✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नवर्‍याचे नवविधवेस पत्र

त
तर्राट जोकर यांनी
Wed, 02/10/2016 - 12:24  ·  लेख
लेख
तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश. मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात. तू फक्त डोक्यात जायचीस... आईबाबांना मी आधीच कळवलं होतं मला मुलगी पाहिजे ती पिणारीच, मला सोबत करणारी, मला सांभाळून घेणारी. पण त्यांनी तुला आणली. तुला कळलं काय, 'त्यांनी आणली'. मला कुणी विचारलेच नाही. आणली तीही अशी की सदानकदा बक बक बक, तोंडाचा पट्टा चोविस तास. आता घरीच बाटली घेउन बसलो नसतो तर डो़कं राहिलं असतं का माझं जाग्यावर...? मुलं मला नाय तुला घाबरायची. तु ज्यालात्याला वस वस ओरडायचीस. पोलिसात जाऊन खोट्यानाट्या कंप्लेंट टाकायचीस. कायदाही बायकांच्या बाजुने. बिचार्‍या त्या बोक्या इन्स्पेक्टराला स्वतःची बायको मांजर बनवून पदराखाली ठेवते, तो इथे येऊन वाघासारखा ओरडला फक्त त्याच्या वर ह्या स्त्रीधार्जिण्या कायद्याची सक्ती होती म्हणून. नाही तर मला तो एकट्यात म्हणाला होता, 'मायला ह्या सार्‍या बायांना एकदा हवालात मध्ये बंद करुन कुलूप लावुन चावी किन्गफिशरच्या बाटलीत टाकून बाटली बंद करुन समुद्रात फेकून द्यायची जाम इच्छा होते.' तुला सांगायचो, दारू चांगली असते पण स्वतःपुढे तू दुसर्‍या कोण्या स्त्रीला चांगली म्हणवून घेशीलच कशी. कधी कधी सोडायची हुक्की यायची. जेव्हा तू लाडालाडाने माझ्याशी बोलायची, खट्याळपणे हसून मजकडे पहायचीस, एखादी धुंद रात्र मला भेट द्यायचीस. पण सकाळी कळायचं कैकयीसारखा कसला तरी वर तू वसूल करून घ्यायचीस. मी परत सुरु करायचो 'हल्ली वाईफमधे काही मजा येत नाही’ असे म्हणून. तुला काय ऐकू यायचं... ? अदितीचं सांगू नकोस गं, माझं शिक्षण तिच्या लग्नात द्याव्या लागणार्‍या हुंड्यापायी आणि लग्नखर्चापायी बुडालं, त्याची भरपाई करतेय ती. चांगला आय आय एम मधे शिकलो असतो. हार्वर्डला गेलो असतो पण आमच्या आइ-बापाला बडेजाव करायची हौस. सगळे पैसे लग्नात उडवले. आता तिला टोचून टोचून बोलतायत. ते बोलणं ऐकावं लागु नये म्हणून तिने त्यांची रवानगी तिकडे केली ज्या बिल्डरची जाहिरात तू तुझ्या पत्रातून करते आहेस. मुलांची काळजी घेणे तुझ्याच्याने होणार नव्हतेच. तुझा तो पिंडच नव्हता. आधाराशिवाय उभी राहणे तुला जमणारेच नव्हते. तसे असते तर माझ्या दारू पिण्याच्या त्रासाचा एवढा इश्यु करण्याऐवजी आधीच गेली असतीस की स्वत:च्या पायावर उभी राहायला... तुला वाटतं, तुला चांगला नवरा मिळाला. मला तर त्या बाब्याची काळजी वाटून र्‍हायलीये. तुझ्या सारख्या बायकोशी संसार करण्याची चूक तो दुसर्‍यांदा करतोय. परत अशी चूक करायला तो शिल्लक राहणार नाही. नव्याचे नऊ दिवस, नंतर कळेलच. तुझं लक्ष प्रशस्त फ्लॅट कडे आहे हे माझ्या ध्यानात आलं, त्याच्या नाही का येणार...? तुम्ही दोघं बसताय प्यायला सोबत. मी ही असतोच तुमच्या बाजुला बसलेला. ओल्ड मॉन्कचे घुटके घेत... एकदा त्याच्याकडे, एकदा तुझ्याकडे बघत... हळु हळु त्याच्या ग्लासातली वाढवतो दारु. तू बघ आता काय होते ते. मुलं तुला विचारतील, "आई, तू ह्या नव्या बाबांनाही का दारूची इतकी सवय लावली, ह्यापेक्षा आधीचे बाबा बरे होते." त्यावर तू त्यांना सांगशील, ‘बाळांनो, हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करतेय. तुमचे पहिले बाबा गेले ते माझ्यामुळेच, आता हेही बाबा गेले तरच हे घर आणि संपत्ती आपल्याला मिळेल...." तू हे पत्र लिहित असतांनाच तुझ्या मागे उभा राहून वाचत होतो. तू लग्नास उभी राहीली तेव्हा अंतरपाटाच्या जागीच मी होतो. बेडरूममधे तुम्हा दोघांच्यामधे मीच झोपलेलो. मी आहे, गेलो नाही. तुला माझा विसर पडू देणार नाही. चल भर नायन्टी आता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
8559 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

