एकरूप
घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे
पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे
साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले
निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले
घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला
ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला
किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग
भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग
घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा
गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा
उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात
ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात
घाटमाथ्यावर विसावले, ऊन सोनेरी सावळे
एकांती रमल्या मनोमनी, सावल्यांचे सोहळे
कधी गुंफती हात हाती,कधी टिपत पाणी
पारावर पाखरे गाती, उन्हापावसाची गाणी
घाटमाथ्यावर पांघरला, शीतल चांदवा चंद्राचा
काळ्याशार डोहाशी, एकरूप रंग कातळाचा
गाभाऱ्यातून येती बाहेर, दोन सावल्या थकून
शांत नीरव तो काळोख, घेती श्वासात भरून
मस्त
वाह...!
सुरेख..
आह्ह्ह. अप्रतिम
वा! क्या बात है!
धन्यवाद :)
सुरेख!
गाभाऱ्यातून येती बाहेर, दोन
फार च छान !
खूप
सुंदर .....
सल्लाम!
खतरा लिहिता ओ तै!
डोळ्यासमोर सगळे येत होते.
वा वा!मस्तच!
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद
रातराणी.. खूप सुंदर कविता
रातराणी.. खूप सुंदर कविता
रातराणी.. खूप सुंदर कविता
आहा !
खत्रा
लयबद्ध अप्रतिम काव्य! मस्तच..