गाभा:
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4919619007614034139&Se...(%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87)
वरील लेख अवश्य वाचावा.
भूतदया आणि आपली संस्कृती वर विचार तरी करता येईल.
जमल्यास काही करता आले तर बरेच होईल.
कलंत्री
प्रतिक्रिया
4 Jul 2016 - 2:38 pm | माहितगार
उत्तम कांबळेंच्या भटकंतीतून पुढे येणारी निरीक्षणं आणि प्रश्न त्यांच्या नावा प्रमाणेच उत्तम असतात. अधून मधून त्यांचे लेखन वाचतो. "पण गाईनं ‘एक्स-रे मशिन बंद का होतं’, हे विचारायचं कुणाला?" हा उत्तम कांबळेंचा प्रश्न खरेच लाख मोलाचा प्रश्न आहे.
अर्थात उत्तम कांबळे लेखनातून बदलत्या महानगरीय संस्कृतीस अधिक लक्ष्य करतात, त्यात अंशतः तथ्य असले तरीही त्यांनी लक्ष्यवेधलेली जनावरांच्या दवाखान्यांची अवस्थेस ग्रामीण-शेतकरी-दलित-अल्पसंख्यांक इत्यादींचा हवाला देत दशकों दशके जातीयवादाच्या आधारावर पुन्हा पुन्हा बिनबोभाट खानदानी कारखानदरी करणारी राजकीय नेतृत्वेही तेवढीच जबाबदार नाहीत का ? सरकारी दवाखान्यांची अवस्था सुधारवायस हवी पण, उत्तम कांबळे केवळ भांडवलशाहीस जबाबदार धरतात ते पुरेसे रास्त वाटत नाही.
उत्तम कांबळेंचे कोंबड्यांबद्दल वेगळा न्याय खालील निरीक्षणातून नोंदवण्याबद्दलही साशंकता वाटली
१) कोणतेही प्राणी मग ती कोंबडीही का असेना तीला दवाखान्यात नेण्या बाबत किंमतीचा विचार करण्यास हरकत जशी नाही तसेच किंमत काढलीच पाहीजे असेही नाही, कांबळेंना त्यांचे कुत्रे जेवढे प्रिय तेवढे कोंबडी पालकास एखादी कोंबडी प्रियसुद्धा असूच नये असेही नसावे. :)
२) कोंबंड्यांना व्हायरल इन्फेक्शन असेल आणि त्याबाबत डॉक्टरांना दाखवायचे असेल तर सर्वच कोंबड्या दवाखान्यात नेल्या पाहीजेत असेही नसावे.
असो. त्यांचा व्यक्तीगत परंपरावाद बाजूला ठेवला तर उत्तम कांबळेंची बरीच निरीक्षणे दखल घेण्या जोगी नक्कीच असतात.
4 Jul 2016 - 3:03 pm | सोनुली
छान लेख आहे. आवडला