✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

टोचणी-२ (अंडरटेकर)

व
विनायक प्रभू यांनी
Sat, 09/20/2008 - 16:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4571 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

लेख आवडला.

अभिज्ञ
Sat, 09/20/2008 - 18:27 नवीन
वि.प्र.जी, मन हेलावून टाकणारी टोचणी. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

टोचणी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/20/2008 - 18:50 नवीन
अशा प्रसंगात तहान-भूक कसलेच भान राहात नाही. बरं ! नारळ पाणी पिलं तर पिलं, त्यातलं खोबरं खायची इच्छा झाली, म्हणजे तुम्हीही जरा कळसच केला ना राव !!! आता झालं ते झालं, त्यात आपला काहीही दोष नाही. तेव्हा ही टोचणी काढून टाका.
  • Log in or register to post comments

टोचणी २-३

आनंद
Sat, 09/20/2008 - 19:27 नवीन
मला वाटतय ही च खरी टोचणी होती. तुम्हीच उत्तर दिलय, त्या प्रमाणे ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. अश्या वेळेला डोक्यात वेगळेच विचार चालू असल्या मुळे खोबर्‍या साठी हात पुढे जाणे स्वाभाविकच आहे. अजुन काही टोचण्या नाहीत ना एकदाच टोचुन टाका (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

ह. घ्या

विनायक प्रभू
Sat, 09/20/2008 - 21:43 नवीन
http://vipravani.wordpress.com/ हे ह. घ्या म्हण्जे काय? सागा बाबा एकदाचे वि.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

ह्घ्या

गणा मास्तर
Sat, 09/20/2008 - 22:33 नवीन
ह घ्या म्हणजे हळु घ्या आनंदशी १००% सहमत - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

हेतू

वेलदोडा
Mon, 09/22/2008 - 13:09 नवीन
खोबरे खाण्याचा तुमचा हेतू नक्किच पार्टी करण्याचा नव्हता. जे झाले ते भुकेल्या पोटी झाले. त्यामुळे आईवरील प्रेम तर कमी झाले नाही ना. टोचून बोलणार्‍याच्या कडवट बोलाकडे दुर्लक्ष केले असते किंवा त्याला एकदाच ठणकावून आपल्या हेतूबद्द्ल वा कृतीबद्द्ल सांगितले असते म्हणजे आयुष्य भराची टोचणी लागली नसती. बाकी ह.घ्या म्हणजे टेक इट लाईटली - हलकेच घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

>>त्याला

सखाराम_गटणे™
Mon, 09/22/2008 - 13:43 नवीन
>>त्याला एकदाच ठणकावून आपल्या हेतूबद्द्ल वा कृतीबद्द्ल सांगितले असते म्हणजे आयुष्य भराची टोचणी लागली नसती. काही फायदा नाही, असल्या लोकांना जोडे मारले तरी काही फायदा नाही. सवयीचा परीणाम नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेलदोडा

खर आहे

मीनल
Sat, 09/20/2008 - 21:03 नवीन
ब-याचदा आपण कळत नकळत काहीतरी बोलून ,वागून जातो. समोरचा माणूस कदाचित विसरून ही जात असेल . पण आपण कालांतराने सूज्ञपणे विचार करतो आणि आपली चूक आपल्याला समजते. आपलच मन आपल्याला टोचायला लागतं. कधी तरी तर रक्त बंबाळ होईपर्यंत टोचत. म्हणून आपणच आपल्या विरूध्द उभा ठाकतो. मीनल.
  • Log in or register to post comments

काका, मीही

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/20/2008 - 23:40 नवीन
काका, मीही आता माझ्या मनातली टोचणी सांगते. मी तेव्हा आत्याकडे गेले होते चार दिवस आणि निघायच्या आदल्या दिवशी फोन केला. आईला म्हटलं, "तू नाहीस तर किती बरं आहे, कोणी ओरडत नाही, नावडत्या भाज्या खायला घालत नाही." आणि दुसर्‍या दिवशी घरी गेले तर समजलं की आता यापुढे कोणीही कधीही नावडत्या भाज्या खायला घालणार नाही. संध्याकाळी अर्थात घरी खूप गर्दी होती. मला भूक लागली होती. बाबा शेजारी बसले होते, त्यांनाही ते माझ्या पोटातल्या आवाजांमुळे लक्षात आलं. मला म्हणाले, "कालच आईनी रवा-कणकेचे लाडू बनवले आहेत, जा एखादा तोंडात टाक. नाहीतरी पुन्हा कधी खाणारेस?". बाबा नावाचा घरात असणारा माणूस माझी किती काळजी करतो हे समजायला मला खूप मोठी किंमत द्यावी लागली.
  • Log in or register to post comments

ओह..

