✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक व्हॅलेन्टाईन

स
सुरवंट यांनी
Sun, 02/14/2016 - 12:39  ·  लेख
लेख
काल : स्मशानात जाऊन मी बसतो. नेहमीच बसतो. आजही बसलो होतो. थडग्यावर बसून तंबाखू खायला फार बरं वाटतं. एकदा किक बसली का तुझ्या आठवणीत शिरता येतं. तुझ्या केसातला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा तो गंध, बांगड्यांची किणकीण आणि छमछम ते पैंजण, ढळढळीत दुपार आणि ऊसाचं रान. तुझ्या वैभवाचा मला स्पर्श झाला... काय पण व्हॅलेन्टाईन, मी इथं वर बसलोय बार भरत, आणि तू थडग्यात.. आज: मी व्हिस्की पीत नाही पण हा ग्लास फक्त तुझ्यासाठी. मला आवडतात म्हणून ही गुलाबाची फुलंही सोबत. तुलाही आवडतील याची खात्री आहे. काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन? हाऊ क्यन आय डिल विथ धिस्? मी इथे ऊभी फुलं घेऊन आणि तू थडग्यात...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
1841 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

क्लास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/14/2016 - 14:56 नवीन
व्वा... आवडलं. तो गजरा, तो गंध, बांगड्यांची किणकिण आणि पैंजनाचीही आठवण आली. दुसरा भाग नै पटला पण असंही होऊ शकतं. असाही एक व्हेलेंटाईन डे असू शकतो. हॅपी व्हेलेंटाइन डे, लव यु सो मच गं. असं कबरीजवळ जावू नै म्हणत का ? उस शक्स से फकत इतना सा ताल्लुक है मेरा वो परेशान होती है तो मुझे निंद नही आती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काल रॉजर म्हणत होता, वील यू

Rahul D
Sun, 02/14/2016 - 15:13 नवीन
काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन? हाऊ क्यन आय डिल विथ धिस्? ये बात कुछ हजम नहीं हुई.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा