१४ एप्रिल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. या महामानवास कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन.
कर्मठ हिंदु समाजातील काही अतिकर्मठ लोक माणसा माणसांत भेद्भाव करुन रानटी पणे वागत असताना या जनतेला
त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचे रान केले. त्यांच्या प्रयत्नामुळे महाड चे चवदार तळे सर्वांना खुले झाले. जिथे तिथे अस्प्रुश्यतेची माणुसकीहीन परंपरा चालू असताना त्यांनी तिथे तिथे एल्गार पुकारला.
याशिवाय भारतीय राज्यघट्ना तयार करण्या साठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. त्या दिवसांत ते दिवसांतून १८ तास
काम करीत.
इतके असूनही त्यांनी कधीही हिंदु समाजातील मित्र मैत्रिणींबद्द्ल मनात आकस ठेवला नाही हे विशेष!
आचार्य अत्रे यांनी निर्मीलेल्या ज्योतिबा फुले या चित्रपटाची त्यांनी मुक्तकंठे स्तुती केली.
महात्मा गांधींसारख्या रुषीतुल्य व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर बाळगुन त्यांचे तब्येतिची काळजी घेत दलितांसाठी वेगळा
मतदार संघ बनवणेचा निर्णय त्यांनी रद्द केला. हे उच्च संस्कार!
आजही महाड येथील चवदार तळे , नाशिकचे काळाराम मंदीर येथे आपण गेलो आणि हा हिंदू धर्माला कलंक लावणार्या
अस्प्रुश्यतेच्या परंपरांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे येतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे हिंदू धर्म थोडा तरी सुधारला आहे. उत्तरोत्तर अशीच हिंदू धर्मात सुधारणा होवो ही
प्रार्थना!
आपण पुणेकर असाल किंवा पुण्यात आलात आणि सिंबोसिस जवळील आंबेड्कर संग्रहालय पाहिले नसेल तर वेळ न दवडता ते जरुर पाहा. आंबेड्करांच्या अनेक आठवणी, त्यांचे अनेक दुर्मिळ फोटो, हस्तलिखिते , त्यांच्या नियमित वापरातील वस्तु तेथे अतिशय उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. एक सुंदर संग्रहालय!
आंबेड्करांचे काहि सुविचार देऊन या महामानवास परत विनम्र अभिवादन करुन हा छोटा लेख संपवितो.
बाबासाहेबांचे विचार सगळीकडे पसरवणे हाच युवकांचा उद्देश असला पाहिजे.
माणसाला आपल्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे. दारिद्र्याची नाहि .
I measure the progress of community by degree of progress of women in that community.
वाचने
10089
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
महामानवास अभिवादन !!!
बाबासाहेबांच्या स्मृतीस
स्वतःसाठी सगळेच जगतात , पण
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी
+१११
In reply to शतकोत्तर रौप्यमहोत्सवी by अभ्या..
नाखु
अभिवादन
?
बाबासाहेबांना अभिवादन
आपण पुणेकर असाल किंवा पुण्यात
बरोबर
In reply to आपण पुणेकर असाल किंवा पुण्यात by उगा काहितरीच
धन्यवाद ... ४-५ महिन्याअगोदर
In reply to बरोबर by श्रीरंग_जोशी
जय हो बाबासाहेबकि
अभिवादन
बाबासाहेबांच्या स्मृतीस
+१
In reply to बाबासाहेबांच्या स्मृतीस by सुबोध खरे
अभिवादन
उभं आयुश्य सनातनी सत्येशी लढा
जय भीम
बाबासाहेबांच्या स्मृतीस
महामानवास अभिवादन!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब
भारतरत्न
..
बाबा साहेबांना नमन. केवळ नमन