Skip to main content

सदाहरित धागा -आपल्या मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..- भाग १

सदाहरित धागा -आपल्या मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..- भाग १

लेखक गवि
Published on शुक्रवार, 12/06/2015 प्रकाशित
सदस्यहो.. हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत. एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो. त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे. शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील. शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत. माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की: कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?

याद्या 6
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया