✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.

क
कलंत्री यांनी
Tue, 07/29/2008 - 19:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7585 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

स
संदीप चित्रे Tue, 07/29/2008 - 20:55 नवीन

भाषा हे माध्यम..

त्यामुळे बदलत्या काळानुसारा नवीन शब्दांचे स्वागत केले पाहिजे. उदा. इंग्रजी भाषेत 'गुगल' हा शब्द जणू 'शोधणे' ह्याच्या समानार्थी म्हणून वापरला जाऊ लागला आणि रूळलाही (निदान आय. टी. वाल्यांच्या इंग्रजीत) ! भाषा हे विचारांचे माध्यम मानले तरी शुद्धलेखनाकडे लक्ष देणे आवश्यक असते. माझं असं मत आहे की जर शूधलेखणाच्ये मुळ्भूट नीयम पालले नाहीट तर वाचणार्याचा गोधल होवू शकटो :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 07/29/2008 - 22:58 नवीन

शूधलेखणाच

शूधलेखणाच्ये मुळ्भूट नीयम पालले नाहीट तर वाचणार्याचा गोधल होवू शकटो =)) =)) सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
व
विसोबा खेचर Wed, 07/30/2008 - 09:37 नवीन

शुद्धलेखन

क्षमा असावी कलंत्रीसाहेब, पण शुद्धलेखन या विषयावर चर्चा करण्यास मिपावर बंदी आहे! :) मिपावर ह्या विषयांना एन्करेज, एन्टरटेन केले जात नाही याची नोंद घ्यावी! महेश वेलणकर नावाचे आमचे एक स्नेही आहेत. त्यांचं मनोगत म्हणून एक संस्थळ आहे तिथे या विषयांवर बरीच ट्यांव ट्यांव अन् भसाभसा, जीव जाईसस्तोवर आणि मुख्य म्हणजे निरर्थक चर्चा केली जाते हे मी येथे आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो! :) 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा हा हा! बरं बरं! :) बर्र का कलंत्रीशेठ, आमच्याकडे धुणीभांडी करणारी शिताबाई दोन बुकं शिकली आहे. तिला लिहायची खूप हौस आहे. ती कधी कधी आपल्या लेकीसोबत, "ताई, आज मि येनारा नाय. मला बरं वाटत नाय. आख्खी रात झोपच नाय आलि" अश्या काहीश्या आशयाची चिठ्ठी आमच्या मातोश्रींना पाठवते. कलंत्रीसाहेब, "तिच्या चिठ्ठीतील मजकूर हा शुद्ध की अशुद्ध, आणि हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?" एवढंच तुमच्या त्या सत्त्वशीलाबाईला आमच्यातर्फे विचारा आणि बाई काय म्हणाल्या ते आम्हाला येऊन सांगा एवढीच तुम्हाला विनंती! आपला, (शुधलेखनाची नस्ती ट्यांव ट्यांव करणार्‍यांना फाट्यावर मारणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 15:30 नवीन

पर तात्या...

... तुमास्नी ह्ये मान्य करावाच लागंल का, सुद लिवावं आन सुद वाचावं. त्येचामुळंच मानुस मोटा व्हतो!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/30/2008 - 16:10 नवीन

मुद्दा..

तुमास्नी ह्ये मान्य करावाच लागंल का, सुद लिवावं आन सुद वाचावं. त्येचामुळंच मानुस मोटा व्हतो! ते मोठं होणं की छोटं होणं राहू द्या, त्या आधी, "ताई, आज मि येनारा नाय. मला बरं वाटत नाय. आख्खी रात झोपच नाय आलि" अश्या काहीश्या आशयाची चिठ्ठी आमच्या मातोश्रींना पाठवते. कलंत्रीसाहेब, "तिच्या चिठ्ठीतील मजकूर हा शुद्ध की अशुद्ध, आणि हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?" यातल्या, "तिच्या चिठ्ठीतील मजकूर हा शुद्ध की अशुद्ध, आणि हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?" या प्रश्नाचं उत्तर द्या, मग पुढे बोलू... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 17:04 नवीन

माफ करा

माफ करा तात्या, हा प्रश्न खूप सेंसिटिव असेल असं मला वाटलं नव्हता ... म्हणून सवयीनी त्यावर पण विनोद करायचा (केविलवाणा) प्रयत्न केला. या प्रश्नाचं उत्तर द्या, मग पुढे बोलू... मला तरी नक्कीच नाही ... पण मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला माझ्यासाठी खूप झालं. अदिती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/30/2008 - 22:56 नवीन

:)

पण मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला माझ्यासाठी खूप झालं. That's it..! :) शुद्धलेखनाला किती महत्व द्यायचं आणि मारे चार बुकं शिकलेल्या लोकांनी त्यावर किती ट्यांव ट्यांव करायची हे यावरून ज्याने त्याने ठरवावं! :) पण यमे, मला आश्चर्य याचं वाटतं की एक तुझा अपवाद वगळता, 'शिताबाईने लिहिलेलं वाक्य हे शुद्ध आहे की अशुद्ध आहे आणि ते ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?' या माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाही! सगळ्यां भाषातज्ञांची आणि भाषाप्रभूंची तोंडं गप्प आहेत! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर Wed, 07/30/2008 - 23:04 नवीन

आणि जर का

आणि जर का एखाद्याने शिताबाईने लिहिलेल्या वाक्यात शुद्धलेखनाच्या चुका आहेत असं म्हटलं तर आमचं काहीच म्हणणं नाही. त्याला त्याचे शुद्धलेखनाचे नियम लखलाभ! परंतु आम्ही ते मानत नाही, मानणार नाही! आम्ही ते केवळ फाट्यावर मारू. त्याने ते नियम स्वत:कडेच ठेवावेत आणि खुशाल दिवे ओवाळत बसावे त्यांच्याभोवती! आम्हाला शिकवायला जाऊ नये! शुद्धलेखन.. माय फूट...........! आपला, (विद्रोही!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रियाली गुरुवार, 07/31/2008 - 00:23 नवीन

कोणते तज्ज्ञ हो?

या इथले का? मिसळापावावर कोणी भाषातज्ज्ञ आणि भाषाप्रभू (उरले) आहेत असे वाटत नाही बॉ मला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धनंजय गुरुवार, 07/31/2008 - 00:06 नवीन

अधिकार शिताबाई देतील त्याचाच

आणखी कोणाचा नाही. मी या विषयावर मिपावर बोलत नाही. :-) पण मागतच आहात तर मत असे :- बोलण्याबाबत : शिताबाईंचे बोलणे शुद्ध आहे. भाषावैज्ञानिक दृष्ट्या फक्त प्रौढ वयात मराठी अर्धवट शिकलेले परभाषीय (आणि ज्यांना अजून बोलता येत नाही ती बालके) तेवढेच काय मराठी अशुद्ध बोलू शकतात. मराठीभाषक जे जे मराठी म्हणून बोलतात ते शुद्धच. चिठ्ठीतल्या लिखाणाबाबत : लेखनाच्या शुद्धाशुद्धतेबाबत भाषाविज्ञानाचे काहीएक मत नाही. कारण लेखन ही एक अनैसर्गिक क्रिया आहे. भाषावैज्ञानिक मत सोडा - कामचलाऊ मत काय आहे? शुद्धाशुद्ध सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे? गाजवता येईल त्यालाच अधिकार सांगता येतो. ज्याला काही अंमल बजावता येईल, अशाच व्यक्तीला अधिकार आहे. म्हणून शिताबाईंच्या चिठ्ठीच्या बाबतीत कसलाही अधिकार कोणालाही नाही. (असलाच तर तुमच्या आईला मालकीण म्हणून आहे - चिठ्ठीतील मजकूर मुळीच समजला नाही, तर रजा द्यावी की नाही हे तुमच्या आईंना कळणार नाही.) येथेही बघावे. http://www.misalpav.com/node/2800#comment-38626 साधारणपणे अंमलबजावणी करायचा अधिकार विद्यार्थ्यांवर फक्त शाळाशिक्षकाचा असतो, आणि लेखकावर फक्त प्रकाशक-संपादकाचा. त्यात्या लोकांना शिताबाईंनी तो अधिकार दिला तरच प्राप्त होतो. शिताबाईंना चिठ्ठीतला मजकूर शाळेतल्या परीक्षेत उत्तर म्हणून वापरायचा असेल, तर त्या मजकुराला किती गुण द्यावे त्याचा अधिकार फक्त शिक्षकालाच आहे. आणखी कोणाला कसलाही अधिकार पोचत नाही. शिताबाईंना ती चिठ्ठी वर्तमानपत्रात प्रकाशित करायची असेल तर लेखनात बदल करणे न करणे ती जाणो आणि तिचा प्रकाशक जाणो. आणखी कोणाला कसलाही अधिकार पोचत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 00:17 नवीन

