✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

करू तो क्या करू ?

स
सुजल यांनी
Wed, 09/30/2015 - 13:08  ·  लेख
लेख
मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही. तर झाल काय एकदा मी मोठ्या कानातल्या रिंगा अशाच खरेदी केल्या . त्या रिंगा बर्याच म्हणजे अगदी बर्याच मोठ्या होत्या आणि तीन चतुर्थावश्य होत्या म्हणजे पूर्ण गोलाकृती नव्हे. घेतल्या घेतल्या आणि लगेच दुसर्या दिवशी ऑफिस ला जाताना घातल्या पण . काय ती हौस ताबडतोब वापरण्याची. जाताना स्टेशन पर्यत रिक्षानीच गेले त्यामुळे काहीच घडल नाही किव्वा काहीच जाणवलं पण नाही पण स्टेशन वर मी पाऊल ठेवलं काय आणि गाडीची वाट बघत उभी राहिले काय तर सगळे जण माझ्या कडे बघताहेत अस जाणवलं. पहिल्यांदी सगळ ठीक ठाक आहे ना चेक केल. सगळ तर व्यवस्थित होत मग लोक अशी सेलिब्रिटी कडे बघाव अशी का बघत होती माझ्याकडे ? सगळ्यांच्या नजरा माझ्या कडेच होत्या. विचारच करत होते रातोरात काय बदल झाला माझ्यात . एकाच रात्रीत मी काय माधुरी दीक्षित सारखी वगैरे दिसायला लागले कि काय ? एखाद मिनिटच काय झाल असेल तेवढ्यात लांबच्या एका बाईने कानाला हात लाऊन काय? अस हातानी विचारल . मला काहीच कळल नाही. खरच नाही . कानाला कशाला हात लावतेय ? पण मग लगेच दोन मिनिटातच उलगडा झाला . एक कॉलेज कुमारनी जवळ येउन सांगितलं "म्याडम तुमच्या कानातली रिंग पडायला आलेय". त्याला काय सांगणार ती तशीच आहे म्हणून. दुसर्या साईड ने दुसरा मनुष्य कानाला हात लाऊन "म्याडम तुमच्या कानातली रिंग पडणार आहे आत्ता."अस सांगत आला . आत्ता मला उलगडा झाला मला अचानक प्राप्त झालेल्या सेलिब्रिटी पणाचा .तेवढ्यात जवळच्या बाईने पण सांगितलं " कानातल पडणार आहे तुमच्या " हे सगळं गाडी येण्याच्या मधल्या वेळात. अरे रामा. इतक का लक्ष असत लोकांच ? मला वाटल धावत स्टेशन मास्तरच्या केबिन मध्ये जाव आणि "अनाउन्समेंट" करावी "माझ्या कानातल आहे ना ते खोट आहे आणि ते तसच "तीन चतुर्थांश" आहे. ते जरी आत्ता पडणार आहे कि काय अस वाटत असल तरी ते पडायला आलेल नाही. ते तसच आहे .तेव्हा समस्त पब्लिक ला काळजी नसावी ".पण मी तो विचार क्यान्सल केला ( हाहाहाहा )आणि कानातले काढून निमूटपणे पर्स मध्ये टाकले. तेवड्यात गाडीही आली आणि ऑफिस मध्ये पोचले . हुश्य . सही करून स्वताच्या सीट वर स्थानापन्न झाले काय आणि शेजारी बसणारीने विचारलं अग कानातल आहे कुठे तुझ्या ? विसरलीस कि काय घालायला? मी दिग्मूढ." अरे " कानमे डालो तो भी मुश्किल और न डालो तो भी . जिये तो जिये कैसे "
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
3275 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

हा हा हा…भारीच!

चांदणे संदीप
Wed, 09/30/2015 - 13:12 नवीन
मस्त लिहिलंय. गाढव आणि बापलेकाची गोष्ट आठवली! :)
  • Log in or register to post comments

ऐसेही! और कैसे! :-)

एस
Wed, 09/30/2015 - 13:19 नवीन
ऐसेही! और कैसे! :-) खुसखुशीत लेख.
  • Log in or register to post comments

आवडेश!

दमामि
Wed, 09/30/2015 - 13:47 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments

वा ! मस्त अनुभव..

खटपट्या
Wed, 09/30/2015 - 13:48 नवीन
वा ! मस्त अनुभव..
  • Log in or register to post comments

वाहवा...!

द-बाहुबली
Wed, 09/30/2015 - 14:19 नवीन
वाहवा...! (हे तारिफ मुक्तपिठीय नाही बरंका...)
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
Wed, 09/30/2015 - 14:49 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

करू तो क्या करू ? ...

शित्रेउमेश
गुरुवार, 10/01/2015 - 09:47 नवीन
करू तो क्या करू ? ... खिंक्क्क्क्क्क
  • Log in or register to post comments

हा हा हा ... स्त्री वर्गाच्या

मदनबाण
Fri, 10/02/2015 - 06:23 नवीन
हा हा हा ... स्त्री वर्गाच्या डब्यातील विक्रेत्यांचा संयम हा उच्चकोटीचा असतो... हे नको, असचं दुसर्‍या रंगामधे आहे का ?, किती ट्रे आहेत ? ३ ट्रे चाळुन परत झाल्यावर ऑर व्हरायटी नही है क्या ? इतके आणि याहुन अधिक प्रश्न तो बिचारा एकटाच झेलत असतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shake... Shake... Shake... That B**ty... ;) :- Balwinder Singh Famous Ho Gaya
  • Log in or register to post comments

मस्त लेख

नाखु
Fri, 10/02/2015 - 10:41 नवीन
तसही लोकांना सोताच्या मनात बघण्यापेक्षा दुसर्याच्या कानात बघायची खोड असतेच की !!!
  • Log in or register to post comments

जमलाय लेख मस्तं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 10:54 नवीन
जमलाय लेख मस्तं बाकी
अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत.
पायाच्या नखाला क्लिपा का लावतात हो =))!!! (अडाणी भोळाभाबडा सज्जन समंजस चौकस) कॅजॅस्पॅ!!
  • Log in or register to post comments

अरे सोरी सोरी लिहिताना

सुजल
Fri, 10/02/2015 - 20:35 नवीन
अरे सोरी सोरी लिहिताना काहीतरी गडबड झालेली दिसतेय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं लेख. मजेदार लिहिलंय.

पद्मावति
Fri, 10/02/2015 - 11:04 नवीन
मस्तं लेख. मजेदार लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments

ही ही :)

रातराणी
Fri, 10/09/2015 - 08:46 नवीन
ही ही :) राहून गेलेलं वाचायचं. हलकफुलक छान आहे.
  • Log in or register to post comments

हा हा हा मस्त खुसखुशीत

अमृत
Fri, 10/09/2015 - 10:06 नवीन
गाढव आणि बापलेकाची गोष्ट आठवली :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा