वास्तूतील प्रदूषण आणि नैसर्गिक उपाय

मोक्षदा's picture
मोक्षदा in विशेष
8 Mar 2015 - 2:04 am
महिला दिन

परवा टीव्हीवर बातमी बघितली की गावाकडे थंडीच्या हुरडा पार्ट्या चालू झाल्या आहेत, अलोट गर्दी आहे. शहरातील लोक भरभरून गावाकडे येताना दिसतात, त्याचे एकमेव कारण म्हणजे आपण शहरातील माणसे गावाकडच्या शुद्ध हवेला, मोकळ्या वातावरणाला, निसर्गातील आनंदाला मुकलेलो आहोत. शहरात खूपच प्रदूषण वाढले आहे. त्यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही. आपल्या घरातही तितकेच प्रदूषण आहे, हे मात्र आपल्याला माहीतही नसते. तुम्ही म्हणाल, आम्ही तर घरे रोज स्वच्छ करतो, मग आमच्या घरात कसले प्रदूषण?

आपल्या लक्षात येत नाही किती तरी अश्या वस्तू आपल्या घरात रोजच्या रोज अदृश्य प्रदूषण करत असतात. उदा. प्लायचे फर्निचर, वार्निश, भिंतीला लावलेला रंग, सौंदर्यप्रसाधने, गॅस, टीव्ही, ओडोमॉस, उदबत्ती, गुडनाईट, बेगॉन, पेस्ट कन्ट्रोल, टिक-२० अशी अनेक रसायने घरात प्रदूषण करत असतात. या सर्व रसायनाचे बाष्पीभवन होऊन श्वसनाद्वारे ती सतत शरीरात जात असतात. आपल्याला त्याचा सतत त्रास होत असतो, जो लगेच जाणवत नाही.
खाली दिलेल्या तक्त्यात घरातील वस्तू मधून कोणती रसायने बाहेर पडतात ती दिलेली आहेत.

आपण अशा प्रकारची प्रदूषणे सहज टाळू शकतो. त्यासाठी काही झाडांची नावे व चित्र पाठवत आहे. ही झाडे घरातील प्रदूषण कमी करतात, त्याचप्रमाणे कमी प्रकाशात वाढतात. घरच्या थोड्या जागेत लावल्यास वाढतात. ही झाडे बऱ्याच नर्सरीमध्ये मिळतील. घराभोवती जागा असेल तर आजूबाजूच्या परिसरात किंवा घरात जरूर लावा. घरातील प्रदूषण नक्कीच कमी होईल.

याच्या व्यतिरिक्त अनेक मोठी झाडे आहेत जी प्रदूषण कमी करतात खरा तर सगळीच झाडे प्रदूषण कमी करण्यास मदत करतात पण हि झाडे घरातून जी रसायने खास करून बाहेर पडतात. ही झाडे लावण्यामागचा उद्देश एकतर ती कमी प्रकाशात वाढतात, आटोपशीर त्यांचा विस्तार राहतो ,प्रदूषण कमी करून घर सजवतात, (मनी प्लान्ट चे झाडाचे चित्र दाखवले नाही कारण ते झाड सगळ्यांना माहित आहे )

याच्या व्यतिरिक्त कोणालाही जास्त माहिती हवी असल्यास (www.flowers of India .com) भेट द्यावी. तुमच्या करता शास्त्रीय नावे दिली आहेत. तरी सापडली नाही तर खाली search window दिलेली असते त्यात बघावे “.झाडे लावा झाडे जगवा.. प्रदूषण मुक्त घर ठेवा”.

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 3:22 pm | सविता००१

माहिती.
घरातल्याच वस्तूंमुळे एवढं प्रदूषण होतं त्याची इतकी कल्पनाही नव्हती मला.