(ह.घ्या)

त्यात्या लोकांना शिताबाईंनी तो अधिकार दिला तरच प्राप्त होतो. हे वाक्य मी 'तात्या लोकांना शिताबाईंनी तो अधिकार दिला तरच प्राप्त होतो' असं वाचलं! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 07/31/2008 - 07:28 नवीन

तात्यांबरोबर पूर्ण सहमत

तात्याराव, मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे.माझ्या वाचनात आलेला एक उतारा इथे माहिती साठी देत आहे. एका व्यक्तिने ह्या शुद्धलेकनावरच्या चर्चेला कंटाळून आपण म्हणता तसं, " या विषयांवर बरीच ट्यांव ट्यांव अन् भसाभसा, जीव जाईसस्तोवर आणि मुख्य म्हणजे निरर्थक चर्चा केली जाते" खालिल उतार्‍यात लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही जे लिहू, जे बोलू तेच शुद्ध आहे/असते असा आमचा दावा आहे. ज्यांना आमचं बोलणं कळणार नाही त्यांनी ते ऐकावं, आणि ज्यांना आमचं लिहिणं कळणार नाही त्यांनी ते वाचावं असा आमचा बिलकूल आग्रह नाही. इतरांनी त्यांच्या व्याकरणविषयक पुस्तकात लिहिलेले कुठलेही नियम आम्ही मानत नाही/मानणार नाही. व्याकरण विषयक आणि शुद्धलेखन विषयक नियम बनवण्याचे अधिकार कुणा एका व्यक्तिला आहेत, किंवा ती कुणा एका पांढरपेशा समाजाची मक्तेदारी आहे असे आम्ही मानत नाही, आणि सदर मक्तेदारी असलीच तर ती उधळून लावण्यास आम्ही सदैव समर्थ आहोत!" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 07/31/2008 - 10:37 नवीन

Dier Sar dat is wat i m

Dier Sar dat is wat i m seying ven i rite in inglish iph dere is ne speling mistek then vay piple se that nhanha u r rong. ur inglidh is veri poar. same ejucated piple whu se that we du not kare for mrati gramer tich me inglish speling i m konfujed * अशुद्ध वाचणा-यांसाठी Dear Sir That is what i am saying. When I write in English , if there is spelling mistake then why people say that Nana you are wrong. You English is very poor. Same educated people who say that we do not care for marathi grammer teach me english spelling. I am Confused नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Fri, 08/01/2008 - 20:20 नवीन

आपले मत काहीही असो....

सर्व मिपाकर, आपले मत काहीही असो, आपण जर पुण्यात असाल आणि आपणास वेळ मिळत असेल तर अवश्य हजेरी लावावी. शेवटी दुसर्‍याची बाजू ऐकुन घेणे हेही महत्वाचे असतेच. तात्या, शुद्धलेखनासाठी प्रमाणित साहित्याचा विचार करायला हवा. उदा. वर्तमानपत्रातले लेखन, कविता, काव्य, लेख इत्यादी. या लेखनातही अनेक चुका होत असतात. त्या टाळण्याचा प्रयत्न करावयास हवा. आपल्या सिताबाईने चिठ्ठी पाठविणे हाच कौतुकाचा विषय आहे. आमच्या कडे बाया दुसर्‍या दिवशी का आले नाही त्याची कारणे सांगत असतात. या कार्यक्रमानंतर शुद्धलेखन आणि प्रचलित काव्यवाचन इत्यादी करण्याचा विचार आहे. तसे काव्यासाठी शुद्धलेखनाचा विचार काटेकोरपणे केला जात नाही. शेवटी मराठीचे पाऊल पुढे पडावे हीच आपणासर्वांची इच्छा आहे, हे खरे आहे ना? द्वारकानाथ कलंत्री
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा