Skip to main content

छंद तुझा ..

लेखक psajid यांनी शुक्रवार, 01/08/2014 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
नभामध्ये तारकांचा थवा धुंद आहे, झुळूझुळू वाहणारा 'अनिल' मंद आहे !! पावलात तुझ्या घुंगरूचा नाद तो, तालावर बेहोष मी बेधुंद आहे !! केसांत अडखळून वाऱ्यास गंध आहे, गालावरच्या खळीचा हृदयास छंद आहे !! रक्तिम ओठ चावताना तू दिसतेस अशी, तुझ्या त्या इशाऱ्यावर मन गुंग आहे !! तो कटाक्ष तिरका अन निर्मळ हास्य, कसं सांगू सखे मी बेबंद आहे !! ...खरंच बेबंद आहे !!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1161
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया