पुन्हा ५ रुपयात जेवण!
कुठलाही पक्ष सत्तेवर बसला की आपोआप माजोरडा बनून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मनोभावे करू लागतो असे वाटू लागले आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील. तूर्तास महागाई, दुष्काळ, अन्नटंचाई ह्या गोष्टी अक्राळविक्राळ रुप धारण करत असताना भाजपाच्या एका मस्तवाल नेत्याने, आशिष शेलारने असे विधान केले की मुंबईत ५ रू. मधे पोट भरता येते आणि ५००० रु. मधेही भरता येते.
जॉर्ज ऑरवेलच्या अॅनिमल फार्म ह्या पुस्तकाची आठवण येते. माणसाची सत्ता झुगारून टाकण्याकरता डुकरे इतर प्राण्यांच्या मदतीने क्रांती करतात आणि मग प्राण्यांची सत्ता येते. मग डुकरे अच्छ्या दिनांचे गाजर लटकवत स्वतः माणसासारखे वागू लागतात. दोन पायावर चालू लागतात. बाकी प्राण्यांवर जुलुम सुरु होतो. वगैरे वगैरे.
http://www.dnaindia.com/mumbai/report-after-congress-leaders-now-bjp-s-ashish-shelar-claims-rs-5-can-buy-a-full-meal-in-mumbai-1999828
शेलार साहेबांना योग्य त्या कानपिचक्या मिळतील अशी आशा. पार्श्वभागावर लाथ मिळाली अधिकच आनंद वाटेल.
महागाई खाली आणता येत नसेल तर त्या दु:खावर कमीत कमी डागण्या तरी देऊ नयेत अशी लोकांनी अपेक्षा केली तर ती वावगी म्हणता येईल का?
प्रतिक्रिया
दिन... अच्छे है!
आपण त्याने नेमके काय म्हणले
ओ हुप्प्या काका.
अर्थ काही का असेना पण ...
च्यामारी आता "चाराण्याची
नाही नाही, तसे नाही
ऐला ऋषिकेश सत्तेत होता हे आधी
(No subject)
मनाने,फक्त मनाने
...
आभारी आहे. आजचा पेपरही वाचला.