Skip to main content

चेहरे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 31/08/2015 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आश्वासनास भुलले चेहरे काळोख पीत निजले चेहरे हातात आंधळ्यांच्या, बंदुका.. रक्तात हाय, भिजले चेहरे! त्यांची नज़र ढगांना बोचली अन् वावरात रडले चेहरे मी कळवळून गातो मर्सिया अन् दाद देत बसले चेहरे लिहतोस तू कुणासाठी गझल त्यांचे कधीच थिजले चेहरे ---------------------------- आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:- सगळेच काय दडले चेहरे? काही फुलांत दिसले चेहरे मातीत काय शोधीशी अता? झाले विलीन, लपले चेहरे मूळ शेर :- सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई
लेखनविषय:

वाचने 1619
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त

In reply to by संजय पाटिल

मर्सिया म्हणजे विलापगीत. एखाद्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करायला लिहीलेली कविता म्हणजे मर्सिया. मूलतः मर्सिया हुसैनच्या शहादतवर(कर्बलाच्या लढाईत शहीद झालेले) रचल्या जाणार्‍या रचनांना म्हणतात.