मंदिर.....
"काय हो, आज जेवायचे आहे ना?"
"अगं.थांब जरा.तिथे कं. ईंटरनेट ब्लॉक करते म्हणून कुठे जाता येत नाही.अन इथे तू.एक-दोन चार तासांचाच काय तो उशीर झाला आणि व्य.नि.ला उत्तर वेळेवर न दिल्याने घोळ झाला.आता परत तसे नको व्हायला."
"अहो.तिथे तुम्ही न जेवता, त्या वेळात बघताच ना?मग आता इथे तरी शांत पणे जेवा."
"तुझे म्हणणे बरोबर आहे.पण अज्जुन माझे "थायलंड" पुर्ण झाले नाही.निदान ते तरी पुर्ण बघू दे.म्हणजे मग मी उद्या "पेरूला" जायला मोकळा."
"तुमचे आपले हे नेहमीचेच.अहो, मी काय म्हणते, थोडे खावून तर घ्या.बघा तरी हा "तवा पुलाव" कसा झाला आहे?"
"अगं, मघाशी तू करत होतीस तेंव्हा नुसत्या वासानेच पोट भरले.शिवाय अद्याप तो सकाळचा "मटण कलिया" तर पचू दे.शिवाय परत तू, मी नको-नको म्हणत असतांना देखील चार-पाच चुरम्याचे लाडू खायला घालतलेस की."
"पण मी म्हणते, इतके काय ते मेले वाचायचे? मी तर मोजींच्या लेखावरचे प्रतिसाद वाचते आणि मनसोक्त हसून बंद करते."
"ओके.आज तू मंदिरात गेली होतीस का?"
"हो तर.मी रोजच जाते.एक दहा मिनिटे ध्यान लावून बसले की एक्दम मस्त वाटते.का हो?"
"मग मी पण आत्ता मंदिरातच बसलोय, ध्यान लावून.माझे वाचून संपले की येतोच जेवायला."
"आग लागो या सवतेला" असे तणतणत बायको जाते.
नवरा आपला परत मंदिरात शिरतो.
===============================================================================
मित्रांनो, तुमचे पण ह्या "मिपा" नावाच्या मंदिरात स्वागत आहे.फक्त त्या मान-अपमानाच्या चपला मात्र इथे आणू नका.इथे व्यक्तीगत असे काहीच नसते, पण दोषांना मात्र इथे थारा नाही.त्यामुळे निर्मळ मनाने आणि गर्व बाजूला ठेवून या.थोड्या फार चापट्या पण बसतीलच, पण त्या बसल्याशिवाय मंदिरातले देव दिसत नाहीत.
वाचने
5006
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
चिमटेखोर लेख आवडला
मुविकाका रॉक्स
हाहाहाहा
मिसळ पावचे अजीर्ण
फक्त त्या मान-अपमानाच्या चपला
In reply to फक्त त्या मान-अपमानाच्या चपला by कॅप्टन जॅक स्पॅरो
आभिमानाने आणि अनुभवाने सांगतो
मस्तच लेखन.
सवत माझी लाडकी
मस्ताड
एकदम झक्कास!
मुवि रॉक्स
हा हा हा
घरोघरी
हा हा आणि धरलं तर चावतंय
मंदिरातच आलो आहोत तर,
छान मंदिर !
मुवी रॉक्स..
सर्व वाचकांचे आणि