून पुस्तक वाचत येणे (..आणि कशाला तरी धडकणे..!), वाचनालयातून काल रात्री आणलेली दोन पुस्तके रात्रीतून संपवून सकाळी लगेचच सुजलेल्या डोळ्यांसह ती पुस्तके बदलायला जाणे, अशा बहुतेक सर्व पुस्तकप्रेमींच्या पायवाटेवरून प्रवास सुरू झाला. यानंतर कॉलेजला असताना 'शतक शोधांचे' हे पुस्तक महाग असल्याने विकत घेणे शक्य होणार नाही असे लक्षात आल्यावर, सुमारे सहा-सात महिने रोज कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून ते पुस्तक एका भल्यामोठ्या डायरीत लिहून काढणे असे उद्योगही करून झाले.
एकदाचे पुण्यनगरीमध्ये आगमन झाले आणि आता संग्रहासाठी पुस्तके घ्यायलाच हवीत अशी काहीतरी जाणीव झाली. सुरुवातीची अनेक वर्षे विंचवाचे बिर्हाड सांभाळत कॉट बेसिसवर फिरताना कपड्यांची एक बॅग आणि अंथरूण-पांघरुणाची एक बॅग यांच्यामध्ये पुस्तकांची तिसरी बॅग कधी तयार झाली, ते कळलेच नाही
आचार्य अत्रेंनी पत्रकारांना दिलेला उपदेश 'मांजरासारखे दिसेल त्या भांड्यात तोंड घालीत जा..!' मी कसोशीने पाळत मिळेल ते वाचू लागलो. त्यातही चटक लागली ती आत्मचरित्राची! बर्याच दिग्गजांची आत्मचरित्रे वाचली. अनेकदा 'हे पुस्तक आपण वाचले नसते तर खूप काही हरवले असते' अशा भावनेपासून ते 'आपण हे पुस्तक का वाचले..??' अशा वैतागापर्यंत अनेक अनुभव जमा झाले.
या दरम्यान कधीतरी शोध लागला की, रद्दीच्या दुकानात माझ्या आवडीची बरीच पुस्तके असतात.
अत्यंत दुर्मीळ, छपाई बंद झालेली आणि अमूल्य अशी पुस्तके रद्दीच्या दुकानात अक्षरशः कवडीमोल भावाने विकत मिळू लागली आणि माझ्या तिसर्या बॅगेचा आकार वाढू लागला. त्या रद्दीवाल्याला त्याच्याकडे असलेल्या खजिन्याचे बर्याचदा काहीही सोयरसुतक नसते, हेही कळले. अर्थात सगळेच रद्दीवाले इतके भाबडे नसतात, पण आपल्याकडे असलेल्या पुस्तकाची खरी 'व्हॅल्यू' न ओळखणारे रद्दीवाले जास्त भेटले.
धन्य ते पुस्तके रद्दीत देणारे लोक आणि धन्य तो रद्दीवाला, जो पुस्तके किलोवर विकतो. :)
हे रद्दीवाला प्रकरण कळल्यानंतर एका नवीन प्रकार सुरू झाला - जमेल तेव्हा रद्दीची दुकाने अक्षरशः पालथी घालणे. धूळ, माती आणि अत्यंत कोंदट जागेत दोन तीन तास ठसकत - खोकत - शिंकत शोधाशोध केल्यानंतर एखादे असे पुस्तक मिळून जाते की बस्स.. अशी अनेक अमूल्य पुस्तके संग्रहात जमा झाली.
आत्मचरित्रे, चरित्रे, इतिहास, क्रिकेट, राजकारण, पत्रकार असे अनेक विषय आणि अशा विषयांवरील मला सर्वाधिक आवडणारी कॉफी टेबल बुक्स यांमुळे संग्रह वाढत गेला.. इतकी पुस्तके आपण जमा का करतो हा प्रश्न कधीही पडला नाही आणि त्सुंडोकु फेजमध्ये प्रवेश केला. ;)
पुस्तके फक्त विकत घेणे. वाचायला कधी जमेल माहीत नाही, पण पुस्तक हातचे सोडायचे नाही असा प्रकार सुरू झाला. यथावकाश बॅगांचा आकार आणि नंतर संख्या वाढत जाऊन घरामध्ये खास पुस्तकांसाठी कपाट करावयाची गरज भासू लागली. एक ट्रेकर मित्र, जो पोटापाण्यासाठी किचन ट्रॉली वगैरे बनवतो, त्याच्या मागे लागून उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करेल असे डिझाईन मी स्वतः तयार केले. किचन ट्रॉलीचे मजबूत चॅनल आणि जड मेटल वापरून एका कप्प्यात ४० किलो पुस्तके बसतील असे १२ कप्प्यांचे भरभक्क्म रॅकही करून घेतले.
