भरली भेंडी –प्रकार दुसरा.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
5 Sep 2015 - 10:25 am

श्रावण विशेष म्हणून केली जाणारी नौधारी किंवा सातधारी भेन्डीची ही अजून एक भाजी.पण प्रकार पहिला मधली भाजी कांदा,लसूण न वापरता केलेली.आणि ही रविवार, मंगळवार,बुधवार,शुक्रवारी करायची चमचमीत भाजी.ही मात्र माझ्या आईची कृती.माझ्या धाकट्या भावाला माशांची फार आठवण व्हायची.त्याला फसवण्यासाठी आई ही वापरायची.

तो तीन/चार वर्षांचा असताना त्याच्या अजाणतेपणाचा फायदा त्याला समजवण्यासाठी आई घ्यायची.त्याने,’’आज बुधवार आहे ना?भाजी का वाढते?’’ असे विचारले की,त्याच्या ताटात पॅनमधली खालची बाजू वर येईल असे वाढत असे.वर आमच्याकडे पाहून ती डोळे मिचाकावत ती म्हणायची,’’कुठे भाजी? बोंबील आहे तो भरलेला?”

‘’पण हा बोंबील भाजीसाराखा हिरवा दिसतोय.”तो आमच्या कोणाच्या तरी ताटात दिसणाऱ्या हिरव्या भागाकडे पाहून म्हणे.
”अरे त्याला हिरवं वाटण लावलंय आज”. आई स्पष्टीकरण देई आणि म्हणे ,”ए तुम्ही जेवा बघू पटापट,मी आज माझ्या बाळाला भरवणार आहे.बघू कोण जिंकतंय ते?’आणि स्वत: त्याला भरवीत असे.

‘’अग, पण यात काटे नाहीत,”या त्याच्या प्रश्नावर वर तिचे उत्तर ठरलेले असे,”अरे, आता कुठे पाऊस सुरु झालाय त्यामुळे समुद्राच्या शेतातले ते कोवळे बोंबील आहेत.अजून त्यांना काटे फुटले नाहीत.” त्या भेंडीतल्या बिया दाखवून ती म्हणे,’’या बघ.अजून काट्यांच्या बिया आहेत.’’आणि जेवण पूर्ण होई.

आता आई नाही पण तो भाऊ मात्र श्रावण गणपतीपर्यंत पाळतो.आता त्याच्या छोट्या मुलीसाठी ह्या नाटुकल्याचा यशस्वी प्रयोग दरवर्षी होतच राहतो.भाऊ लेकीला भरवत असतो,आईचे संवाद म्हणत असतो पण त्याच्या जागी मात्र मला आई दिसत असते.दिसता दिसता दिसेनाशीही होते.

ही नेहमीच्या भेंड्यांची पण छान होते.चला तर, साहित्य जमवू एका ठिकाणी.

साहित्य:-

१. साताधारी किंवा नऊधारी भेंडी.

.

२. एक वाटी ओले खोबरे.

३. दोन कांदे.

.

४. एक लसणीचा कांदा.

.

५. अर्धी वाटी कोथिंबीर.

.

६. एक ते दोन हिरवी मिरची.

.

७. थोडंसं आलं.

.

८. एक चहाचा चमचा मिरचीपूड.

९. अर्धा चहाचा चमचा धणेपूड.

१०. अर्धा चहाचा चमचा गरममासालापूड.

११. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.

.

१२. दोन चहाचे चमचे लिंबाचा रस.

.

१३. मीठ चवीनुसार.

.

१४. एक चहाचा चमचा साखर.(फोटो नाही.)

१५. अर्धी वाटी तेल.
.

१६. फोडणीसाठी,हिंग,मेथीदाणे,मोहरी.(फोटो नाही.)

कृती:-

१. भेंडी धुवून,पुसून दोन भाग करून एका बाजूने चीर द्यावी.

२. कांदे जाड चिरावेत.

३. लसूण सोलून घ्यावा.

४. आल्याच्या चकत्या कराव्यात.

५. दोन चहाचे चमचे तेलावर कांदा आणि लसूण परतावा.

६. थोडे परतल्यावर आल्याच्या चकत्या आणि खोबरे घालून खमंग भाजून घ्यावे.

७. उतरून गरम असतानाच त्यात मिरचीपूड,धणेपूड,हळदपूड, गरममासालापूड घालून ढवळावे.त्यातकोथिंबीर दडपून ठेवावी.

८. थंड झाल्यावर लिंबूरस,मीठ,साखर घालून मिक्सरमधून पाणी न घालता वाटावे.

.

९. भेंडीमध्ये हा मसाला भरून घ्यावा.

.

१०. पसरट पॅनमध्ये उरलेले तेल घालून हिंग,मेथीदाणे,मोहरीची फोडणी करावी.

११. त्यात भेंडी घालावीत,शक्यतो एकच थर लावावा.

.

१२. उरलेला मसाला थोडे पाणी मिसळून त्यावर पसरावा.
.

१३. थोड्या वेळाने भेंडी परतावी.
.

१४. दुसऱ्या बाजूने झाली की उतरावी.

.

वरण-भात,चपाती ,पुरी कशाबरोबरही सुरु करू शकता.

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

5 Sep 2015 - 10:30 am | मनिमौ

अजून येऊदेत

मांत्रिक's picture

5 Sep 2015 - 10:32 am | मांत्रिक

सुंदर आहे पाकृ! अतिशय मस्त!!!

रुस्तम's picture

5 Sep 2015 - 2:28 pm | रुस्तम

मस्तच...

सुहास झेले's picture

5 Sep 2015 - 4:52 pm | सुहास झेले

मस्तच... :)

त्रिवेणी's picture

5 Sep 2015 - 6:13 pm | त्रिवेणी

भेंडी आवडती.
फ़क्त भेंडीचे रस्सा टाइप प्रकार नको वाटतात.

उगा काहितरीच's picture

7 Sep 2015 - 9:44 am | उगा काहितरीच

बाडिस !
-मेसमधे चिकट भेंडी खाऊन वैतागलेला बॅचलर

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2015 - 9:31 pm | पिलीयन रायडर

मस्त खमंग!!
खुप छान लिहीलयस ताई!

अजया's picture

6 Sep 2015 - 9:39 pm | अजया

छानच आहे पाकृ.

ही भेंडी कदाचित आवडेल मला :)

प्रीत-मोहर's picture

7 Sep 2015 - 11:30 am | प्रीत-मोहर

ह्या रेशीपीचीच वाट बघत होते

सस्नेह's picture

7 Sep 2015 - 11:40 am | सस्नेह

चमचमीत !

पैसा's picture

7 Sep 2015 - 7:18 pm | पैसा

मस्त पाकृ. आणि आईच्या आठवणीमुळे लिखाण जास्त भावले!

विशाखा राऊत's picture

8 Sep 2015 - 3:08 am | विशाखा राऊत

मस्तच... तोपासु :)

आता भेंडी आणली की हाच प्रकार करणार. छान पाकृ.

छान प्रकार ताइ.करुन पहाते.
आइची आठवण किती सुरेख लिहीली आहेस.

स्रुजा's picture

8 Sep 2015 - 11:58 pm | स्रुजा

खुप सही लिहिलयेस ताई, शाकाहारी रेसिपींची फॅन तुझ्या :)

किती सुंदर लिहिलंय ग ताई . मस्त पाकृ

सानिकास्वप्निल's picture

15 Sep 2015 - 12:05 am | सानिकास्वप्निल

छान आहे पाकक्रुती, पुढल्यावेळी अशी करुन बघेन :)

मदनबाण's picture

15 Sep 2015 - 2:32 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne

पदम's picture

15 Sep 2015 - 2:36 pm | पदम

एक प्रकार नक्कि करणार. मस्त.