नमस्कार Global मराठी मित्रांनो ,
गेल्या चार पाच वर्षांपासून 'मिसळपाव' चा नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मिसळपाव चा आवाका खूपच प्रचंड आहे.कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच खुप उपयोगी पडते.
तुम्हाला सर्वाना, एक आनंदाची बातमी देण्यासाठी ह्या पोस्ट चा खटाटोप.. आपल्या मधल्याच काही उत्साही मराठी लोकांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. देशाबाहेरच्या, खास करूनUK मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या screen वर सादरीकरण करण्याचा !
चांगले मराठी सिनेमा पाहण्याची ओढ आणि त्या साठी पाहावी लागणारी वर्षभराची वाट, छोटी स्क्रीन व pirated कॉपी चा निषेध, आणि कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने चांगले मराठी सिनेमे बघता न येणं हि खंत त्या उद्देशाला पुढे न्यायला युरेशी ठरली, आणि सुरु झाली तयारी..
बजेट, कॉन्टॅक्टस , मार्केटिंग, थिएटर्स, production हाऊसेस, मराठी communities अशा कितीतरी चर्चा झाल्या, आणि हळू हळू वेग वाढू लागला. पहिल्या पायरी वर आम्ही "Half Ticket" काढलं.म्हणजे....
* Marathi Popcorn हि टीम आता घेऊन येत आहे "Half Ticket" ह्या सिनेमाचा UK wide screening*
येत्या २१ ऑगस्ट २०१६ ला UK मधील १२ Cineworld थिएटर्स मध्ये Half Ticket सादर होतोय.
आमच्या कडून आम्ही सगळ्याना चांगल्या सिनेमा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्याउपक्रमाला आम्हाला साथ द्यायला बरेच मराठी celebrities सुद्धा पुढे आले आहेत ..
आता साथ हवीये फक्त तुमची सगळ्यांची !
आमच्या फेसबुक पेज वर तुम्ही आम्हाला support करू शकता.
तुम्ही "Half Ticket" हा सिनेमा पहिला असेल तर, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या, आमच्या फेसबुक पेज वर !
तुमच्या UK मधल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक याना सिनेमा recommend करा , त्यांना पण सांगा ना "Half Ticket" आणि Marathi पॉपकॉर्न बद्दल !
आपल्या मराठी सिनेमाचा आनंद आता UK मध्ये तो हि मोठ्या स्क्रीन वर घेऊयात... येताय ना मग "Half Ticket" बघायला फुल्ल तिकीट काढून.. :)
तुम्ही खालील लिंक्स वरून आमच्याशी संपर्क साधू शकता, like करा, share करा आणि प्रेमाने support करा ...
www.marathipopcorn.com
https://www.facebook.com/marathipopcorn
Tickets Booking : http://www.marathipopcorn.com/#!tickets/vyj3b
प्रतिक्रिया
17 Aug 2016 - 11:17 pm | धर्मराजमुटके
सुंदर उपक्रम ! शुभेच्च्छा !! तिकडे मायबोलीवर देखील हे टाका. तिकडे भारताबाहेरील मंडळी अशा बाबतीत जास्त अॅक्टीव्ह असतात बहुतेक.
18 Aug 2016 - 7:17 pm | सुहास बांदल
धन्यवाद, हो मायबोली वर टाकायचा प्रयत्न केला पण बहुतेक ते प्रशासनाला (admin )आवडलं नाहीये :( पोस्टच काढून टाकली त्यांनी...
पहिल पाऊल उचललंय, आता आपली मराठी माणसांची साथ हवी आहे फक्त...
17 Aug 2016 - 11:36 pm | पद्मावति
खूप छान उपक्रम.
18 Aug 2016 - 7:19 pm | सुहास बांदल
धन्यवाद, आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
18 Aug 2016 - 9:32 pm | पद्मावति
नक्की सांगते. fb वर पण काल लाइक केलंय आणि हो, सैराट कधी येणार?
17 Aug 2016 - 11:40 pm | खटपट्या
धागा दोनदा आलाय बहूतेक. संपादकांना सांगून एक डीलीट करुन घ्या
18 Aug 2016 - 7:20 pm | सुहास बांदल
हो ना, काहीतरी गडबड झाली ... संपादकांना सांगितलंय आधीच धागा उडवायला आणि वेबसाइटचा पत्ता पण बदलायला..
18 Aug 2016 - 2:29 am | विशाखा राऊत
अरे वाह मस्त उपक्रम
18 Aug 2016 - 2:30 am | विशाखा राऊत
www.marathipopcorn.com ही लिंक वरील लेखात एडीट करणे. चालत नाही आहे
18 Aug 2016 - 7:40 pm | सुहास बांदल
धन्यवाद विशाखा, ते बदलता येत नाहीये, admin ला निरोप पाठवलाय, पण तोवर नवीन लिंक देतो इथे
http://www.marathipopcorn.com
18 Aug 2016 - 8:38 am | विवेकपटाईत
सुन्दर उपक्रम, शुभेच्छा
18 Aug 2016 - 7:41 pm | सुहास बांदल
आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
18 Aug 2016 - 9:46 am | एस
फार छान. शुभेच्छा!
18 Aug 2016 - 7:41 pm | सुहास बांदल
आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
18 Aug 2016 - 2:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर उपक्रम ! अनेक शुभेच्छा !!
18 Aug 2016 - 7:42 pm | सुहास बांदल
धन्यवाद डॉ सुहास म्हात्रे , आभारी आहोत ! जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
18 Aug 2016 - 4:51 pm | प्रभाकर पेठकर
मराठी लाह्या आता राणीच्या राज्यात !!!
गाभा:
नमस्कार वैश्विक मराठी मित्रांनो ,
गेल्या चार पाच वर्षांपासून 'मिसळपाव' चा नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मिसळपाव चा आवाका खूपच प्रचंड आहे. कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच खुप उपयोगी पडते.
तुम्हाला सर्वाना, एक आनंदाची बातमी देण्यासाठी ह्या लेखाचा चा खटाटोप.. आपल्या मधल्याच काही उत्साही मराठी लोकांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. देशाबाहेरच्या, खास करून राणीच्या देशा मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या पडद्यावर वर सादरीकरण करण्याचा !
चांगले मराठी सिनेमा पाहण्याची ओढ आणि त्या साठी पाहावी लागणारी वर्षभराची वाट, छोटा पडदा व चोरट्या प्रतींचा चा निषेध, आणि कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने चांगले मराठी सिनेमे बघता न येणं हि खंत त्या उद्देशाला पुढे न्यायला पुरेशी ठरली, आणि सुरु झाली तयारी..
अर्थसंकल्प, संपर्कसुची, विक्रीव्यवस्था, चित्रपटगृह, निर्मिती संस्था, मराठी समाज अशा कितीतरी चर्चा झाल्या, आणि हळू हळू वेग वाढू लागला. पहिल्या पायरी वर आम्ही "हाफ टिकिट" काढलं. म्हणजे....
* मराठी लाह्यांची ही टिम आता घेऊन येत आहे "हाफ टिकिट" ह्या चित्रपटाला युकेच्या भव्य पडद्यावर*
येत्या २१ ऑगस्ट २०१६ ला युके मधील १२ चित्रसृष्टीच्या चित्रपटगृहांमध्ये हाफ टिकिट सादर होतोय.
आमच्या कडून आम्ही सगळ्याना चांगल्या सिनेमा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्याउपक्रमाला आम्हाला साथ द्यायला बर्याच मराठी प्रतिष्ठीत व्यक्तीसुद्धा पुढे आल्या आहेत ..
आता साथ हवीये फक्त तुमची सगळ्यांची !
आमच्या फेसबुक पेज वर तुम्ही आम्हाला पाठींबा देऊ शकता.
तुम्ही "हाफ टिकिट" हा सिनेमा पहिला असेल तर, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या, आमच्या फेसबुक पानावर !
तुमच्या युके मधल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक याना सिनेमाची शिफारस करा , त्यांना पण सांगा ना "हाफ टिकेट" आणि मराठी लाह्यां बद्दल !
आपल्या मराठी सिनेमाचा आनंद आता युके मध्ये तो हि मोठ्या पडद्यावर घेऊयात... येताय ना मग "हाफ टिकिट" बघायला पूर्ण तिकीट काढून.. :)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जिथे जिथे मराठीचा अनावश्यक आग्रह वाटेल तिथे तिथे मुळ इंग्रजी शब्द राहू द्यावा.
18 Aug 2016 - 5:03 pm | किसन शिंदे
अगदी बर्याच दिवसांनी दिसताय पेठकर काका.
18 Aug 2016 - 5:11 pm | प्रभाकर पेठकर
कार्यबाहुल्यामुळे (वर्कलोड) मिपापासून दूर होतो.
18 Aug 2016 - 7:45 pm | सुहास बांदल
धन्यवाद प्रभाकर पेठकर , आभारी आहोत !
इतका मराठी वाचून एकदम भरून आलं .. पण खरंच छान वाटलं. आणि धन्यवाद , तुम्ही इतकी मेहनत करून सगळं भाषांतर केलंत.. (मला इतकं मराठी येत असतं तर १०० पैकी १०० मिळाले असते ) :)
जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)
18 Aug 2016 - 8:07 pm | प्रभाकर पेठकर
मला इतकं मराठी येत असतं........
इतकं म्हणण्यासारखं काय आहे त्यात? कुठले शब्द तुमच्यासाठी नविन आहेत? मला नाही वाटत मी योजलेले शब्द तुमच्यासाठी अनोळखी आहेत. हं! इच्छा मात्र पाहिजे. तिच नसेल तर मात्र कांहीच इलाज नाही. असो.
तुमच्या प्रकल्पाला अनेकानेक शुभेच्छा. मी तिथे असतो तर नक्कीच आलो असतो. मिसळपाववर टाकले म्हणजे माझ्या ओळखितल्या तिथल्या सर्वांना पोहोचले आहे.
माझ्या प्रतिसादाचा तुम्ही राग मानला नाहीत हे पाहून आनंद झाला.
18 Aug 2016 - 8:29 pm | सुहास बांदल
अहो राग कसला मानायचा.. उलट छानच वाटलं.. 'इतक' फक्त या साठी म्हणालो, कारण काहीकाही शब्द, इंग्रजी मध्ये इतके रोजचे झाले आहेत कि आठवण करून सुद्धा त्याचे मराठी शब्द सुचत नाहीत, पण तेच शब्द तुमच्या कडून वाचले, म्हणून म्हटलं.. बाकी काही नाही हो..
पण एक मात्र खरं , मस्त वाटलं तुमच्याशी बोलून..
18 Aug 2016 - 7:07 pm | पैसा
यश मिळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
18 Aug 2016 - 8:26 pm | सुहास बांदल
धन्यवाद पैसा , आभारी आहोत ! तुमच्या शुभेच्छा अशाच पाठीशी असुद्या.. जमलं तर तुमच्या ओळखीत असतील कुणी इकडे तर त्यांना हि निरोप द्या.. :) कि चांगला सिनेमा मिस नका करू :)