Skip to main content

मन दुणे मन

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
. . मन चिमणं पाखरु, उंच आभाळासी जाई. मन पिंजऱ्यातील पक्षी, बंध तोडूही न पाही. मन ग्रीष्मासम तप्त, शिशिर गारवा मनात. वर्षाधारा संतत बरसत, ऋतु बदलती क्षणात. खोल मनाचिया डोही, तळ कसा तो गाठावा. चिरंतनाचे गूढ मनी, शोध कधी न लागावा. दूरवर पल्याड मनाचिये गाव, ठाव तयाचा लागता न लागे. शोध घेऊनी शिणला जीव, कुठवर धावावे त्याचिया मागे. मन उभे ऐलतीरी, मन पैलतीरासी जाई. मना ओढ किनाऱ्याची नाव भरकटत राही. मनाचिये गुंती, अडकतो जीव. तुटता तुटेना,सुटता सुटेना, घट्ट बांधियेली वीण. - नीलमोहर. . 1 . .

वाचने 7397
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

खोल मनाचिया डोही, तळ कसा तो गाठावा. चिरंतनाचे गूढ मनी, शोध कधी न लागावा >>> हे भारी आवडले !