‘हेलो हेलो’
‘कोण ?’
‘उपाध्ये बोलते.’
‘बोला’
‘अमिको ची नवीन औषधे आलीयेत. एक महिन्यात चार केजी वेटलॉस.’
‘अहो मला वजन कमी नाही करायचं, वाढवायचं आहे.’
‘मग वेटगेनचं औषध घेऊन संध्याकाळी येऊ ?’
‘नको, माझी डायेटीशियन आहे, ती खंबीर आहे माझी काळजी घ्यायला.’
‘ताई, प्रोटीन टी आहे बघा अमिकोचा. वजन हमखास वाढणार. एक महिन्याची पावडर बाराशे रुपये फक्त. आणू ?’
‘अहो नको उपाध्येवहिनी. मी कॉफी घेते फक्त.’
‘मुलांना द्या. चांगली आहे हो.’
‘मुलगा कॉम्प्लान घेतो.’
‘कसलं पांचट ते कॉम्प्लान ! अमिको जेकप्रोट एकदा देऊन बघा, परत दुसरं काही पिणार नाही.’
‘सॉरी उपाध्येवहिनी. महिन्याला बाराशे रुपयांचं प्रोटीन ड्रिंक मला परवडणार नाही आणि माझा मुलगा डाळी-उसळी भरपूर खातो.’
‘ओके, मग थंडीसाठी कोल्डक्रीम ?’
‘मुळात मी कॉस्मेटिक्स वापरत नाही. त्यातून माझी ठराविक ब्रँड सोडून इतर कुठलीही कॉस्मेटिक्स नाहीच नाही. आणि मला अमिकोमध्ये मुळीच इंटरेस्ट नाही.’
‘राहिलं. संध्याकाळी घरी आहात का ? सुरतवरून साड्या आणलेत माझ्या बहिणीने. पाच हजारात पैठणी. बघा तरी.’
‘सुरती पैठणी ?’ आता मात्र मला वैताग जाऊन हसू आलं.
‘अहो ताई, कमी करून देणार की तुम्हाला.’
‘नको बाई. अलीकडे मी साड्या फारशा वापरतच नाही.’
‘ड्रेस मटेरीअलपण आहे.’
‘नको हो. आणि तुम्ही येणार असलात तर जरूर या, पण साड्या किंवा अमिको वगैरे घेऊन नको. कॉफी घ्यायला, गप्पा मारायला या. ओके ?’
अर्थात उपाध्येबाई काही नाही आल्या संध्याकाळी.
गेले कित्येक महिने आणि नंतरचे बरेच महिने मला या अमिको-उपाध्ये आणि साड्या प्रकर्णाने दहशत बसवली आहे. रस्त्यात, ऑफिसात, घरात, स्कूटरवर, जेवणाचा पहिला घास घेतल्यावर, कुलूप काढून घरात शिरताना, उंबऱ्यावर, कुठेही मोबाईल अवेळी खणखणू लागला की डोळ्यासमोर उपाध्येबाई उभ्या रहात.
तसा त्यांचा माझा परिचय हा सिग्नलला शेजारी उभ्या राहिलेल्या दोन वाहनांपेक्षा जास्त नाही. म्हणजे माझा मुलगा आणि त्यांची मुलगी (माझ्या दुर्दैवाने) एकाच शाळेत होते. एकदा माझे ग्रह अवघड ठिकाणी आले असता शाळेच्या गॅदरिंगला जाण्याची मला बुद्धी झाली. ग्रहांनी डाव साधला आणि उपाध्येबाई माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसल्या. तेव्हाच त्यांनी माझे पाणी जोखले आणि माझ्या भिडस्तपणाला कोपर लावले. आता माझा मुलगा शाळेतून कॉलेजात गेला. (देव दयाळू आहे.) पण उपाध्येबाईंनी माझा पिच्छा सोडला नाही. अमिको तमिको ढमिको सगळ्यांच्या मदतीने मला सळो की पळो करून सोडायचे त्यांनी मुळीच सोडले नाही.
अखेर मागच्या महिन्यात एके दिवशी मी हिय्या करून मी त्यांचे दोन्ही नंबर ब्लॉक केले. त्यानंतर एक महिना बरा गेला. एकदोन दिवसाआड माझा मोबल्या त्यांचे काही मिस्ड कॉल्स दाखवून मला दचकावत असे, तेवढे सोडले तर काही त्रास नव्हता.
पण ही खुषहाली थोडेच दिवस टिकली. काही दिवसांनी वेगळ्याच नंबरवरून कॉल आला.
‘हेलो हेलो’
‘कोण, उपाध्येबाई ?’
‘हो. अहो ताई, केमीना कंपनीची स्कीम आहे. इंडक्शन बर्नरबरोबर तीन पॅन्स आणि मिनी कुकर फ्री.’
हैला, आता मात्र कमाल झाली ! आता मी स्पष्ट बोलायचे टाळून काही खरं नाही. मग त्या तिरीमिरीत धडकन सांगून टाकले.
‘उपाध्येवहिनी, तुम्हाला एकदाच सांगते, मला काहीही खरेदी करण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. त्याशिवाय इतर काही काम असेल तर अवश्य सांगा. नसेल तरी नुसत्या निवांत बोलण्यासाठी वगैरे केव्हाही घरी या. पण इथून पुढे कृपया काहीही खरेदी करण्यासाठी मला फोन करू नका. ‘
‘बरं, बाई. आणि हा नंबर माझा आहे, हो, घेत जा फोन. आता नाही काही घ्यायला सांगणार तुम्हाला.’
