मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय कसोट्यांवर न उतरणारी माहीती नवागतांकडून वेळोवेळी भरली जाते आणि जाणत्या सदस्यांकडून काळाच्या ओघात वगळली जात राहते. यातील ज्ञानकोशीय कसोट्यांवर न उतरणारी माहीती त्यातील तर्क बर्याचदा रोचक असू शकतात; मराठी विकिपीडियावरून ते वगळले जात असलेतरी इतर मराठी संकेतस्थळांच्या पोस्टींसाठी चालून जाऊ शकतात. अशीच एक अन्योन्य संबंध लागणे अवघड असलेले मत मराठी विकिपीडियावर बंजारा नावाच्या लेखात आले आहे. गोष्टींचा अन्योन्य संबंध नसूनही वाचताना रोचक वाटले म्हणून खाली देत आहे.
बंजारा गोत्र आणि त्यांची संख्या
चव्हाण- ०६ आणि निसर्गात रुतुची संख्या ०६
पवार- १२ आणि वर्षाचे महिने १२
राठोड- २७ आणि वर्षामध्ये २७ नक्षत्र
जाधव- ५२ आणि वर्षाचे ५२ आठवडे
आडे- ०७ आणि वर्षामध्ये फक्त ०७ वार[दिवस]
यावरुन बंजारा समाज किती निसर्गप्रियआहे हे दिसते. या गोत्रांचा अभ्यास होणे गरजेचे आह बंजारा समाज हा विविध जागेवर पसरलेला समाज आहे बंजारा समाजाचा उल्लेख हा अतिप्रचिन असून समाज प्रेरित आहे बंजारा समाजात विविध रूढी,परंपरा ,सन,उत्सव पाहायला मिळतात ह्या समाजात गोर, लमानि,लाभानि,लंबाड़ा बंजारा आदि गोत्र आहेत .हां बंजारा समाज गाय पूजक असल्यामुळे या समाजाला गोर ऎसे म्हटले जाते.
संदर्भ : Sanjayrathod2020 यांचे मराठी विकिपीडियावरील लेखन ता. २२:३४, ३ जून २०१५
प्रतिक्रिया
4 Jun 2015 - 8:51 pm | श्रीरंग_जोशी
रोचक आहे ही माहिती.
यावरून आठवले - कॉलेजमधील एकाने महाराष्ट्रातील बंजारा समाजावर gormati.com साइट बनवली होती. ती आता बंद पडलेली दिसत आहे.
अवांतर - तुमच्या धाग्याचे शीर्षक पूर्वीच्या धाग्यांच्या शीर्षकांच्या सरासरी लांबीपेक्षा कमी लांबीचे असल्याचे पाहून समाधान वाटले.
4 Jun 2015 - 8:36 pm | माहितगार
अवांतर - तुमच्या धाग्याचे शीर्षक पूर्वीच्या धाग्यांच्या सरासरी लांबीपेक्षा कमी लांबीचे असल्याचे पाहून समाधान वाटले. :)
4 Jun 2015 - 10:45 am | रामदास
वर्गीकरण NT 2 NT 3 असे आहे ना ?
राठोड- NT 2
मुंढे,आंधळे,नांगरे: NT 3
मुख्यमंत्री म्हणून जास्तीत जास्त वर्षे पदभार सांभाळणारे कै.वसंतराव नाईक हे बंजारा समाजाचे होते. दुष्काळ म्हटले की आधी त्यांचीच आठवण होते.