पाताळेश्वर आणि अन्य कोरीव लेणी
लेखनप्रकार
वाचने
1887
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
शशिकांतकाका प्रश्नांचा आवाका फारच मोठा आहे हो.शिवाय अडीच हजार वर्षांचा काळ लेण्यांसाठी पाहावा लागेल.जैन आणि हिंदु धर्माचा विचार साडेचार हजार वर्षांचा आहे.काही कालखंडाचा भाग थोडा संदिग्ध आहे तो सोडला तर इतिहासकारांनी बाकीच्या घटनांची सांगड घालण्यात यश मिळवले आहे. मराठीतल्या दोन विश्वकोशांत मिळणारी माहिती आपण पाहिलीत असेलच.इथे सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात संगतवार मिपाकर लिहितील तर एक कायमचा संदर्भलेख घडेल यात शंकाच नाही.
कदाचित वल्ली यांच्या समावेत या विषयावर चर्चा झाली तर बरेच काही समजू शकेल.
नक्कीच !!
कट्ट्यात वल्लींंशी झाली...
शिवाय शरद हार्डीकर सरांशी ही या विषयावर बोलणे झाले त्यांनी वरील धाग्यातील काही भागावर लिहायला हवे म्हटले. वाट पाहू या ...
मीही याबद्दल थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे काही याविषयी मूळ संशोधन नाही केवळ निरनिराळ्या ठिकाणाहून वाचलेली ,ऐकलेली माहिती मांडणार आहे.
हजारोंच्या संख्येने ..., ....चे अनुयायी अशा गूहावजा जागेत राहत असतगूहा आणि किल्ले हे प्रकार ज्ञात इतिहासापेक्षा प्राचीन काळापासून मानवी वापरात असावेत. (तौलनिक) सुरक्षीत रहवास हा गूहा आणि किल्ल्यांच्या वापरा मागचा हेतु असू शकतो. गूहा आणि किल्ल्यांचा वापर कोणत्याही विशीष्ट धर्म पंथापुरता मर्यादीत अथवा प्रचलीत असेल असे वाटत नाही. त्या त्या काळात ज्या ज्या धर्म पंथांचा प्रभाव असेल ते ते लोक त्या त्या काळातील गूहा आणि किल्ल्यात आढळावयास हवेत असे वाटते. दुसरे असे की किल्ले आणि गूहांचा उद्देश्यच सुरक्षा आणि लपणे असा असावा. उंचावरून खालून येणारी श्वापदे असोत अथवा शत्रू असोत त्यांना परास्त करणे सोपे जात असावे. मध्ययूगातही सर्व सज्ज बादशहा आणि सम्राटांना किल्ले मिळवण्यासाठी महिनोंमहीन्यांचा तळ ठोकल्या शिवाय अथवा आतून फितूरी झाल्या शिवाय किल्ले घेणे शक्य होत नसावे. आख्ख्या भारतावर सत्ता गाजवणार्या मोगलांना दिल्लीहून जवळ असलेला उत्तरांचल प्रदेश घेता आला नाही कारण पहाडी लढाया त्या काळातही कठीण होत्या आजच्या काळातही कठीणच असतात. पर-प्रदेशातून येणार्यांना एकवेळ किल्ले सहज मिळू शकतात सर्व गूहा माहित होणे, धागा लेखक म्हणतो तसे हजारोंच्या संख्येने निघृण हत्या व्हाव्यात एवढे सहज शक्य नसावे. हजारोंच्या संख्येने हत्त्याकरणारे गूहातील पुरावे नष्ट करण्याच्या भानगडीत पडणार नाहीत जर पुरावे नष्ट केले गेले नसतील तर जेवढे आर्कीऑलॉजीकल एव्हीडन्स प्राप्त व्हावयास हवेत तेवढे आर्कीऑलॉजीकल एव्हीडन्स पुढे येताना दिसत नाहीत. मध्ययुगीन काळापर्यंत राजसत्ता कुणाचीही असो राजसत्तेस उत्पन्नाचे मुख्य स्रोत तीन असावेत १) लढायांमध्ये परप्रदेशात केलेल्या लूटी २) दुसर्या राजांकडून घेतलेल्या खंडण्या हि दोन उत्पन्ने केवळ युद्ध काळातच मिळत, शांतता काळात मिळणारे रेग्युलर उत्पन्न परकीय व्यापार्यांवर बसवलेले आयात कर २) नजराणे ३) शेतसारा. हे सांगण्याचे मुख्य कारण हे की शेतसारा हे एक मुख्य उत्पन्न होते ज्यासाठी शेती होणे गरजेचे होते शेती माणूसबळावर अवलंबून होती त्यामुळे सरसकट वांशिक हत्येने राजसत्तेचेच आर्थीक नुक्सान अधिक संभवत असावे. राजसत्तांकडून नियंत्रणासाठी जरब बसवण्यासाठी दहशत बसेल अशा शि़क्षा देणे हा मुख्य मार्ग होता, युद्धकाळात केवळ येणार्या बातम्यातूनच जरब बसावी म्हणून लूटींसोबत अधिक निघृणतेचे प्रदर्शन होत असावे नाही असे नाही. धर्माचा उपयोग सैनिकांच्या निष्ठा टिकवण्यासाठी काही प्रमाणात निश्चित होत असणार पण युद्धकालीन निघृणता राजसत्ताधिशाचा धर्म कोणताही असो ती युद्धकाळात सहसा होत असे अशी उदाहरणे बर्याच धर्मांच्या पार्श्वभूमी असलेल्या राज्यकर्त्यांबाबत मिळतात यात इतरवेळी शांतीप्रीय म्हणवल्या जाणार्या धर्मांच्या अनुयायी (पण प्रत्यक्षात हिंसक मार्गांचा स्विकार केलेल्या) राजांचा सुद्धा समावेश होतो अशी उदाहरणे इतिहासात दिसतात त्यामुळे जोतो काळ ज्या त्या परिपेक्षात बघणे अधिक रास्त ठरावे असे वाटते.
लावून पाहून प्राचीन काळापासून किल्ले,गूहा,लेणी,सरायाा,नदीच्या काठावरील घाट,समुद्री तटबंद्या याकडे पाहून मोठी चूक तर होत नाही ना?
वैचारिक प्रगल्भता,वैश्विक सत्य शोधायला प्रेरित होऊन सामान्य जीवनाचा त्याग करून जाण्यासाठी लागणारा मनाचा निश्चय,त्यांच्यांकडून केल्या गेलेला अनुभूतीजन्य ज्ञानाला समजून घ्यायला व त्यांचे अनुकरण करायला परिस्थिती निर्माण व्हायला गूहा, लेणी,नद्यांचे घाट,सराया यातील शांत वातावरण आदि गोष्टी युद्धजन्य परिस्थिती पासून दूर राहून तात्कालिक लढाया,वैयक्तिक हेवेदावे या पासून दूर राहण्यासाठी कारणीभूत होत असाव्यात...
:)
शशिकांतकाका प्रश्नांचा आवाका