नवीन फ्याड आलं मिपावरचं!

पिलीयन रायडर
Wed, 02/10/2016 - 12:31 नवीन
नवीन फ्याड आलं मिपावरचं!
  • Log in or register to post comments

...

मोगा
Wed, 02/10/2016 - 12:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

सध्या मिपावर'पत्र सप्ताह'

_मनश्री_
Wed, 02/10/2016 - 12:40 नवीन
सध्या मिपावर'पत्र सप्ताह' चालू आहे का ?
  • Log in or register to post comments

अजून काही विषय ;)

मन१
Wed, 02/10/2016 - 12:41 नवीन
अजून काही पत्रांचं पोटेन्शियल शिल्लक आहे --
  1. पोरांची मम्मीला पत्रे
  2. पोरांची पप्पाला पत्रे
  3. पोरांची सावत्र पप्पाला पत्रे
  4. दुसर्‍या नवर्‍याची पहिल्या नवर्‍याला पत्रे
  5. पहिल्या नवर्‍याची दुसर्‍या नवर्‍याला पत्रे
  6. पप्पाची पोरांना पत्रे
  7. सावत्र पप्पाची पोरांना पत्रे
  • Log in or register to post comments

पोस्टमनचं वरील सर्वांना पत्र.

आदूबाळ
Wed, 02/10/2016 - 15:31 नवीन
पोस्टमनचं वरील सर्वांना पत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

चांगलय!

चांदणे संदीप
Wed, 02/10/2016 - 12:42 नवीन
आता पत्र पत्र खेळायच सगळ्यांनी! ;)
  • Log in or register to post comments

ठ्ठोssssssssssss !!!

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/10/2016 - 12:44 नवीन
ठ्ठोssssssssssss !!! आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात. तू फक्त डोक्यात जायचीस... तुझं लक्ष प्रशस्त फ्लॅट कडे आहे हे माझ्या ध्यानात आलं, त्याच्या नाही का येणार...? तुम्ही दोघं बसताय प्यायला सोबत. मी ही असतोच तुमच्या बाजुला बसलेला. ओल्ड मॉन्कचे घुटके घेत... एकदा त्याच्याकडे, एकदा तुझ्याकडे बघत... हळु हळु त्याच्या ग्लासातली वाढवतो दारु. तू बघ आता काय होते ते. शेवटचे तीन परिच्छेद तर लागोपाठ तीन षटकार ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

वि.स. सप्ताह चालू आहे का ? ;-

उगा काहितरीच
Wed, 02/10/2016 - 12:53 नवीन
वि.स. सप्ताह चालू आहे का ? ;-)
  • Log in or register to post comments

हाण तू!!!!