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 4:06 pm | आयुर्हित

सौंदर्य प्रसाधने व PERFUMES मध्ये असणाऱ्या अल्कोहोल मुळे BREAST CANCER होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
लिपस्टिक मध्ये असणाऱ्या LEAD मुळे ही SLOW POISONING आणि CANCER चे प्रमाण वाढत चालले आहे.
अत्यंत मोलाची माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.

अरेका पाम्,जरबेरा,पीस लीली , बांबू चे झाड ही माझ्या बागेत आहेत्,अरेका पाम तर बरीच .लेख वाचुन त्यांच्याबद्दल नवी छान महिती मिळाली.धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 2:39 pm | मधुरा देशपांडे

चांगली माहिती आणि उपाय.

कधी विचार हि आला नव्हता मनात कि आपल्या दैनदिन वापराच्या गोष्टींमधून इतके विविध प्रकारचे प्रदूषण होत असेल म्हणून ...अतिशय उपयुक्त लेख !!

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:20 pm | सस्नेह

प्रदूषण असेही टाळता येते हे समजले. धन्यवाद.

जुइ's picture

10 Mar 2015 - 8:20 pm | जुइ

घरगुती वापरातल्या वस्तुंमधुन प्रदुषन होते आणि ते टाळायचे उपाय याची चांगली माहिती समजली.

तक्ता / चित्रे मलाच दिसत नाहीत काय?

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 4:28 pm | सानिकास्वप्निल

छान माहिती दिलीत पण फोटो का दिसत नाही?

स्पंदना's picture

12 Mar 2015 - 5:07 am | स्पंदना

अतिशय छान माहीती. आता मी वरील्पैकी काही झाडे अ‍ॅड करेन माझ्या गार्डन मध्ये.

माहितीपुर्ण लेख!पण फोटो दिसत नाहियेत मलाहि.

मितान's picture

13 Mar 2015 - 4:58 pm | मितान

उत्तम लेख !
इतर मित्र मैत्रिणिंशी शेअर करत आहे.
यातल्या अनेक गोष्टी मला करता येतील असं वाटतंय. करणार नक्की.

प्रीत-मोहर's picture

13 Mar 2015 - 9:55 pm | प्रीत-मोहर

मस्त माहिती.

घरातले प्रदूषण कमी कराय्चा पुर्ण प्रयत्न करेन.

रेवती's picture

15 Mar 2015 - 7:33 pm | रेवती

फोटो दिसत नाहीयेत पण कोणकोणत्या वस्तूंमुळे घरात प्रदूषण होऊ शकते ते समजले. आता वस्तू विकत घेताना नेहमीच सगळे टाळता येईल असे नाही पण शक्य तितक्या लाकडी किंवा नैसर्गिक वस्तू घेण्याचे लक्षात ठेवीन.

श्रीरंग_जोशी's picture

16 Mar 2015 - 9:14 am | श्रीरंग_जोशी

महत्वाची माहिती. या लेखनासाठी धन्यवाद. फोटो दिसत नाहीयेत कारण त्यांचा पत्ता दिलेला नाही.
केवळा नावे आहेत ती अशी

  • Homepolution.jpg
  • Homepolution1.jpg
  • antipolutiontrees.jpg

अधिक मार्गदर्शनः मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

माहिती तर छान आहे मितान ताई. पण मला फोटो नाही दिसते. :(

एस's picture

19 Mar 2015 - 12:10 pm | एस

फोटो दिसत नाहीत, त्यामुळे नक्की कोणती झाडे आहेत हेही कळत नाही.