यादरम्यान जी काही पुस्तके जमवली, त्यात फारसा काही पॅटर्न वगैरे नव्हता. पण हळूहळू लक्षात आले की आपण अनवधानाने चरित्र-आत्मचरित्रे आणि त्यातही जुन्या जुन्या क्रिकेट खेळाडूंची आत्मचरित्रे जमा केली आहेत. ही पुस्तके कधी वाचली जातील कल्पना नाही; पण माझ्या पिढीचे, मागच्या पिढीचे, त्याच्यामागच्या पिढीचे शंभर-दीडशे क्रिकेटर कपाटात विराजमान झाले. एक पुस्तक तर १९०६ सालचे आहे, ज्यामध्ये त्या पूर्वीच्या इंग्लिश खेळाडूंची माहिती दिली आहे. माझ्याकडचे क्रिकेटचे सर्वात जुने पुस्तक १८९२ साली छापलेले आहे.
पुस्तके जमा करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले. "माझ्याकडे हे संग्राह्य पुस्तक आहे, पण हे तुझ्याकडे व्यवस्थित राहील" अशा भावनेने पुस्तक देणारे मित्र, "माझ्या संग्रहातली वाचून झालेली पुस्तके बिनधास्त घेऊन जा" असे म्हणणारी लीमाऊजेट, "मी इथे इथे आहे आणि हे पुस्तक समोर आहे; तुला हवे आहे का..?" असे दिवसाच्या कोणत्याही वेळी फोनवणारे मित्र, असे जवळचे लोक, तर "तुम्हाला क्रिकेटची पुस्तके लागतात तर मी ती बाजूला काढून ठेवतो" असे सांगणारे पुस्तक दुकानदार, या सर्वांनी खूप खूप प्रोत्साहन दिले.
भटकंती सुरू असताना नवीन शहरात गेले की सर्वप्रथम भेट दिली जायची ती जुन्या पुस्तकांची दुकाने आणि कुंभारवाडा. (या मातीच्या वस्तूंबद्दल नंतर कधीतरी लिहीन.)
पुस्तकांचे वेगवेगळे प्रकार कळू लागले. एकाच पुस्तकाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या वाचण्यातली मजा कळाली. आयडॉल्स, सनी डेज आणि वन डे वंडर्स असे मिळून सुनील गावसकरचे ओम्निबस पुस्तक, 'एकच पुस्तक पण वेगवेगळ्या फाँटमध्ये' असे अनेक 'सारे प्रवासी घडीचे' किंवा भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके, पुलंच्या पंचाहत्तरीनिमित्त निघालेले 'पुलं ७५' किंवा पंडित भीमसेन जोशींच्या अमृतमहोत्सवानिमित्त निघालेले 'स्वराधिराज' ही पुस्तके अक्षरशः फूटपाथवर मिळाली. अशाच एका भाग्याच्या क्षणी एका दुकानातल्या धुळकट कोपर्यात स्मरणगाथा, दुर्गभ्रमणगाथा, स्मरणे गोनिदांची, कादंबरीमय शिवकालातल्या कांही सुट्या कादंबर्या, आणि आशक मस्त फकीर अशी भारी पुस्तके मिळाली. जेआरडी टाटा, होमी भाभा यांची पुस्तके घबाड मिळावीत अशी एकदमच मिळाली.