‘ठीक आहे.’
साधारण एक आठवड्याने आज पुन्हा फोन वाजला. उपाध्येबाई. न धास्तावता फोन घेतला.
‘हेलो हेलो’
‘बोला उपाध्येवहिनी, काय म्हणताय ?’
‘आज आहात का ऑफिसात ?’
‘हो, पण आत्ता जरा बाहेर आले आहे.’
‘ऑफिसात आलात की फोन करा.’
‘का हो ? येताय का ? मग ऑफिसात कशाला ? घरी या की.’
‘काये, की मुलीची फी भरायची आहे एक तीन हजार रुपये कमी पडताहेत. अर्जंट हवे होते. ऑफिसात आलात की या नंबरला नक्की फोन करा.’
‘हं’
एकदाच झालेल्या एका तासाच्या भेटीवर आणि अल्पतम परिचयावर कुणी कुणाकडे पैसे मागावेत का हा विषय वेगळा. तरीही पैसे द्यायला हरकत नव्हती. तशीही मदत म्हणून द्यायला हरकत नाही. पण त्यांनी सांगितलेले कारण खरे की खोटे हे पडताळून पाहण्याइतकासुद्धा त्यांचा माझा परिचय नाही. शिवाय बाईंची पार्श्वभूमी आणि चिकट स्वभाव लक्षात घेता मदत केल्यावर हे इतक्यावर थांबेल असे वाटत नाही.
ऑफिसात आले. काय करावे समजेना.
तासभर गेल्यावर मोबाईल वाजला. पुन्हा उपाध्येबाई. माझा निर्णय अजून झाला नाही.
...फोन घ्यावा की नाही याचासुद्धा.
आता दर दहा मिनिटांनी वाजतोय. कामावर लक्ष केंद्रित करता येत नाहीये. काहीतरी केले पाहिजे.
फोन घ्यावा की हाही नंबर ब्लॉक करावा ?
......टु डू ऑर नॉट टु डू ?
वाचने
7827
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार मदत करता अशी किर्ती आहे
नाही बॉ !
In reply to फार मदत करता अशी किर्ती आहे by कंजूस
सद्ध्या जमणार नाही, असे सांग.
अशी उधारी मागणारी माणसे मला
नुकताच याप्रकारचा एक अनुभव
अवघड आहे!
+१
In reply to अवघड आहे! by एस
माझी किर्ती सगळ्या आप्तस्वकीयात अशी केली आहे :
:)
नंतर आयुष्यभर पश्चात्ताप
अगदी समोरच्या घरात राहणारे एक
खरं आहे. अशा अमिको टाइप
अशा मागे लागणा-यांचा
हा:हा:
In reply to अशा मागे लागणा-यांचा by वेल्लाभट
अमिको असो किंवा ढमिको.....
अमिको असो किंवा ढमिको.....
मस्त लिहीलं आहेस ग!! काही
आमची पॉलिसी लै भारीये ! मी
एम एल एम वाले अतिशय चिकट
In reply to आमची पॉलिसी लै भारीये ! मी by उगा काहितरीच
लिखाण छान
एक सजेशन..
गंमतच असते लोकांची.
पोटासाठी करतात हो, कोणाला
In reply to गंमतच असते लोकांची. by प्रचेतस
+ १
In reply to पोटासाठी करतात हो, कोणाला by प्रसाद१९७१
दया आली बाईंची
In reply to पोटासाठी करतात हो, कोणाला by प्रसाद१९७१
मला अश्या एजंट मित्राचा फोन
+११
In reply to मला अश्या एजंट मित्राचा फोन by जेपी
बाबा संपादीत वचने आणि वाचणे...........
In reply to +११ by नाखु
बाबा संपादीत वचने आणि वाचणे...........
In reply to +११ by नाखु
मुवि
हल्ली तुम्ही प्रत्येक प्रतिक्रिया २ वेळा का देताय म्हणे?
In reply to मुवि by राजेंद्र मेहेंदळे
ठीक आहे
आईग्ग! अगदीच कोंडीत
तुम्ही काहीही करा ...
ह्म्म.. छान लिहिलयेस. असं
उधारी वरून एक सत्य घटना आठवली
भिडस्तपणा हा गुण नसून अवगुण
बरोबर लिहीलेय..
गोष्ट वाचली. पैसे
In reply to बरोबर लिहीलेय.. by योगी९००
हम्म..
In reply to गोष्ट वाचली. पैसे by असंका
अश्या प्रसंगांमधे बरेचं वेळा
@तसा त्यांचा माझा परिचय हा
ह्यापेक्षा भारी उपाय सांगतो.
In reply to @तसा त्यांचा माझा परिचय हा by अत्रुप्त आत्मा
उपाय...
In reply to ह्यापेक्षा भारी उपाय सांगतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अश्या वेळेला उद्या चा वादा
In reply to उपाय... by योगी९००
स्नेहाताई
धन्यवाद,
तुम्हालाही पोर बाळ आहेत
In reply to धन्यवाद, by सस्नेह
तुम्हालाही पोर बाळ आहेत
In reply to धन्यवाद, by सस्नेह
मी कधी कधी दिलेत आणि विसरून
हा हा हा
अनुभवातून आलेले शहाणपण.....
माझा असाच एक चेन्नईचा मित्र