दहशत वाद्यान्चे उपकार (?)

मानव's picture
मानव in काथ्याकूट
2 Aug 2008 - 1:05 am
गाभा: 

दहशतवादि निर निरळ्या मार्गाने जिवित हानि करतात,कधि हे कधि ते !
पण हे उपकारकच वाटावे अशि परिस्थिति आहे !

आजुबाजुला पाहिल कि हे जानवते

सन्जय दत्तला पाहन्यासाठि ५००० गर्दि जमते,फाल्तु नाच गान्यान्च्या कार्यक्रमाला लाखाने एसएमएस जातात्,पानि मिळत नाहि पन गल्लो गल्लि वाइन शोप उघडलि जात आहेत्,सरकार वाचवल्याबद्दल पन्तप्रधान गुन्डाना नमस्कार घालतात्,आम्च्या सारखे पुने मुम्बैकर हा एव्ढाच भारत आहे अस समजतात ! आनि भारताने प्रगति केलि अस सानगतात !

आमच्या कितितरि बहिणि अजुन त्यान्च आयुष्य चुलिपुढेच घालवत आहेत,मोकळा श्वास कशाला म्हनतात त्याना माहित नाहि

ति गान्धि ,फुले ,आम्बेडकर्,टिळक सारखि मन्डळी जन्मायचिच बन्द झालि का हो?

आता उरलेत आमच्यासारखे भुक्कड !

मग हे मेले काय आनि जगले काय ? काय फरक पडतो ?

उलट हे दहशतवादि या भारतावर उपकारच करत आहेत हि पिलावळ समपवुन
हे लिहिन्याचि वेळ माझ्यावर यावि यातच माझा पराभव आहे एक भारतिय म्हनुन

प्रतिक्रिया

विकास's picture

2 Aug 2008 - 1:32 am | विकास

आपला त्रागा समजला, तळमळ समजली...

ति गान्धि ,फुले ,आम्बेडकर्,टिळक सारखि मन्डळी जन्मायचिच बन्द झालि का हो?

अहो मानवातूनच महामानव तयार होतात.

आज टिळक पुण्यतिथी आहेच म्हणून (आधी कधीतरी दुसर्‍या प्रतिसादात सांगून झाली आहे असे वाटते) गोष्ट सांगतो:

टिळक आणि आगरकर दोघांची शिक्षणे इंग्रजी माध्यमातून झाली. गम गच्छ टू गो असे संस्कृत त्यांनी शिकले. तर अशा या तरूणांना ज्यांना देशाबद्दल काहीतरी करावेसे वाटत होते, त्यांना कृष्णशास्त्री चिप़ळूणकरांनी केसरी या मराठी वर्तमानपत्राचे संपादकीय काम करायला सांगीतले. दोघेही तात्काळ म्हणाले की आमच्याच्याने होणार नाही, आम्ही इंग्रजीच लिहू शकतो. कृष्णशास्त्री शांतपणे म्हणाले, "तळमळ आहे ना? मग ती तळमळ हृदयातून लेखणीत उतरलीच पाहीजे, ती उतरणार हे शक्यच नाही!" बाकी पुढचा इतिहास तुम्हाला माहीत असणारच!

थोडक्यात त्रागा हे उत्तर न होता, आपण आपल्या परीने काय करू शकू हा विचार जर प्रत्येकाने केला - विशेष करून ज्याला/जीला तळमळ आहे त्याने/तिने तर बराच काही फरक पडू शकतो. मग त्यातून फक्त टिळक, आगरकर, फुले, आंबेडकरच तयार होतात असे नाही तर आजच्या काळातले अभय/राणी बंग अथवा कालच मॅगेसेसे पुरस्कार मिळालेले प्रकाश/मंदाकिनी अथवा बाबा आमटे तयार होतात.

तेंव्हा पराभव कसला बोलता त्यापेक्षा स्ट्रॅटेजीज तयार करण्यावरून काथ्याकूट करा!

