नमस्कार.
मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात. आणि संपूर्ण लेख जर मिपावर वाचायला मिळत असेल तर माझ्या ब्लॉग साइटवर येऊन तो वाचा, असंही आवाहन मी करत नाही. म्हणून जाहिरात वगैरे म्हणणे चूक ठरेल.
2. मिपाचे बहुतेक सभासद इथे आपल्या खर्या नावाने न वावरता उर्फ नावाने वावरतात आणि प्रतिक्रिया लिहितात. आपली खरी ओळख लपून राहिल्याने अनेकदा प्रतिक्रिया मुद्देसुद न येता कोपरखळ्या मारण्यातून येत असतात, हे ही लक्षात आले. खर्या नावाने लिहिणे उत्तम असे माझे मत आहे. नाव लपले की नको ते बोलण्याचे धारिष्ट्य वाढते, ते चुकीचे आहे. म्हणून अनेकदा मी प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो. हे लिखाण मी ऑप लाइन करून पेस्ट करीत आहे.
3. ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हा विषय स्वतंत्र पुस्तकाचा आहे. म्हणून या ब्लॉग मध्ये फक्त धावता आढावा घेतला आहे असंच म्हणावं लागेल.
- डॉ. सुधीर रा. देवरे
वाचने
4092
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय आहे हे
@@संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं
नाही नाही
In reply to @@संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं by अत्रुप्त आत्मा
फोटो टाका लवकर. नायतर कट्टा
सॉरी धागा चूकला
In reply to फोटो टाका लवकर. नायतर कट्टा by खटपट्या
विरेंद्रभौ,असा धागा चुकला ना
@ भिंगरी,तू कुठच्या धाग्यावर
In reply to विरेंद्रभौ,असा धागा चुकला ना by भिंगरी
हा हा हा...........
In reply to @ भिंगरी,तू कुठच्या धाग्यावर by नूतन सावंत
नुसतंच गोलमाल.
निसटत्या बाजू १
निसटत्या बाजू २
निसटत्या बाजू ३
निसटत्या बाजू ४
माझ्या खवचट / तिरकस
साध्यासाध्या चेंडूंवर दांडी
In reply to माझ्या खवचट / तिरकस by आदूबाळ
मिपावर खर्या/खोट्या नावाने
In reply to साध्यासाध्या चेंडूंवर दांडी by माहितगार
ह्म्म.. विचारांचा (मग ते
In reply to मिपावर खर्या/खोट्या नावाने by आदूबाळ
शीष्टाचार सांभाळून व्यक्तीगत
In reply to माझ्या खवचट / तिरकस by आदूबाळ
@माहितगार
का हो ? कै चुकले काय ? स्पीड
डॉक्टर साहेब,
या साठी पण भाग्य पाहिजेल, आपल
In reply to डॉक्टर साहेब, by विवेकपटाईत
काहीतरी गरमागरम खडाजंगी
काहीतरी गरमागरम खडाजंगी
खरोखरची नावे
In reply to काहीतरी गरमागरम खडाजंगी by सतिश गावडे
त्यात काय. फेबुवरच्या