सध्याचा दौर सुरू आहे तो पुस्तके योग्य ठिकाणी भेट किंवा वाचायला देण्याचा. पूर्वी मी पुस्तकांच्या कपाटांना कुणाला हातही लावू देत नसे. सध्या यात थोडा बदल झाला आहे. अनेक चांगली चांगली पुस्तके ज्यांना माझ्यापेक्षा जास्त उपयोगी आहेत अशा मित्रांकडे दिली जात आहेत. आर.के. लक्ष्मण यांचे 'You Said it..!' असो, इस्रायलसंबंधी काही पुस्तके त्यातल्या जाणकाराला किंवा सैन्यासंबंधी पुस्तके एका निवृत्त अधिकार्याकडे अशी 'योग्य स्थळी' पडली की खरोखरी समाधान वाटते.
एकदा सहज पुस्तके चाळताना लक्षात आले की आपल्याकडे दिग्गजांनी सह्या केलेली खूप सारी पुस्तकेही आहेत. मूळ लेखकाने त्या त्या वाचकांना ही पुस्तके भेट दिली, मात्र आश्चर्यकारकरित्या हा ठेवा रद्दी / जुन्या पुस्तकांच्या दुकानात मिळाला.
..या श्रीमंतीबद्दल खूप खूप समाधान वाटते.
माझ्या संग्रहातली स्वाक्षरी केलेली अशी निवडक पुस्तके...
१) चित्रमय स्वगत आणि कान्होजी आंग्रे - पुलं देशपांडे
२) भावीण - कविवर्य बा.भ. बोरकर
हे पुस्तक मिळाले, तेव्हा रद्दीवाल्याने मला मोठ्या आढ्यतेने "ही पुस्तके ६० रुपये किलोवाली आहेत" असे सांगितले होते.
३) ओ.पी. नय्यर
हे पुस्तक चौराकाकांना वाचायला दिले होते. परत येताना मी घेईन त्यापेक्षा जास्त काळजी घेऊन आणि कव्हर घालून आले.
४) आर.के. लक्ष्मण.
आर.के. लक्ष्मण यांची भरपूर दुर्मीळ पुस्तके मला मिळाली आहेत, याबाबत मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. एका पुस्तकात जगातल्या अनेक दिग्गजांची रेखाचित्रे आणि त्याखाली त्यांच्या सह्या छापलेल्या आहेत, एका पुस्तकात मोठे जागतिक नेते, नंतर भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महत्त्वाचे नेते, खेळाडू यांची रेखाचित्रे आहेत.
५) राऊझिंग कॉल टू हिंदू नेशन - एकनाथजी रानडे
भारतभरातील सर्वांच्या मदतीने आणि आपल्या अजोड संगटन कार्याने विवेकानंद शिलास्मारकासाठी एकनाथजींनी अनेक वर्षे अविरत कष्ट केले. मात्र त्या कार्याची अप्रत्यक्ष सुरुवात या पुस्तकाने झाली.
विवेकानंद शिलास्मारक -
६) डॉ. रघुनाथ माशेलकर (मी स्वतः प्रत्यक्ष भेटून स्वाक्षरी करून घेतलेले हे एकमेव पुस्तक.)
७) प्रभाकर जोग
८) इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स - शरू रांगणेकर
या पुस्तकात आर.के. लक्ष्मण यांची विषयानुरूप अप्रतिम रेखाचित्रे आहेत. __/\__
९) प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे
१०) आनंदवन प्रयोगवन - डॉ. विकास आमटे (हे पुस्तक भेट मिळाले आहे)
११) स्मरणे गोनिदांची - वीणा देव
१२) बी.जी. शिर्के
हे पुस्तक फक्त स्वाक्षरीसहच नाही, तर आतल्या कव्हर लेटरसह मिळाले :)
१३) एका खेळियाने - दिलीप प्रभावळकर
१४) वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे
या पुस्तकाच्या दोन प्रती आहेत. एक इंग्लिश आणि एक मराठी. इंग्लिश पुस्तकात सगळे रंगीत फोटो आहेत, तर मराठी पुस्तकात सगळे ब्लॅक अँड व्हाईट.
१५) नियतीला घडवताना... - डॉ. के.एच. संचेती
१६) नेहमी प्रेरणा देणारे, नीता गद्रे यांचे 'एका श्वासाचं अंतर'. (यांचे सुपुत्र म्हणजे आपले गवि)
(रसिक वाचकांच्या कृपेने माझ्याकडे आणखीही भरपूर स्वाक्षरीची पुस्तके आहेत. वरची यादी अगदी महत्त्वाच्या पुस्तकांची आहे)
**************************************************************
हे मी येथे का सांगत आहे..? अशी अनेक अमूल्य पुस्तके आपल्या भोवताली असतात. तुम्हीही मिळवू शकता, फक्त थोडे कष्ट आणि भरपूर चिकाटी हवी, बस्स..! :)

वाचने
24077
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
सहीच ! आत्मचरित्र मला ही
मस्त हो....
बराच ठेवा आहे तुझ्याकडे.
तुमच्या दिवसाला 40 तास असतात
In reply to तुमच्या दिवसाला 40 तास असतात by sagarpdy
हा आम्हाला माहित असलेल्या
हा फाऊल धरावा काय...
मोदकदादा __/|\__ __/|\__
मस्तच
लै भारी!
In reply to लै भारी! by पैसा
+१
In reply to लै भारी! by पैसा
+१११११११
In reply to लै भारी! by पैसा
दिलेली पुस्तके रद्दीत टाकणार्
In reply to लै भारी! by पैसा
हेच म्हणतो
एक माहिती हवी
In reply to एक माहिती हवी by इरसाल
सावध..
एवढ्या मोठ्या माणसांची
In reply to एवढ्या मोठ्या माणसांची by मृत्युन्जय
+१ अनमोल खजिना आहे तुमच्याकडे
मोदकराव
In reply to मोदकराव by बोका-ए-आझम
मला बोलव मदतीला, गोणी घेउन
क्या बात है!! मस्त लेख.
श्रीगणेश लेखमाला - मी वाचनवेडा
सायकल चालवत चालवत पुस्तक
मस्त पुस्तक संग्रह.
माझ्या रेझ्युममध्ये मी छंद -
In reply to माझ्या रेझ्युममध्ये मी छंद - by पिलीयन रायडर
+१११११. ___/\_____
खुप सही छंद आहे. रद्दीच्या
एकाच वेळी प्रसन्न आणि खिन्न करणारा लेख.
In reply to एकाच वेळी प्रसन्न आणि खिन्न करणारा लेख. by मारवा
तंतोतंत हेच म्हणतो.. अशी
In reply to एकाच वेळी प्रसन्न आणि खिन्न करणारा लेख. by मारवा
'भेट मिळालेली पुस्तकं रद्दीत
In reply to 'भेट मिळालेली पुस्तकं रद्दीत by इनिगोय
अगदी माझ्या मनातलं बोल्लात.
छान..
यांच्यामध्ये पुस्तकांची तिसरी
क्या बात है!
भेळ खाल्ल्यानंतर भेळेचा कागद
भेळ खाल्ल्यानंतर भेळेचा कागद वाचणे, वाचनालयातून घरी चालत येताना रस्त्यावरून पुस्तक वाचत येणे (..आणि कशाला तरी धडकणे..!), वाचनालयातून काल रात्री आणलेली दोन पुस्तके रात्रीतून संपवून सकाळी लगेचच सुजलेल्या डोळ्यांसह ती पुस्तके बदलायला जाणे, अशा बहुतेक सर्व पुस्तकप्रेमींच्या पायवाटेवरून प्रवास सुरू झाला.ही सुरवातीची वाक्य वाचल्यावर वाटल की जणू माझीच स्टोरी सांगतय की काय कोणी. वाचनाची इतकी भयंकर आवड आहे की आयुष्यातील पहिली (आणि शेवटची बर का) चोरी मी मित्राकडच्या आवडलेल्या आणि त्या दिवशी घरी निघावं लागल्यामुळे वाचायचे राहून गेले म्हणून केलेली पुस्तकाची. तेही वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी केलेली. अर्थात घरी आल्यावर आणि बाबांना कळल्यावर बेदम मार पडला आणि तसचं परत जाऊन पुस्तक न वाचता परत कराव लागल. तुमचं रद्दीची दुकान पालथी घालून दुर्मिळ पुस्तक जमवण आणि त्यांची लेकरासारखी काळजी घेणं बाकी खासचं. तुम्ही ती पुस्तक आता दुसर्यांना वाचायला पण देता त्यामुळे तुम्हाला भेटण आता मस्ट झालं आहे.