सुट्टे पैसे
रेल्वेच्या तिकीट खिडकीवर भली मोठी रांग लागली होती. १५ मिनिटे गेली त्याला पुढे पोहचायला. या वेळेत मागे उभ्या असलेल्या आजोबांची कुरकुर कित्येकदा कानी आली. स्वताच तिकीट काढून उरलेले सुट्टे पैसे घेण्यासाठी थांबला. इतक्यात शेजारचा संवाद कानी आला.....
''अहो आजोबा २ रुपये सुट्टे दया''
नाहीत हो माझ्याकडे सुट्टे कुठून आणू?
''मग घेऊन या सुट्टे बाहेरून''
आजोबा हताश नजरेने आजूबाजूला पाहत होते, याचवेळी त्याला खिडकीतून त्याच्यासाठी पुढे केलेले पैसे दिसले..
''एक काम करा यांना तिकीट दया त्याचं..हे सुट्टे तुम्हीच ठेवा.....अस बोलून क्षणात निघून सुद्धा गेला तो.....
याद्या
1642
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
वरातीमागून घोडं काय हो????
असच काहिस....
In reply to वरातीमागून घोडं काय हो???? by दमामि
महादुष्ट असतात रेल्वेवाले!!!
प्रयत्न आवडला
:-)
चांगली लिहिलीये कथा!