मी गेली ७ वर्षे विविध मराठी संस्थळे जवळून पहात आहे . त्यात काही संस्थळावर सदस्य म्हणून तर इतरत्र रोमात वावरताना मी खालीलप्रमाणे ट्रेन्ड्स किंवा आयडीज चे वर्गीकरण केले -
१. अभ्यासू व तज्ज्ञ -यामध्ये खरोखर एखाद्या विषयाचा सखोल माहितीपूर्ण अभ्यास करून विविध विषयावर लेख लिहिणारे . उदा. आर्किओलॉजी / टेक्नॉलॉजी / आर्मी / अर्थकारण / अध्यात्म इ.
२. भटक्या जमाती यामध्ये विविध देशांचे पर्यटन अथवा ट्रेक्स/भटकन्ती यांची प्रवासवर्णने लिहिणारे
३. स्युडो-स्पिरिच्युअल- यांचे अध्यात्म हा एक भ्रम अथवा न फुटलेले बिंग असते . उगाच कुठल्यातरी बाबा-बुवाचे ढोल बडवण्यात ही मंडळी दंग असतात
४. संघ-भाजपा-हिन्दुत्ववादी /मोदीभक्त ह्याच्या अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी
५. स्युडो सेक्युलर अथवा फुर्रोगामी
हे सहज ओळखू येतात . कोणत्याही विषयावर संघ-भाजपा-हिन्दुत्व/मोदी विरोधी भूमिका घेवून भारतीय संस्कॄती /इतिहास /धर्म /परंपरा यांची टिन्गल टवाळी / निन्दा / खिल्ली उडवणे
६. मनोरुग्ण / डिप्रेस्ड - हे वैयक्तिक आयुश्यातील अपयश अथवा फ्रस्ट्रेशन संस्थळावर येवून काढत असतात अथवा काहीतरी बिनडोक्/बाळबोध प्रतिसाद अथवा धागे काढून संस्थळाची बॅन्डविड्थ वाया घालवत असतात .
७. निर्लज्ज नव-मत-वादी - हे सेक्स सारख्या वैयक्तिक विषयावर जाहीर आणि नको तितके/ नको ते जाहीरपणे मत व्यक्त करत फिरतात
८. प्युअर ट्रोल
९. सामान्य मूकवाचक
१०. प्युअर टाइमपास म्हणून संस्थळावर येणारे / भेट देणारे
११. गॄहिणी - देशस्थ्/परदेशस्थ हाउसवाइफ
आपण यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो ,हे प्रत्येकाने गम्भीरपणे विचार करून ठरवावे असे मला वाटते. त्याचप्रमाणे याखेरीज अन्य कोणत्या कॅटेगरीज असतील तर त्या इथे सांगाव्यात .
वाचन संख्या
2507
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
लयी जबरा अभ्यास दिसतोय तुमचा
आयडीज चे वर्गीकरण
यापैकी तुम्ही कोण?
काडी सारक
In reply to यापैकी तुम्ही कोण? by टवाळ कार्टा
बाज
_/\_
In reply to बाज by मारवा
जिलबी
मलाही चांगली.
In reply to जिलबी by चौकटराजा
लेस बांधलेला समुदाय
राइल ना भो..
संस्थळांवर जो मजकूर प्रकाशित होतो