भाउसाहेबांना नक्की काय म्हणायचे ते समजलेच नाही !
पण जीवनाकडे अश्या 'माझीच जबाबदारी' या दृष्टीकोनातून बघणे म्हणजे इतर अनेक आयामांकडे दुर्लक्ष करुन, यश मिळत आहे तोवर आनंद मानत राहण्यातला प्रकार वाटतो. असो.
मतमतांतरातून 'माळिये जेउते नेले तेउते निवांतची गेले!' याचा प्रत्यय बहुधा म्हातारपणीच येत असावा. (मी म्हातारा झालो की कळेलच मला.)
तोवर 'तुका म्हणे उगी रहावे। जे जे होईल ते ते पहावे' या ईश्वर वगैरे कल्पना मध्ये न आणणारार्या वचनावर विचार करतो आहे.
--लिखाळ.
लिखाळजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"भाउसाहेबांना नक्की काय म्हणायचे ते समजलेच नाही !" असं म्हणून,
आपण म्हणता,
"तोवर 'तुका म्हणे उगी रहावे। जे जे होईल ते ते पहावे' या ईश्वर वगैरे कल्पना मध्ये न आणणारार्या वचनावर विचार करतो आहे."
हेच तर भाऊसाहेबांना म्हणायचं आहे.
म्हणून ते शेवटी म्हणतात,
"जोपर्यंत आपलं काम आपल्याला समाधान देतं,आणि जोपर्यंत आपण आपल्या कामाशी एकरूप असतो,तोपर्यंत आपल्याला सुख मिळत राहतं."
म्हातारपणी तर "हरी,हरी" करण्या पलिकडे जबाबदार्या राहिलेल्या नसतात.
त्यावेळी फक्त "ऐका रे,कानानो.आणि बघारे,डोळ्यानो!"
एव्हडंच करावं लागतं.भाऊसाहेबांचा हाच म्हातारपणचा अनुभव असावा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
अदचणीना समोर जातो.. सामोरा जात नाही.
म्हातारपणाचा अनुभव