चतुरंग
Sun, 09/21/2008 - 00:25 नवीन
यापुढे कोणीही कधीही नावडत्या भाज्या खायला घालणार नाही. होत्याचे नव्हते! नकळत काय बोललीस आणि काय झाले! असले प्रकार आयुष्यभर छळत रहातात, जाईल तिथे पाठलाग करत रहातात! टोचणी बोललीस ते बरे केलेस चित्त जरा शांत होईल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वेलकम

विनायक प्रभू
Sun, 09/21/2008 - 11:36 नवीन
http://vipravani.wordpress.com/ अदिती -वेलकम टू क्लब. पू निघाल्याशिवाय जखम बरी होत नाही. वि.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं वाटतं

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/21/2008 - 11:46 नवीन
बरं वाटतं आपला गाढवपणा, चुका एकदा मान्य केल्या की! :-) अवांतरः काय झकास असायचे ते लाडू कणीक-रव्याचे! कोणाला पाकृ येत असेल तर जरा टाका ना इथे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

नाइलाजाने

सखाराम_गटणे™
Sun, 09/21/2008 - 20:59 नवीन
नाइलाजाने एक नारळ घेतला. वाटलं पाणी तरी प्यावे. घोट घेतल्यावर जरा बरे वाटले. सवयीने त्या केरळियाने खोबरे काढुन दिले. आणि ते मी खायला सुरु केले प्रतिक्षिप्त क्रियेने. अर्धवट खाल्ले न खाल्ले तितक्यात खांद्यावर हात आणि मस्तकात बंदुकीची गोळी. " काय, आई गेल्याची पार्टी चालली आहे वाट्ते? मागे बघतो तर अंडरटेकर उभा. स्मशानात सुद्धा सोड्ल नाही ***व्याने. तुम्ही तुमच्या प्रतिक्षिप्त क्रियेने नारळाचे खोबरे खाल्ले, ह्यात मला काय व्यक्तीश: काही चुकीचे वाटत नाही. माणसाचे प्रेम जीवंत असताना कसे संबध ठेवले होते, किती काळजी घेतली होती यावरुन ठरवावे. उगाचच किती दु:ख प्रदर्शीत केले याला महत्व नाही. जसा जसा माणुस मोठा होत जातो तसा त्याला दु:ख नियंत्रणात ठेवण्याची सवय होते म्हणजे तो अनुभवानुसार परीपक्व होतो. आणि जन्म - म्रुत्यु हा जीवनाचा भाग आहे, यातुन कोणी चुकलेले नाही. जे होते ते परमेश्वराच्या क्रुपेने होते. नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
  • Log in or register to post comments

+१ सहमत आहे.

चतुरंग
Sun, 09/21/2008 - 22:09 नवीन
लहान वय, एप्रिलचे ऊन, हॉस्पिटलच्या सगळ्या दिव्यातून पार पडताना येणारा थकवा ह्या सर्वातून थोडा दिलासा देणारे शहाळ्याचे पाणी आणि खोबरे खाणे हे अगदी स्वाभाविक वाटते. त्यावर त्या अंडरटेकरचे बोलणे हे त्यावेळी मनाला लागणे शक्य आहे. पण पुढे ती बोच कमी व्हायला हवी होती ती काही कारणाने झालेली दिसत नाही. आता बोलला आहात त्यामुळे होईल. (सखाराम्_गटणे याच्यासाठी अवांतर - नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे हे खरे पण तरीही एक नाडी खिशात ठेवावी कारण इलास्टिक तुटले तर?) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

नाडी सतत

टारझन
Mon, 09/22/2008 - 13:19 नवीन
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे हे खरे पण तरीही एक नाडी खिशात ठेवावी कारण इलास्टिक तुटले तर? आयला आज काही खरं नाही .. जो लेख उघडतोय त्यात नाडी,इलॅस्टिक , बोळा मोरी आणि .... आज मरतय हसून हसून .. एक तर काल पासून पुन्हा यायाम सुरू केलाय .. पोटाचे याम केल्याने आधीच पोट दुखतय ... त्यात रंगोजी आणि गटणे बाबा नाही नाही ते लिहून आमचे वाईट्ट हाल करत आहेत -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाडी

विनायक प्रभू
Mon, 09/22/2008 - 10:05 नवीन
http://vipravani.wordpress.com/ गटणे साहेब, नाडी नंतर आता इलास्टीक. सर्व सोडुन एकदाचे संपूर्ण शास्त्र एकदा प्रसवा बघु. सर्व अज्ञानी लोकांचा सहारा व्हा. वि.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

भूक...

प्रभाकर पेठकर
Tue, 09/23/2008 - 15:14 नवीन
लाहनपणी प्रसंगाचे गांभिर्य लक्षात येत नाही आणि भूकही आवरत नाही. माझ्या आजोबांची गोष्ट त्यांनीच सांगितलेली.... त्यांचे वडील (माझे पणजोबा) गेले तेंव्हा माझे आजोबा ८-१० वर्षाचे होते. सर्व नातेवाईक जमून स्मशनात जायला खूप उशीर झाला. स्मशानात आजोबांनी वडीलांच्या चितेला अग्नी दिला आणि कोपर्‍यात बसून रडू लागले. लोकांना वाटले वडील गेले म्हणून ते रडताहेत. पण, शेवटी तेच जवळच्या कोणातरी नातेवाईकाला म्हणाले, 'मला खूप भूक लागलीए.' स्मशानाच्या शेजारच्याच किराणा मालाच्या दुकानात तेंव्हा चिवड्याचे पाकिट मिळाले. (तेंव्हा बिस्किटेही परवडायची नाहीत.) ते कोणीतरी आणले आणि आजोबांनी वडीलांची चिता जळत असताना स्मशानात बसून चिवडा खाल्ला. त्यांनाही मोठेपणी ही टोचणी खूप दिवस छळत होती. मला म्हणायचे, 'प्रभ्या, अरे 'बाप मेला' म्हणजे काय हे समजण्याचे माझे वयच नव्हते.' असो. असे प्रसंग येतात. ते विसरून जायचे आणि गेलेल्या माणसाचे आदर्श आठवून ते अंगीकारण्याचे प्रयत्न करायचे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा