शुभ्र मोगर्‍याची कळी

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:13 pm

शुभ्र मोगर्‍याची कळी

शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही कधी?
---
पहाटेच्या दवात भिजलेली
आता उमलावं की नको
या विवंचनेत गुंतलेली
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
पाहता पाहता पहाटेची सकाळ झाल्यावर
हलकेच डोळे मिचमिचे करुन
हिरवे हिरवे जग बघून
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
सकाळ कलंडतांना आळसाने
भरलेले डोळे चोळत
त्या एका वेड्याची वाट पाहणारी
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
----
तो आल्यावर पटकन
त्याच्यासमोर उडी घेणारी
लाजरी बुजरी
शुभ्र मोगर्‍याची कळी
पाहिलीये का हो तुम्ही?
----
तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना
गोळा करुन
एका सुंदरश्या गजर्‍यात माळून
जेव्हा तिला देतो
तेव्हा
त्याच्या समोरची
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?
---
सांगाना
पाहिलीये का हो?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

20 Oct 2014 - 8:52 pm | आयुर्हित

कळी अजून उमलायची आहे!

स्पा's picture

21 Oct 2014 - 12:30 pm | स्पा

भन्नाटच , ज्याम आवडली :)

बहुगुणी's picture

21 Oct 2014 - 10:11 pm | बहुगुणी

वाचणं वसूल! अर्थातच आवडली...तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना
गोळा करुन
एका सुंदरश्या गजर्‍यात माळून
जेव्हा तिला देतो
तेव्हा
त्याच्या समोरची
शुभ्र मोगर्‍याची कळी
लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही?

पाहिलीय, पाहिलीय, ओंजळीतल्या कळ्या फिक्या पडतील इतकी लाजली होती :-) कंबख्त, तुमने भी क्या याद दिलाया?

सस्नेह's picture

22 Oct 2014 - 2:22 pm | सस्नेह

ही तर खास जुईची नाजुक कळी !

इनिगोय's picture

22 Oct 2014 - 6:29 pm | इनिगोय

असेच म्हणते.

छान.. :-)

सखी's picture

23 Oct 2014 - 10:47 pm | सखी

आवडली.

चाणक्य's picture

24 Oct 2014 - 11:36 am | चाणक्य

मिका टच :-)

एस's picture

24 Oct 2014 - 3:12 pm | एस

अतिशय तरल, रोमॅन्टिक.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Oct 2014 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

प्रचंड गुरफटून गेलो... उलगडता उलगडता! :)

तिमा's picture

25 Oct 2014 - 6:37 pm | तिमा

आता कसे फार्मात आलाय जनुं! कविता आवडली अगदी भावार्थासहित!

पद्मश्री चित्रे's picture

26 Oct 2014 - 1:25 pm | पद्मश्री चित्रे

छान आहे कळी!! आवडली...

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2014 - 2:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

मिका रॉक्स

पैजारबुवा,