मदत / सल्ला हवा आहे

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
16 Jul 2015 - 12:24 pm

प्रत्येक माणसाला उपजतच किंवा न कळत्या वयापासूनच कसली तरी भीती वाटत असते. अशी भीती ही बर्याचदा कोणाकडून तरी दाखवली गेलेली असते उदा. पाल, उडते छोटे किडे, झुरळ, अंधारी खोली, किंवा एखादी निर्जीव वस्तू देखील. अशी भीती काळानुसार कमी होते किंवा निघून जाते पण जर कळत्या वयात येउन त्या भीती मध्ये काहीही फरक पडला नाही तर काय करावे?

कारण अशा वेळी ती भीती हे खिल्लीचे कारणही ठरू शकते. जर ती भीती जनमानसात उघड झाल्यास त्या व्यक्तीला उगाच त्रास देण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

१) अशी भीती दूर करण्यासाठी काही शात्रीय उपाय आहेत का ?
२) ज्या वस्तू किंवा प्राण्याची भीती वाटत आहे अश्या गोष्टीजवळ मुद्दाम नेणें किंवा ती हाताळण्यास देणे असे प्रकार करूनही जर ती भीती कमी होत नसेल तर काय करावे ?
३) अश्या वेळी संमोहन शास्त्राचा उपयोग होऊ शकतो का?
४) मानसोपचार पद्धतीमध्ये भूल देऊन अशी भीती मनातून काढता येते का ?
५) अगदी रात्री झोपेमध्येसुद्धा त्या भीतीमुळे दचकणे, ओरडत उठणे, रडणे असे प्रकार होत असतील तर सगळ्यात परिणामकारक आणि जलद उपचार पद्धती कोणती?

समाजसल्ला

प्रतिक्रिया

श्याम मानवांचे प्रयोग पाहीले असता स्वसंमोहनाचा उपयोग होउ शकतो असे वाटते.

संमोहनशास्त्र आणि मानसोपचार या दोहोंमुळे नक्कीच फरक पडतो अशा केसेस मध्ये.

पैसा's picture

16 Jul 2015 - 1:06 pm | पैसा

मानसोपचार हवेतच. इतर स्वसंमोहन वगैरे स्वतः करून किती फायदा होईल माहीत नाही. मुद्दाम त्या भीती वाटणार्‍या वस्तूच्या समोर नेले तर कदाचित शॉकमधे जाणे, भीतीचे मोठे अटॅक येणे असले काही होण्याचीही शक्यता असतेच. तेव्हा सर्वात आधी जवळच्या सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जाणे उत्तम. जर कौन्सेलरला भेटून पुरेसे असेल तर ते सांगतीलच.

पद्मावति's picture

16 Jul 2015 - 3:58 pm | पद्मावति

मला स्वत:ला एक फोबीया आहे. तुम्ही म्हणालात तसं ते जरा खिल्लीचही कारण होतं कधी कधी. सगळे सांगतात इतक्या निरुपद्रवि प्राण्याची कसली भीती वगैरे....मला स्वत:लाही पटतं की माझी भीती किती इल्लॉजिकाल आहे ती. पण मग लॉजिकल असेल तर तो फोबिया कसा? शास्त्रीय उपाय मी करून नाही बघितला पण मला वाटते की दूसर्या क्रमांकाचा उपाय कधीही करू नये. असे केल्यास त्या माणसासाठी ते फारच भयंकर ट्रोमाटिक होईल. म्हणजे भीती घालवायला जावं तर भलतच होईल.

माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने मला साउंड थेरेपि ने फोबिया चा इलाज होऊ शकतो हे सांगितले. पण मला काहीच या थेरेपि विषयी काहीही माहीत नाही. कोणा जाणकाराकडून माहिती काढून उपाय केला तर फायदा होऊ शकतो निदान अपाय तरी होणार नाही असा माझा अंदाज आहे.

काही फोबियाचा आयुष्यभर इलाज नाही झाला तर हरकत नसते पण हो जर खूपच त्रास होत असेल, त्याच्या दैनंदिन आयुष्यात त्या भीतीने अडचणी येत असतील तर मात्र मानसोपचार, किवा कुठलेही उपचार नक्कीच करावेत.

शि बि आय's picture

16 Jul 2015 - 4:09 pm | शि बि आय

भीती काढण्यासाठी केलेले मानसोपचार भूल देउन केले जातात का ह्या विषयी हि माहिती हवी होती कोणी जाणकार असल्यास कृपया ह्यावर प्रकाश टाका

हे मानसोपचार भूल देऊन केले जात नाहीत. बिहेव्हिअरल थेरपीतली काही टेक्निक्स वापरून केले जातात. आवश्यक वाटल्यास मानसोपचारक काही औषधे पण देऊ शकतात.

धाग्यावर लक्ष ठेवून आहे. २ नंबरचा उपाय करण्याचे धाडस करून झाले आहे. घरी कोणी नसताना अथक प्रयत्न करून तो प्राणी मारला. पण त्यानंतर आलेल्या ट्रौमाने ३-४ दिवस रात्रंदिवस थरथरत होते. अजूनही त्या प्रसंगाची स्वप्ने पडतात आणि घाबरून जाग येते. त्यामुळे हा उपाय मी माझ्यापुरता तरी अघोरी ठरवला आहे. बाकी मानसोपचार / संमोहन वगैरे बद्दल माहिती मिळाली तर खूप उपयोगी ठरेल.

समीरसूर's picture

17 Jul 2015 - 12:08 pm | समीरसूर

बेधडक सामोरे जाणे हा सोपा इलाज. बायकोला उंचीची भीती वाटते तरीही आयलेंड्स ऑफ एडवेंचर (ओरलान्डो) इथल्या सगळ्या थरारक rides करायला लावल्या. पेरासेलिंग करायला लावले. आता ती आरामात करते. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेक प्रकारच्या भीती जास्त गुंतागुंतॆच्या असतात हे अगदीच मान्य. पण थेट भिडणे जास्त परिणामकारक असावे असे वाटते. अर्थात सोबत हळुवारपणे बळ देणारा नक्कीच हवा.

मानसोपचारतज्ञ - माहित नाही. फार उपयोग होईल असे वाटत नाही. शक्यतो टाळलेले बरे.

तुडतुडी's picture

17 Jul 2015 - 2:32 pm | तुडतुडी

मानसोपचारतज्ञ - माहित नाही. फार उपयोग होईल असे वाटत नाही. शक्यतो टाळलेले बरे.>>>+१११११११११
मानसशास्त्र म्हणजे फक्त शब्दांचा खेळ आणि झोपेच्या गोळ्या .

मितान's picture

17 Jul 2015 - 2:34 pm | मितान

नवीच माहिती :))

असो....

असो....