सुचेल तसं's picture

2 Aug 2008 - 9:21 am | सुचेल तसं

विकास ह्यांचा एकदम बेष्ट प्रतिसाद!!!

http://sucheltas.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2008 - 8:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासरावांशी १००% सहमत

यमी

आपण थोड्क्यात म्हणता:-
"आजुबाजुला पाहिल कि हे जानवते "
म्हणुन मी म्हणतो:-
"आजुबाजुला पाहण्यापेक्शा स्वत: कडे पहावे"

गान्धि ,फुले ,आम्बेडकर्,टिळक सारखि मन्डळी नी हेच तर केल ना!!

चिन्या१९८५'s picture

2 Aug 2008 - 5:40 pm | चिन्या१९८५

विकास ना पुर्ण अनुमोदन

शिवबा दुसर्‍याच्या घरात जन्माला यावा .................अशीच आपण सर्वजण वाट पहात आहोत! असे मला वाटते...
कितितरी गोष्टी आपण करू शकतो.......एक बँकेत खाते काढ आणि मिपाच्या सदस्यांना आव्हान दे.......आणि मिळालेले पैसे कुठल्याही संस्थेला किव्हा स्वताहुन जावुन दे.........................किती पैसे जमा होतात ते नको बघू .....तर तु प्रयत्न केलास याचे तुला समाधान मिळेल................................अश्या बर्‍याच गोष्टी तु करु शकतोस आपल्या भारतीय बांधवांसाठी.........
रामसेतुच्या वेळेस मदत केलेल्या खारिच्या उदाहरण लक्षात ठेव..............................................

एक भरकटलेल्या प्रवाशाचा साथीदार...................................

मुकेश's picture

2 Aug 2008 - 6:54 pm | मुकेश

स्वानंद तुझा लेख खरच भरकटलेल्या प्रवाशाचा वाटला

आज टिळक आणि आगरकर बनू पाहणा-या लोकांना आपला समाज मूर्ख ठरवतो, ही मोठी खंत आहे.
दहशत वाद्यान्चे कसले आलेत उपकार.
खरे दहशतवादी/अतिरेकी आपण निवडून दिलेले मा. नेते मंडळी आहेत.
दहशतवादाला सामोरे जायचे असल्यास, त्याची मुळे शोधून उखडण्याची गरज आहे.
आज दहशतवादी पैशाचे अमिष दाखवून आपल्या देशातील तरुणांना मात्रुभुमीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी
प्रव्रुत्त करत आहेत. यावर गंभीरअपणे विचार करण्याची गरज आहे.

आपला
(इस्लामविरोधी) मुकेश

II राजे II's picture

2 Aug 2008 - 7:00 pm | II राजे II (not verified)

>>>(इस्लामविरोधी) मुकेश

शत्रुचा विरोध करा त्याच्या धर्माचा नाही !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2008 - 8:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्याशी सहमत!

लेकीन ऐसी बातें 'दिल पे मत ले यार...'. दोन प्रतिक्रिया वाचून लोक सहिष्णु बनत नाहीत!

यमी

मुकेश's picture

2 Aug 2008 - 7:12 pm | मुकेश

राजे, हा फार मोठा चर्चेचा विषय आहे, शेवटी प्रत्येकाचे मत.
मला यांच्या बद्दल पूळका नाही.

मी आपल्या मताशी सहमत नाही.

मुकेश

स्वानंद's picture

2 Aug 2008 - 8:46 pm | स्वानंद

अरे मित्रा........................................
गरीबी जर का कमी झाली तर दहशदवाद नाहि का कमी होणार?
गरीबीमुळे लोक मुलांना शिकायला पाठवत नाहित्....जर का लोकांचे साक्षरतेचे प्रमाण वाढले तर फरक पडेलच ना?

मदनबाण's picture

2 Aug 2008 - 9:51 pm | मदनबाण

जर का लोकांचे साक्षरतेचे प्रमाण वाढले तर फरक पडेलच ना?
मुळात या लोकांना माथेफ़िरुणा हेच शिक्षण हे शिकवल जातं,,काफ़िरांना कापण्यासाठीच आपला जन्म झालाय ही यांची शिकवण..दुसर्‍याचा गळा चिरणे ही यांची शैक्षणिक कौशल्ये आहेत..यांच्या कडुन कुठल्याही चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवणे म्हणजे रावणाने रामाची माफी मागणे हा प्रकार होईल..
मी एका व्हीडीओ पाहिला होता ..अफगाणिस्तान मधला..
एका बापाने आपल्या मुलाला एके ४७ वाढदिवसाची भेट म्हणुन दिली होती..पुढच्या वाढदिवसाला त्याने रॉकेट लॉन्चर देण्याचे प्रॉमिस केले... आता बोला...

मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सचिन-पाताळधुंड्या's picture

2 Aug 2008 - 10:37 pm | सचिन-पाताळधुंड्या

Congress rewards scholarships & benefits to kin of Terrorists !
Want a scholarship? Become a terrorist.

Their families are left helpless, without any support for them. They have an equal right to rehabilitation facilities," said Nirupama Kaul, the Nodal Officer of the Rehabilitation Council.

Apart from demanding jobs, terrorists relatives also demanded reservations in educational institutions for their children, free education and
scholarships and other such benefits, which would ease their monetary troubles.

धन्य त्या निरुपमा कौल, ... तुम्ही ग्रामीन व नगर विकास ऑफिसर आहात की दहशतवाद विकास मंत्री हेच कळत नाहिये.

स्कॉलरशिप द्या, पेंन्शन द्या, सेवा सुविधा ध्या, अर्जुनसिंगाना सांगून रिझर्वेश्न पन मिळवून द्या.

अतिरेकी, जे मारताहेत त्यांच्या पोराबाळांना, नातेवाईकांना स्कॉलरशिप द्या.. आन जे मरताहेत त्यांच्या पोरांना नुसती गाजरे दाखवा.

सुबक ठेन्गनी's picture

4 Aug 2008 - 2:15 pm | सुबक ठेन्गनी

हि वस्त्विकता गुन्तागुन्तिचि आहे.आपण म्हणता ते सर्व बरोबर आहे.पण देश नेत्या मुळे बनत नाहि तर तो बनतो देश्यातल्या नागरिकानि.दुसर्या महायुध्धात बेचिराख झालेला जपान उभा रहतो.त्याच श्रेय कोणत्याच नेत्याला जात नाहि जपान्यानि कश्ट केले आणि आज आपण पहतो त्याना.आपण वाट पाहतो कि कोनि सुपर हिरो येइल आणि आपल्याला वाचवेल.
मानसिकता आपणच बदलायला पाहिजे.
रस्त्यावेरुन जाताना कचरा पहतो आणि नाव्न ठेवतो कि नगरपालिका काम करत नाहि पण कचरा करनारे कोण्?माझा शेजारि करतो तर मि कशाला काळजी करु?
आपण फोरेण मधे पहतो स्वछछ्ता पण् तिथे कचरा करु लगलो तर लोक तुछ्छ नजरेने पहतात्.तिथे काय नगर्पालिका झाडु घेउन
फिरत नाहि तर लोकान्चि मने स्वछ्छ आहेत्.आपण शिकलेलि मानस येवढ करु शकत नहि का?
पेट्रोल चे भाव वाढले म्हनुन ओरडतो आनि कोपय्रवरच्या वान्याकडे जाताना बाइक काढतो.
लोड शेडिन्ग बद्दल रड्तो आणि खोलितुन जाताना दिवा बन्द करावा हि सोपि गोष्ट विसरतो.
आपण विचार करतो कि मि एकट्याने हे करुन काय फायदा?
पण हा विचार टिळकानि, गान्धिनि केला नाहि कि मि एकट्याने हे करुन उपयोग नाहि..
भगत्सिन्गानि केला नहि कि मि एक २०-२१ वेर्श्याचा मुलगा इतिहसात बदल काय करनार?
आपले हात बान्धले आहेत का कोनि?नाहि ,पण आपलि मन' जरुर जखडलि आहेत.
दहशत वाद्याना धन्यवाद देत आहोत आपण किडे मुन्ग्या आहोत का आपण्?नक्किच नाहि....
मला फक्त येवढे म्हनायचे आहे कि,जर आज आपण बदललो नाहि तर उद्या आपलि मुले बाळे नक्किच किड्या मुन्ग्या प्रमाणे चिरडलि जातील..
छोट्या छोट्या गोष्टिन पासुन सुरुवात करु...आणि ज्या भारताचि आपण स्वप्न पहतो तो उभा करयला हातभार लाउ.