नमस्कार,
मला गेल्या दहा एक वर्षात सर्वसाधारण आंतरजालासोबतच मराठी आंतरजाल, तसेच ज्ञानकोशीय लेखनाचा प्रशिक्षण देण्याचा बर्यापैकी अनुभव आहे. सोबतच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात ते उपयूक्त पडेल अशापद्धतीने प्रशिक्षण वर्ग/ कार्यशाळा आणि सुट्टीतील वर्ग आयोजीत करण्याची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी आंतरजाल सुविधा उपलब्ध असलेल्या संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे. मिपाकर वाचकांपैकी कुणाची स्वतःची अथवा परिचयातील संस्था असल्यास व्य नि करावा हि विनंती.
हा धागा इतरही संगणक प्रणाली प्रशिक्षकांना निवेदने / आवाहने करण्यास उपयूक्त पडू शकेल असे वाटते.
* अवांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वाचने
1693
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला नीटसे समजलेले नाही, तरीपण
या संस्थेबद्दल कल्पना नव्हती.
In reply to मला नीटसे समजलेले नाही, तरीपण by एस