अवांतर - यावरून एकदा कृषितज्ञ श्री बुधाजीराव मुळीक यांना दै. सकाळच्या शेतीविषयक पुरवण्यांच्या प्रश्नोत्तरांच्या सदरामध्ये एका वाचकाने प्रश्न विचारला होता. थोडक्यात असा होता की तेव्हा पुण्याच्या काही चौकांमध्ये वायुप्रदूषण पातळी मोजणारे डिजिटल फलक लावले गेले होते. त्यामुळे हवेत किती धूळ आहे, किंवा कितपत प्रदूषण आहे हे कळत असे. प्रश्नात विचारले होते की ग्रामीण भागातील लोकांकडे तर अशी यंत्रणा नाही. मग त्यांनी त्यांच्या भागातील प्रदूषण कसे मोजावे? यावर मुळीकसाहेबांनी काही झाडांची माहिती दिली होती आणि प्रदूषण/धूळ शोषून घेण्याच्या त्यांच्या गुणधर्माबद्दल प्रथमच तेव्हा कळले होते. ते कात्रण काही माझ्याजवळ आता नाही. परंतु आंबा, कडुनिंब इत्यादी झाडे त्या यादीत असल्याचे स्मरते.

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:10 pm | कविता१९७८

छान माहीती

अनन्न्या's picture

20 Mar 2015 - 5:19 pm | अनन्न्या

जरा बघ काय झालय, माहिती खूप छान आहे!

कपडे धुतल्यानंतर ते शुभ्र दिसावेत म्हणून आपण जे क्लोरीनयुक्त विरंजक (Bleach) वापरतो त्याने फ्लू, टोंसील, दमा,श्वासाचे त्रास होण्यास/वाढण्यास मदत मिळते.

While bleach is effective in killing germs, the chemical may leave children more susceptible to catching flu, tonsillitis or other infections.

Exposure to bleach was associated with a 20 per cent increase in the risk of flu and a 35 per cent rise in the risk of recurrent tonsillitis.

The study, carried out by the Centre for Environment and Health in Belgium, looked at the potential impact among more than 9,000 schoolchildren between the ages of six and 12 in the Netherlands, Finland and Barcelona.

Bleach has been linked to a rise in respiratory illness in children

Bleach 'linked to 20% rise in childhood infections including flu and bronchitis'

आयुर्हित's picture

10 May 2015 - 11:17 am | आयुर्हित

‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री सध्या जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अश्विनी भावे या डॉक्युमेंट्रीच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वच सिनेमहोत्सवांमध्ये ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ने आपला ठसा उमटवला आहे. टॉक्सिक केमिकल्स आज मानवाच्या जिवाला किती हानिकारक आहे याबाबतची माहिती ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवत अश्विनी भावेने लघुपटाच्या निर्मितीचा भार उचलला आहे. जनतेमध्ये याविषयाबाबत जागृती व्हावी या उद्देशाने ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरतेय.
संवेदनशील अश्विनी

‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ यावर दिलेली घातक रसायनांची माहिती उद्भोदक आहे.
(टीप: यात दाखविलेले कुठलेही product मी पाहिलेले व तपासलेले नाही, त्यामुळे त्याबद्दल बोलता येणार नाही.)

प्रशांत हेबारे's picture

1 Jun 2015 - 1:48 pm | प्रशांत हेबारे

फोटो आणि तक्ता दिसत नाही

फोटो आणि तक्ता दिसत नाही

एस's picture

15 Sep 2015 - 10:43 pm | एस

या धाग्यातले फोटो अजूनही दिसत नाहीत. मोक्षदाताई, कृपया फोटोंचे दुवे परत एकदा द्याल का? संपादक वा साहित्य संपादक तुम्हांला मदत करू शकतील.

मोक्षदा's picture

15 Sep 2015 - 11:40 pm | मोक्षदा

साग्ल्ल्यांची मी आभारी आहे फोटो नसताना तक्ता नसताना तुम्ही माहिती वाचून कौतुक केल्या बद्दल मी स्वतः हा लेख आजच वाचला , मला स्वतःला तक्ता व फोटो अजिबात टाकता येत नाही फ्लीकेर वर चढवून मग टाकायचे असत्तात. या सगल्या कारणाने तो तक्ता अला नाही ,पण माझ्या hard disc वर अजून ताक्त्यासकट फोटो आहेत

वर श्रीरंग_जोशी ह्यांनी दिलेल्या प्रतिसादात लिंक दिली आहे.