मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओबामा उवाच

विकास · · काथ्याकूट
वॉशिंग्टन डीसी मध्ये फेब्रुवारीच्या पहील्या गुरूवारी "राष्ट्रीय प्रार्थना न्याहारी" ;) अर्थात "National Prayers Breakfast" म्हणून सोहळा असतो. १९५३ पासून तो चाललेला आहे. जवळपास ३५०० अतिमहत्वाच्या व्यक्ती/उच्चभ्रू त्यासाठी येतात. एक वक्ता हा अमेरीकन राष्ट्राध्यक्ष असतो तर दुसरा त्या दिवशी सकाळपर्यंत गोपनीय ठेवलेला असतो. इंटरनेट, विकी आणि गुगलच्या जमान्यात एक गंमतीशीर निरीक्षण करता आले. या सोहळ्याविषयी काही माहिती मिळते का ते पहायला गेलो तर विकीवर (वर दिलेली) त्रोटक माहिती मिळाली. १९५३ सालपासून जरी चालू असला तरी विकीपानावर केवळ १९७३ पासूनचे वक्तेच लिहीलेले आहेत. त्यांचे स्वत:चे म्हणून संस्थळ देखील नाही. लिडरशीप डेव्हलपमेंट यांनी हा कार्यक्रम चालू केल्याचे लक्षात आले. आज सगळी अचानक उचकाउचकी होण्याचे कारण म्हणजे अमेरीकेचे (गॅलप पोल प्रमाणे) ४५% लोकमान्य असलेले लाडके नेते श्री. बराक ओबामा यांचे तेथले वक्तव्य. त्यात केलेला भारताचा धर्मासंदर्भातला उल्लेख आणि त्या संदर्भात आत्ता जे काही होत आहे ते पाहून ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठ्ठा हातभार लावला त्या गांधीजींना आज कित्ती त्रास झाला असता असे म्हणणे. ह्यामुळे अपेक्षित पणे भारतात आणि भारतीयांंमधे गदारोळ उठला आहे. आत्ता भारतात जाऊन केवळ हैद्राबाद हाऊस मधे या महोदयांसाठी देशातर्फे इतके खाणे केले गेले होते. आणि मग "ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी" असेच झाले की राव! - असे अनेकांचे मत आहे. तर इतर अनेकांचे मत झाले - बरे झाले नमोंची जिरली! :D मी त्यातला नाही, हे आधीच सांगतो. ;) "Obama smacks down India for religious intolerance, says Gandhi would have been shocked" असे भारतीय वृत्तपत्रातले मथळे वाचून तर नक्कीच या महाशयांनी या न्याहारीच्या वेळेचा उपयोग, भारताबद्दल बोटे मोडायला केला असे वाटले. पण म्हणलं, हीच वृत्तपत्रे/माध्यमे इतरवेळेस देखील (विशेष करून मोदी, संघ वगैरे विषय आले की) संदर्भहीन अर्थात आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बातम्या देतात. मग येथे नक्की काय असेल हे शोधावे असे वाटले. त्यामुळे मग ओबामांच्या घराच्या संस्थळावर गेलो. तेथे त्यांचे संपूर्ण भाषण मिळाले. आता या भाषणातल्या ज्या परीच्छेदात भारत, गांधीजी, यांचा उल्लेख आला आहे तो खाली चोप्य पस्ते केला आहे. तो कृपया वाचावात: (काही भाग मुद्दाम हायलाईट करत आहे)
Humanity has been grappling with these questions throughout human history. And lest we get on our high horse and think this is unique to some other place, remember that during the Crusades and the Inquisition, people committed terrible deeds in the name of Christ. In our home country, slavery and Jim Crow all too often was justified in the name of Christ. Michelle and I returned from India -- an incredible, beautiful country, full of magnificent diversity -- but a place where, in past years, religious faiths of all types have, on occasion, been targeted by other peoples of faith, simply due to their heritage and their beliefs -- acts of intolerance that would have shocked Gandhiji, the person who helped to liberate that nation.
संपूर्ण भाषण वाचलेत तर विशिष्ठ धर्मियांना म्हणून केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चनांनावरच प्रत्यक्ष टिका आहे. त्यावरून (ख्रिश्चनांवरील उल्लेखावरून) या भाषणावर अमेरीकेत अधिक टिका होत आहे. ज्यू, हिंदू आणि बुद्ध यांच्यावर या भाषणात प्रत्यक्ष काहीच म्हणलेले नाही. आता हे काही ओबामांची बाजू घेण्यासाठी म्हणत नाही.... तरी देखील संपूर्ण वाचल्यावर असे वाटते की त्यांनी राजकारणी म्हणून सर्वांना समाधानी ठेवायला म्हणून ख्रिश्चनांनंतर अप्रत्यक्षपणे हिंदूंना नाव ठेवली असे आपण फारतर म्हणू शकतो. मोदी आणि संघविरोधक भारतीय माध्यमे उगाच त्याचा वापर करत आहेत, झाल.. कारण शेवटी भारतभेट म्हणजे काही सर्वधर्मसमभाव कसा चालला आहे याचे इन्स्पेक्शन नव्हते. तर सर्व अमेरीकन धंद्यांना भाव मिळेल का ह्याच्या चाचपणीसाठी होती, भारताच्या बाजूने देखील स्वतःचे (राष्ट्रीय) स्वार्थासाठी होती आणि अर्थातच दोन्ही बाजूंनी संबंध हळूहळू अजून वृद्धींगत करत आंतर्राष्ट्रीय राजकारणात संदेश देण्यासाठी देखील होती. तेव्हढेच त्याचे दोन्ही बाजूंनी महत्व होते आणि राहील.

वाचन 9847 प्रतिक्रिया 34