भाजणी आणि भाजणीचे थालीपीठ

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
2 May 2015 - 10:10 am

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरीच असतात. वाढत्या मुलांना सतत काही न काही चरायला आवडते. उन्हाळ्यात आधीच भाज्या महाग. खायला काय करावे हा ही यक्षप्रश्न मध्यम वर्गीय परीवारांसमोर असतो. भाजणी ही पोष्टिक असते आणि तिच्या पासून स्वादिष्ट थालीपीठे ही तैयार करता येतात. वेळ ही कमी लागतो. त्या मुळे केंव्हा ही करता येतात. सकाळच्या नाश्त्याला ही भाजणीचे थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे. स्वादिष्ट थालीपीठे मुले ही अत्यंत आवडीने खातात. मला ही थालीपीठ अत्यंत आवडते. (माझी सौ. नेहमीच म्हणत असते, या वयात ही तुम्ही लहान मुलांसारखे वागतात, केंव्हा अक्कल येणार आहे). या भाजणीच्या पिठात मुलांना न आवडणाऱ्या भाज्या - दुधी, लाल भोपळा, पालक, बीट इत्यादी बारीक किसून किंवा चिरून मिसळता येतात. शिवाय नुसते कांदे -टमाटो बारीक चिरून घातले तरी चालतात..

भाजणीत तैयार करताना अनेक धान्यांचा वापर होते, या मुळे आपण केलेली भाजणी कशी होईल या बाबतीत ही अनेकांच्या मनात संशय असतो. तसे म्हणाल तर भाजणीच्या पीठ तैयार करण्यासाठी घरात जे काही पदार्थ स्वैपाकघरात आहे, ते वापरून भाजणी तैयार करता येते. आमची सौ. गहू, तांदूळ आणि बाजरी (भरपूर लोह तत्व असल्यामुळे) सोबत, त्या वेळी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारचे धान्य आणि डाळी करून भाजणी तैयार करते. भाजणी चक्की वर जाऊन दळून आणावी लागते, म्हणून कमीत कमी ३-४ किलो तरी भाजणीचे साहित्य असायला पाहिजे. शिवाय भाजणी, चक्कीवर जाऊन प्रत्यक्ष समोर दळून घेतली पाहिजे. सौ. ने भाजणी तैयार केली होती, त्यात घातलेले पदार्थ:

मुख्य पदार्थ गहू, - १किलो, तांदूळ १/२ किलो, बाजरी १/२ किलो.

चण्याची डाळ, मुगाची डाळ (साली सकट आणि धुतलेली ), उडदाची डाळ(साली सकट), तुरीची डाळ, मोठ, मसूर, मक्का - प्रत्येकी २ वाटी. पोहे जाड २ वाटी. धने -२ वाटी. या शिवाय तुमच्या घरी असतील तेवढ्या प्रकारचे कडधान्य भाजणीत वापरता येतात. सर्व पदार्थ मध्यम गॅस वर वेगळे वेगळे भाजून घ्या. प्रत्येक पदार्थाला ४-५ मिनिटे लागतात, घाई करू नका. रात्रीच्या निवांत वेळी हे कार्य केले कि उत्तम. (दरवर्षी असल्या प्रकरचे, कार्य मलाच करावे लागते). नंतर चक्की वर पीठ दळून घ्या. हे पीठ वर्षभर खराब होत नाही. पावसाळ्यात ही टिकते.
भाजणीचे पीठ

शनिवारी संध्याकाळी भाजी बाजारातून सौ. परत आली. भाजीत लाल भोपळा ही होता. घरी पाहुणे म्हणून आलेली १२-१३ वर्षाच्या चिमुरडीने लगेच आपले मत व्यक्त केले, मावशी, मला लाल भोपळा आवडत नाही. आजकालच्या मुलाचं एक चांगल, आपलली मते व्यक्त करायला ते मुळीच घाबरत नाही. पण त्या चिमुरडीला ठाऊक नव्हते तिची मावशी किती बिलंदर आहे ते. रविवारी सकाळी सकाळीच चिमुरडीच्या उठण्या आधी सौ. ने लाल भोपळा बारीक किसून भाजणीच्या पिठात मिसळला, सोबत भरपूर कोथिंबीर , आलं, लसून आणि मिरचीची पेस्ट त्यात घातली, शिवाय जिरे-मिर्याची पूड (स्वादानुसार), थोडा चाट मसाला व मीठ घालून पीठ व्यवस्थित मळून घेतले.
मळून ठेवलेले पीठ

पाण्याच्या हात लाऊन, हातानी थापून बनविलेले थालीपीठ, तव्यावर टाकून चारी बाजूला थोड तेल सोडून, मध्यम गॅस वर खरपूस भाजून घ्या.

कैरी, कोथिंबीर, पुदिनाच्या चटणी व उन्हाळा असल्या मुळे दह्याची लस्सी सोबत गरमागरम लाल भोपळ्याचे स्वादिष्ट थालीपीठ चिमुरडीने आनंदाने खाल्ले. अर्थात तिला २-३ तासांनी तिच्या मावशीने यात लाल भोपळा घातला होता हे सांगितले, त्या वेळी चिमुरडीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

थालीपीठ

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 May 2015 - 10:25 am | पैसा

काय छळ आहे!

असो. आता त्या लस्सीची पण एग्झॅक्ट पाकृ द्या!

सुहास झेले's picture

2 May 2015 - 10:39 am | सुहास झेले

मस्तच... आता लगोलग पणशीकरांकडे जाणे आले ;-)

सविता००१'s picture

2 May 2015 - 11:04 am | सविता००१

मस्तच आहे पाकृ. पण मोठ म्हणजे काय?

विशाखा पाटील's picture

2 May 2015 - 12:48 pm | विशाखा पाटील

मोठ म्हणजे मटकी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2015 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! थालिपिठाची सगळी व्हर्शन्स आवडीची आहेत !! चटणी नसल्यास सहजी हाताला लागणारे टोमॅटो केचप वेळ सांभाळून नेते :)

नूतन सावंत's picture

2 May 2015 - 1:34 pm | नूतन सावंत

आणि लोणी??

भाजणीचं थालीपीठ आवडतं एकदम.माझ्या आईने केलेली भाजणी फार आवडते मला.डबा उघडला की खमंग वास येतो.या थालपीठात उरलेल्या भात वरण भाज्यांनी पण मस्त चव येते.

एस's picture

2 May 2015 - 3:46 pm | एस

मस्त.

अनन्न्या's picture

2 May 2015 - 5:01 pm | अनन्न्या

सुट्ट्या चालू असल्याने रोजच्या खाण्याचा प्रश्न असतोच!

सध्या केप्रच्या थालीपीट भाजणीवर वेळ मारुन नेत आहे.

स्नेहानिकेत's picture

2 May 2015 - 7:36 pm | स्नेहानिकेत

मस्त !!!!! तोंडाला पाणी सुटले फोटू बघून !!!!! गरमागरम थालीपीठ आणि त्यावर घरचे ताजे लोणी तर भन्नाट कॉम्बिनेशन आहाहा....

विवेकपटाईत's picture

2 May 2015 - 7:46 pm | विवेकपटाईत

लोणी, तूप सारखे पदार्थ सध्या तरी वर्ज्य (अर्थात थोडे फार कधी कधी खातो), बाकी लस्सी करता, काही एक लागत नाही. फक्त दही गोड पाहिजे आणि साखर. पाणी थोड कमी टाकले कि उत्तम. उन्हाळ्यात थोडा बर्फ घातला किंवा फ्रीजमध्ये थंड केली कि चालते. दुधावरची साय ही उत्तर भारतात लस्सीत टाकतात. जुन्या दिल्लीत लस्सीत 'पेढे' किंवा खोवा सुद्धा पूर्वी टाकत होते.

नूतन सावंत's picture

2 May 2015 - 10:08 pm | नूतन सावंत

आणि लोणी??

स्पंदना's picture

3 May 2015 - 2:45 am | स्पंदना

आज भाजते भाजणी.

थालीपीठाचे वेगळे प्रकार ही समजले.

रेवती's picture

3 May 2015 - 9:33 am | रेवती

पाकृ व फोटू आवडले.
लाल भोपळा मी नियमितपणे उपासाच्या थालिपिठात घालते, साध्या थालिपिठातही घातला जातो हे माहित नव्हते.

निवेदिता-ताई's picture

3 May 2015 - 1:31 pm | निवेदिता-ताई

मस्तच....... :)

चिमुरडीच्या बिलंदर मावशीचे अभिनंदन!
अतिशय स्वादिष्ट व आरोग्यदायी पाकृ टाकल्याबद्दल धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

3 May 2015 - 2:33 pm | स्वाती दिनेश

भाजणीचे थालिपीठ लाडके.. मी कांद्याची पातही घालते त्यात. भरपूर कोथिंबिरही..लोण्याचा गोळा हवाच. मुसळधार पावसात खायला खूप आवडते.

(अवांतर-तुम्ही सध्या लोणी जास्त खात नाही आहात तेच योग्य..आता तब्येत कशी आहे?)

स्वाती

रुपी's picture

6 May 2015 - 3:52 am | रुपी

छान लिहिले आहे. सुरुवातीची भाजणीबद्दलची प्रस्तावनाही आवडली. तोंपासु! चटणीबरोबर खाऊन पाहिले पाहिजे एकदा!

आता इथे कुठली चक्की आणि कुठली भाजणी? तरी केप्रची मिळते- मी तीच बाकी सगळ्या पिठांमध्ये एकत्र करते. यात मुळा किसून पण करते कधीकधी - खूप खुसखुशीत लागतात थालिपीठे.

या विषयातील मला आवड्लेले पुस्तक---स्वयंपाक घरातील विज्ञान
डॉ.वर्षा भावे
ऱोहन प्रकाशन

आरोही's picture

12 May 2015 - 12:21 pm | आरोही

मस्त !!!आजच थालीपीठ करते !!