मँगो मस्तानी

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:31 am

मँगो मस्तानी

साहित्यः
दूध ५०० मिली.
कस्टर्ड पावडर ३ मोठे चमचे (टेबलस्पून) सपाट.
साखर २ मोठे चमचे शीग लावून
मँगो आईस्क्रीम २ गोळे (स्कूप्स)
मँगो एसेन्स अर्ध बूच
पिवळा रंग ३ थेंब
लाल रंग २ थेंब

कृती:

दूधातून २-४ मोठे चमचे दूध वेगळे काढून त्यात कस्टर्ड पावडर मिसळून/विरघळवून घ्या.
बाकीचे दूध तापत ठेवा. त्यात साखर मिसळून ढवळत राहा.
दूधाला उकळी आली की आंच मंद करून कस्टर्ड पावडर मिसळलेले दूध एकदम त्यात मिसळा.
दूध ढवळत राहा. कस्टर्ड शिजून दूध जरा घट्ट होईल. आंच बंद करा.
दूध थंड होऊ द्या. थंड झालं की फ्रीज मध्ये ठेवून अगदी थंड करा.

तासाभराने (जास्त ठेवल्यास उत्तम. मस्तं थंड झालं पाहिजे.) त्यात अर्ध बूच मँगो एसेन्स आणि दोन्ही रंग मिसळा. चवीनुसार रंग आणि एसेन्स कमीजास्त करा.

आता त्यातील ग्लासभर दूध वेगळे काढून त्यात १ गोळा (स्कूप) मँगो आईस्क्रिम मिसळा आणि ते मिक्सर मध्ये फिरवून घ्या. आईस्क्रीम एकजीव झालं पाहिजे. (दुसरी मस्तानी करताना कृतीची ही पायरी पुन्हा करा.)

आता आपल्या आवडत्या ग्लासात हे मिश्रण ओतून त्यावर आईस्क्रीमचा एक गोळा आणि चमचा ठेवून मस्तानी सजवा.
मस्त मँगो मस्तानी ओठी लागण्यास सज्ज आहे. बाजीराव बना.

ह्याच प्रमाणे पिस्ता मस्तानी, चॉकलेट मस्तानी, बटरस्कॉच मस्तानी, ड्रायफ्रूट मस्तानी (ड्रायफ्रूटचे तुकडे आणि व्हॅनिला आईस्क्रिम) स्ट्रॉबेरी मस्तानी इ.इ. 'मस्तान्या' आपल्या कल्पकतेने बनवा.
शुभेच्छा....!

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

21 Oct 2014 - 5:31 pm | तुषार काळभोर

ओहो हो....
(आता समाधी घेतो)

फोटू आवडला. आकर्षक आलाय. ही पाकृ करण्यास मला भाग पाडणार आता!

मित्रहो's picture

21 Oct 2014 - 7:12 pm | मित्रहो

बाजीराव बनू या. घरी प्रयत्न करुन बघतो.

एस's picture

21 Oct 2014 - 8:23 pm | एस

दिलखेच, दिलबहार, दिलखव्वाल, अल-बहार, अबबब (इतकंच अरेबिक येतं आपल्याला...) :-) !!! क्या बात है! एकदा करून पाहिलीच पाहिजे. दूध किती थंड करायचे? डीपफ्रीज मध्ये ठेवलं तर? की हळूहळू थंड झाले पाहिजे?

कपिलमुनी's picture

22 Oct 2014 - 4:05 pm | कपिलमुनी

माझा सर्वात आवडता पदार्थ !

सीझनला ह्यात आंब्याचा गर मिक्स केल्यावर तर अफलातून चव येते .

थँक यू काका

चित्रगुप्त's picture

23 Oct 2014 - 6:17 am | चित्रगुप्त

कस्टर्ड पावडर, मँगो आईस्क्रीम, मँगो एसेन्स, पिवळा रंग, लाल रंग...
हे कृत्रीम पदार्थ न टाकता कशी करावी सांगा.

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2014 - 5:26 pm | प्रभाकर पेठकर

कस्टर्ड पावडर, मँगो आईस्क्रिम घरच्याघरी बनवा.
एसेन्स टाळण्यासाठी मँगो आईस्क्रिमची मात्रा वाढवा.
पिवळ्या रंगासाठी हळद आणि लाल रंगासाठी केशर वापरा.
बाकी कृती वरील प्रमाणेच.

सुहास झेले's picture

23 Oct 2014 - 7:30 am | सुहास झेले

मस्तच... एकदा नक्की करून बघणार :)

पैसा's picture

25 Oct 2014 - 9:16 am | पैसा

ती पुण्यातली वर्ल्ड फ्येमस मस्तानी अशी करतात काय! पाकृ आणि फोटो खासच!

सानिकास्वप्निल's picture

25 Oct 2014 - 11:49 am | सानिकास्वप्निल

मँगो मस्तानी एकदम जबरद्स्त दिसतेय, फोटो ही छान :)
पाकृ आवडली.

दिपक.कुवेत's picture

26 Oct 2014 - 6:53 pm | दिपक.कुवेत

चवीची तर कल्पना सुद्धा करवत नाहिये. पण ओरीजनल मस्तानी (म्हणजे पेयांत हं) मधे पण कस्टर्ड पावडर घालतात का?

प्रभाकर पेठकर's picture

26 Oct 2014 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर

होय दिपक. पुण्यात ज्यांच्या कडून ही पाककृती मला मिळाली त्यांनी सांगितले की व्यावसायिक स्तरावरची पाककृती आहे.

सोपी च आहे कि हि मस्तानी करून बघण्यात येईन ..

hitesh's picture

5 Nov 2014 - 6:08 pm | hitesh

मस्त

फोटो मस्तच!पाककृती छान.आवडली.

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2014 - 1:09 pm | चौथा कोनाडा

वॉव ! मस्त मस्त पाककृती ! तोंडाला पाणी सुटून तोंड "गार" पडले !