आपण गूगल input सुविधा किंवा इतर IME सुविधा मराठी टायपींगसाठी वापरता ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
25 Apr 2015 - 1:45 pm
गाभा: 

आपणास विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव असून आणि नसून दोन्हीही लोक्सचा: wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुवा पानावर मराठी टायपींग टेस्टस (डायरेक्ट टायपींग टेस्ट, कटकॉपीपेस्ट नव्हे) करण्यात यथाशीघ्र सहभाग हवा आहे.'''

* What_to_test (काय काय टेस्ट करावे) हे पान अधिक माहितीसाठी अभ्यासता येईल.

VisualEditor-logo
’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
(लोगोचित्र सौजन्य कॉपीराइट आणि ट्रेडमार्क विकिमिडीया फाऊंडेशनचे)

:टेस्ट उद्देश: विकिमिडीया डेव्हेलपमेंट टिमला विकिपीडिया प्रकल्पात अगदी नवागतांनाही कोणत्याही तांत्रिकते शिवाय लिहिणे अधिक सोपे होण्यासाठी विकिपीडिया:यथादृश्यसंपादक पद्धतीत , गूगल input सुविधा अथवा इतर IME (input method editor) सुविधा वापरून मराठी / हिंदी देवनागरी टायपींग व्यवस्थीत जमते आहे का आणि कोणकोणत्या त्रृटी आहेत हे जाणून घ्यावयाचे आहे. (तुर्तास मराठी विकिपीडियावरील अक्षरांतरणचा यात समावेश नाही.) हे नवागतांनाही सोपे जावे म्हणून असल्यामुळे विकिपीडिया:यथादृश्यसंपादक अथवा विकिपीडियाची कोणतीही पद्ध्ती तांत्रिकता तुम्हाला आधी पासून माहित असणे आवश्यक नाही.

: आपणास जाणवलेल्या अगदी छोट्या छोट्या समस्या https://phabricator.wikimedia.org/ येथे अथवा मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद या पानावर आवर्जून नोंदवा. आणि काहीच समस्या न आल्यासही आपण कोणता ब्राऊजर आणि टायपींगसाठी कोणती पद्धती वापरली ते आवर्जून नोंदवा.

: डेव्हेलपमेंट टीमचा पूर्ण संदेश विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद#Please test VisualEditor in your language! येथे पहा.

* परिक्षणे करून असलेला दुवा wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 8:00 am | सौन्दर्य

मी मराठीत लिहिण्यासाठी गुगल इनपुट टूल्स वापरतो. तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे हे कळले नाही. थोडे साध्या शब्दांत सांगता आले आणि त्यामुळे माझी काही मदत होणार असेल तर अवश्य कळवावे.

माहितगार's picture

27 Apr 2015 - 3:21 pm | माहितगार

अगदी साधं सोप wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुव्यावर जाऊन साधारणतः दोन परिच्छेद (दोन दोन ओळींचेही चालतील) मराठीत टंकुन पहायचे. परिच्छेदाची नवीन ओळीची सुरवातीस लेखन करताना, स्पेसबार दाबल्या नंतर अथवा एंटर मारल्या नंतर इत्यादी टंकन नेहमी प्रमाणे होते आहे का काही अडचण येत आहे ? काही अडचण येत असल्यास कोणती अडचण येते ?

शेवटी महत्वाचे अडचण येत असो अथवा नसो तसे आपण वापरलेला ब्राऊजर कोणता या सहीत कळवणे.

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 7:23 pm | सौन्दर्य

ओके. नक्की करून पाहीन आणि त्याप्रमाणे उत्तर पाठवीन.

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 10:11 pm | सौन्दर्य

मी गुगल क्रोम ह्या ब्राउझरचा वापर करून, आपण दिलेल्या दुव्यावर जाऊन, 'गुगल इनपुट टूल्स'चा वापर करून देवनागरीत काही ओळी टाईप केल्या. मला त्यात कोणतीही अडचण आली नाही.

माहितगार's picture

28 Apr 2015 - 9:30 am | माहितगार

खूप खूप धन्यवाद.

रॉजरमूर's picture

8 May 2015 - 2:00 am | रॉजरमूर

मीही google input च वापरतो

मराठी लिहिण्यासाठी मला तेच सोपे वाटते .
ही प्रतिक्रियाही मी गूगल इनपुट वरच लिहिली आहे .
इथे मिपावर असलेला keyboard मला अजिबात वापरता येत नाही त्यावर काही चुकीचे लिहिले गेले आणि erase करण्याकरता backspace दाबल्या नंतर नवीन शब्द लिहिण्यासाठी म्हणून
spacebar दिला तर भलतेच काही अगम्य शब्द दिसायला लागतात . आणि ते erase केले तरी पुन्हा पुन्हा येत राहतात .
माझ्यासारखी हि समस्या इतर कोणी मिपाकरांना भेडसावते आहे का ?

ब्राउजर मी गूगल क्रोम वापरतो .

संदीप डांगे's picture

8 May 2015 - 5:47 am | संदीप डांगे

फायरफॉक्स वापरा.

खास मिपासाठी मी क्रोम सोडलं कायमचं.

तसंही फार ताण द्यायचं लॅपटॉपला आणि माहितीची चोरी कायमचीच. कुठे काही सर्च मारलं की लगेच संबंधीत विषयाची एखादी जाहिरात इनबॉक्समधे यायचीच.

स्रुजा's picture

8 May 2015 - 5:48 am | स्रुजा

गुगल क्रोम वर हा बग आहे सुरुवातीपासुन. मला पण नवीन होते तेंव्हा हा कीबोर्ड खूप अनफ्रेंडली वाटायचा पण आता सवय झाली. जर शब्द चुकला तर बॅकस्पेस देऊन मग स्पेस द्यायची, मी दोनदा देते स्पेस आणि नवीन सुधारीत शब्द अथवा अक्षर टायपुन मग पुन्हा स्पेस डिलीट करायची. याने शब्द भलतेच अवतरत नाहीत. आणि शेवटची पायरी फक्त शब्दाच्या मध्ये जर स्पेस दिली असेल तर च करावी लागते. समजा तुम्ही पहिली पायरी ही शब्द संपल्यावर नवेन शब्द किंवा नवीन शब्दाचं पहिलं अक्षर सुधारण्यासाठी केली असेल तर या दोन शब्दांमधली जास्ती ची स्पेस आपोआप मिटते प्रकाशित करते वेळी. तेंव्हा दुसरी पायरी करण्याची गरज नाही. हे एक सांभाळलं तर गुगल पे़क्षा हे सोपं आहे. तिथे तुम्हाला अनेकदा यादीतुन शब्द घेत बसावे लागतात. हे हातात बसलं की टायपायचा वेग वाढतो.

माहितगार's picture

8 May 2015 - 7:29 am | माहितगार

मिपा प्रमाणेच कृपया wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुव्यावरच्या आपल्या टंकनाचा अनुभव कळवल्यास आभारी असेन. धन्यवाद

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2015 - 9:05 am | श्रीरंग_जोशी

Lang Keys नंतरच्या ड्रॉपडाउनमधून मराठी निवडूनही रोमन लिपीची साथ सुटत नाहीये.
कृपया मार्गदर्शन करावे.

मी क्रोम ब्राउझर वापरतो.

माहितगार's picture

8 May 2015 - 12:14 pm | माहितगार

Lang Keys नंतरच्या ड्रॉपडाउनमधून मराठी निवड पर्याय भविष्यातील अंतर्भूत पद्धतीसाठी आहे. ते अजून त्या लेव्हलला पोहोचले नाहीत (पेक्षा त्यात त्रुटी येताहेत ह्याची कल्पना असल्यामुळेच अकार्यान्वित स्थितीत आहे). तुर्तास त्यांची स्टेज बाहेरील इनपुट पद्धती वापरून काय त्रुटी समस्या आढळतात याचा अभ्यास करण्याची आहे. ती स्टेज पार पडल्यावर ते अंतर्भूत पद्धतीसाठीच्या परिक्षणांकडे वळतील.

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2015 - 8:45 am | श्रीरंग_जोशी

क्रोम मधून मिपावर टंकताना काही चुकलं तरी बॅकस्पेस बटनचा वापर मी टाळतो.

जी अक्षरे खोडायची आहेत ती सिलेक्ट करतो अन स्पेस दाबून त्यांच्या ऐवजी एक ब्लँक स्पेस मिळवतो. अतिरिक्त ब्लँक स्पेस झाल्यास ती सिलेक्ट करून डिलिट बटनद्वारे ती काढून टाकतो.

मोबाइलवरून मिपावर टंकन करण्यासाठी कोणता ब्राउजर चांगला आहे मग?

प्रचेतस's picture

8 May 2015 - 3:59 pm | प्रचेतस

युसी ब्राऊझर.

धन्यवाद! वापरून पाहतो.

किसन शिंदे's picture

8 May 2015 - 8:01 pm | किसन शिंदे

अलीकडच्या काही अपडेटनंतर युसीमध्येही पिसीवरच्या क्रोमसारखा प्रॉब्लेम येऊ लागलाय. त्यापेक्षा अग्निकोल्हा वापरा मोबाईलवरही.

(गूगल इनपूट शिवाय इतर) IME वापरकर्त्या मराठी लोकांची साहाय्याची अद्याप प्रतीक्षा आहे.