चेक आणि मेट
Wed, 02/10/2016 - 12:59 नवीन
अगदीच तर्राऽऽऽऽऽऽऽऽऽऽट हाईस कि !!!
  • Log in or register to post comments

फेब्रुवारीत शिमगा बघायचा असेल तर मिपावर या!

बोका-ए-आझम
Wed, 02/10/2016 - 13:21 नवीन
सर्वांना जाहीर आमंत्रण!
  • Log in or register to post comments

=))=))=))=))=))=))

जेपी
Wed, 02/10/2016 - 13:29 नवीन
=))=))=))=))=))=)) =)))=))=)) लै भारी..
  • Log in or register to post comments

चल भर नायन्टी आता. :)

मयुरMK
Wed, 02/10/2016 - 13:29 नवीन
चल भर नायन्टी आता. :) खिक्क्क...
  • Log in or register to post comments

.

अन्नू
Wed, 02/10/2016 - 13:41 नवीन
चला आलं वाटतं पत्र नवरोबाचं आता नवविधवा यावर काय षट्कार मारते याकडे लक्ष लागून रहिले आहे! ;) बाईSS... पत्र लिवायला घ्याS!!
  • Log in or register to post comments

आता मुलांची पत्रे कधी येणार?

मृत्युन्जय
Wed, 02/10/2016 - 13:46 नवीन
आता मुलांची पत्रे कधी येणार? बाप ९०, आई ६० आणि मुले ३०. होउन जाउद्यात. हम दो, हमारे दो, हम चारो के २१० मिली रोजाना. ही चेन अशीच वाढत राहिली तर दारुच्या कंपन्याच घरच्यांना पत्रे लिहायला सुरुवात करतील.
  • Log in or register to post comments

बाप ९०, आई ६० आणि मुले ३०.

मुक्त विहारि
Wed, 02/10/2016 - 15:54 नवीन
हम दो, हमारे दो, हम चारो के २१० मिली रोजाना." मस्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

एक खंबा दारू अब रोजाना है

बॅटमॅन
Wed, 02/10/2016 - 15:55 नवीन
एक खंबा दारू अब रोजाना है बचाना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एक खंबा दारू अब रोजाना है पचाना....

होबासराव
Wed, 02/10/2016 - 16:02 नवीन
एक खंबा दारू अब रोजाना है पचाना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खंबा खंबा अखंड पिऊया

बोका-ए-आझम
Wed, 02/10/2016 - 17:10 नवीन
खंबा खंबा अखंड पिऊया सोडा चखणा मुखे म्हणू या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

टाकायला आरसी, चखण्याला शेंगा

आदूबाळ
Wed, 02/10/2016 - 17:18 नवीन
टाकायला आरसी, चखण्याला शेंगा बारच्या पैशाची बचत भारी सामाजिक टल्लीकरण येता दारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आदूद्येवा... __/\__

संदीप डांगे
Wed, 02/10/2016 - 17:25 नवीन
आदूद्येवा... __/\__ =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लोल्ड मंक!

बोका-ए-आझम
Wed, 02/10/2016 - 17:08 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खेळ मांडला....!

धुरंधर
Wed, 02/10/2016 - 14:24 नवीन
वाटच पाहत होतो...... . चालू द्या ....... . कुणीतरि मुलांच पण बघा....?
  • Log in or register to post comments

लय भारी!

के.पी.
Wed, 02/10/2016 - 15:53 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

मुक्त विहारि
Wed, 02/10/2016 - 15:56 नवीन
जबरदस्त..
  • Log in or register to post comments

मस्त

मराठी कथालेखक
Wed, 02/10/2016 - 16:03 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Wed, 02/10/2016 - 19:50 नवीन
मस्त...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
  • Log in or register to post comments

बाब्बो !

धर्मराजमुटके
गुरुवार, 02/11/2016 - 21:58 नवीन
बाब्बो ! कशाची कशाला टोटलच लागना झालीया. पार लास झाल्यागत वाटतयं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा