बुद्धिभेद
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बुद्धिभेद
पेपर, टीव्ही, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी घटत्या उपयोगितेच्या
( हेन्री फियोल ) पलीकडे गेल्या आहेत. ( मी पा अपवाद :) ).जे काही वाचनात येत त्यावर परस्पर विरोधी मत वाचायला मिळतात. नीरक्षीर विवेक बर्यापैकी जागृत असल्याने काय घ्यायचं न काय सोडायचं हे स्वत:ला ठरवता येतं. पण माध्यमांच्या त्सुनामी मध्ये एकाच बातमी इतक्या वेग वेगळ्या प्रकारे वाचायला / पाहायला /ऐकायला मिळते कि यातला खरा कोण हे शोधणं कठीण होतंय. आपला मुद्दा मांडणे वेगळ नि वाद घालणे वेगळ, हा गोंधळ कुठेतरी आपल्या निर्णय क्षमतेवरच घाला घालतोय. सतत काहीतरी इतकं ठासून सांगितल जात कि एकावेळी जे जास्त लाउड पणे आपल्यावर आदळता त्यावरच विश्वास ठेवला जातो, आमची मत आम्हालाच ठरवु द्या. तुमच्या
बार्किंग न्यूजपायी आमच्या विचार शक्ती बंधनं आणू नका. पण इथे मध्यामाना दोष देवून तरी काय उपयोग बातमी देणारे / लिहिणारे यांचा अग्रक्रम प्रसिद्धी / पैसा / पोट हेच आहेत . अगदी सर्वसामान्य विचार केला तर पोटासाठी हे केला जातं असाच मला वाटतंय . पण ज्या प्रकारे हे सगळ आपल्यावर आदळत असतं त्यात विचारशक्ती क्षीण करण्याचे कारस्थान जास्त दिसत . कुणालातरी फॉलो करायचं म्हणजे
" बाबा वाक्यं प्रमाणं "वाटचाल सुरु आहे असे वाटते. कोणताच मध्यम तटस्थ भूमिका घेत नाही, किंबहुना ते घेउच शकत नाहीत. तिथे TRP नफा तोटा ही गणितं आहेत. पण निर्णय क्षमता बाल्यावस्थेत असलेल्याचे काय ? त्यांना कोण समजावून सांगणार. जे भडक, कर्कश्य आणि उथळ आहे त्यालाच स्वत:चे मत बनविताना प्रध्यान दिले जातंय अथवा जाईल. आपल्या आडाख्यांवर इतके आघात माध्यम करत असतात की सारसार विचार करणारा मौन पाळणेच योग्य समजतो. साधारणपणे निर्णय कसा घ्यावा हे कुणी शिकवत नाही , ते निरीक्षांतूनच आपण शिकतो . पण आज
"जाणती" माणसाचं कलहाला प्रोत्साहन देत असतील तर त्याचे परिणाम काय होतील ??
एक निरीक्षण : आजची सुशिक्षित पिढी आपली मतं ( reviews / लाईक्सं ), नि माध्यमांच्या लोकप्रियते वरून ठरवते आहे. हे घातक आहे, आपला बुद्धिभेद होत आहे …… त्यातुन कुणाला नि कसा सावरायचं हे मला तरी उमगलेला नाही .
प्रतिक्रिया
मस्त लेख..
(अआमिनलेप्रोस)- जेपी
सेम पिंच.
'इन द लाँग रन वी विल बी डेड..
इन द लाँग रन वी विल बी डेड....'
अजून काही वर्षांनी न्याय व्यवस्था पण
अजून काही वर्षांनी न्याय व्यवस्था पण
नुकतेच वाचले की बँकासुध्दा