मिस्टर अॅण्ड मिसेस - एक अभिनव पण फसलेला प्रयोग
पूर्वीचे लेखन
अलिबाबा आणि चाळीशीतले चोर
गांधी आडवा येतो
_________________________________________________________________________________
अमित जयंत (चिन्मय मांडलेकर) हा दूरदर्शन मालिकांतून काम करणारा, अनेक पुरस्कार मिळविणारा एक प्रथितयश कलाकार. सध्या त्याचे दिवस वाईट आहेत. त्याच्याकडे काम येत नाही. त्याचा स्वतःचा टीआरपी घसरल्यामुळे त्याला आता मागणी नाही. मागील २ वर्षात त्याला कामच मिळालेले नाही. त्यामुळे वैतागलेला, निराश झालेला, स्वतःवरच व पत्नीवर चिडणारा. त्याची पत्नी मीरा (मधुरा वेलणकर) बँकेत नोकरी करून घराला हातभार लावणारी. या दोघांचा प्रेमविवाह. पण सध्या दोघात सारखे खटके उडतात. नैराश्यामुळे मीराबरोबर बँकेत काम करणार्या रोहनचा (अनिरुद्ध जोशी) अमितला संशय यायला लागलाय. त्यातून रोहन टिपीकल पुणेरी. सारखे टोमणे मारणारा. त्याचा अमितला सारखा संताप येत राहतो. त्याचे व मीराचे साध्यासाध्या कारणावरून खटके उडायला लागतात. अगदी घटस्फोटाचीही भाषा सुरू होते.
अचानक अमितचा जुना मित्र अश्विन (प्रियदर्शन जाधव) घरी येतो. अमितच्या पूर्वी तुफान गाजलेल्या "चाफा बोलेना ..." या अत्यंत लोकप्रिय मालिकेचा तो निर्माता असतो. अमित आपली व्यथा त्याच्याबरोबर बोलून दाखवितो व काहीतरी काम मिळवून देण्याची विनंती करतो.
अश्विनने ५ वर्षे परदेशात राहून भरपूर पैसे कमावलेले आहेत. अश्विन त्याच्यासमोर एका जबरदस्त व अभिनव रिअॅलिटी शो चा पर्याय ठेवतो. बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शो सारखा एक नवीन शो करायची त्याचा कल्पना आहे. अमित-मीरा च्या घरामध्ये दोन महिने वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे लावून त्यांचा लाईव्ह घटस्फोट दाखविण्याची अभिनव कल्पना तो समोर मांडतो. त्यासाठी तो अमितला रोज २ लाख रूपये मानधन देण्याचे आश्वासन देतो.
अमित या लाईव्ह रीअॅलिटी शो च्या कल्पनेने सुरवातीला धास्तावतो व नकार देतो. शेवटी त्यातून मिळणारी प्रसिद्धी व पैसे याचा मोह पडून तो होकार देतो. मीरा बँकेच्या कामासाठी ७ दिवस बाहेरगावी गेल्याची संधी साधून अश्विन त्यांच्या घराचे स्वरूप पालटून टाकतो. दिवाणखाना, स्वयंपाकघर, शयनगृह अशा अनेक ठिकाणी कॅमेरे बसवून अमितच्या कानात सतत सूचना देण्यासाठी मायक्रोफोन बसवितो व त्याच्या सूचनेनुसार अमितने वागायचे असते. घरातील कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास नको म्हणून कुत्र्यालाही झोपेचे औषध देऊन सतत झोपविले जाते.
मीरा परत आल्यावर सुरवातीला अमितला प्रेमाचे नाटक करायचे असते व नंतर सूचनेनुसार हळूहळू तिच्याशी भांडण सुरू करून ते घटस्फोटापर्यंत न्यायचे असते व शेवटी कॅमेर्यासमोर घटस्फोटाचे कागद सही करायचे अशी कल्पना असते. त्याला ते सुरवातीपासूनच खूप जड जाते. अश्विन त्यात मसाला भरण्यासाठी अमितच्या जीवनात एक नसलेली मैत्रीण आणून मसाला भरायचा प्रयत्न करतो. ती एका बनावट पोलिस इन्स्पेक्टरला बरोबर घेऊन मीराच्या उपस्थितीत घरात येऊन अमितने आपल्याला फसविले असा कांगावा करून हाताची शीर कापून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. परंतु मीराचा अमितवर पूर्ण विश्वास असल्याने ती चाल अयशस्वी ठरते.
मीराच्या आपल्यावरील विश्वासाने अमित अस्वस्थ होऊ लागतो. अश्विन नवीन योजना आखून आपल्या योजनेत रोहनला सामील करून घेतो व रोहन-मीराची भानगड जुळवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे अमितचा अजूनच संताप होतो. त्याला नाईलाजाने अश्विन सांगेल तसेच वागावे लागते. अगदी मीरा शयनगृहात कपडे बदलत असतानाचे सुद्धा शूटिंग झालेले बघून तो संतापतो, परंतु त्याला अश्विनसमोर माघारच घ्यावी लागते. तुमचा एक लाईव्ह बेडसीन हवा आहे अशी शेवटी अश्विन मागणी करतो. अमित संतापून नकार देतो, पण आता तो यात पूर्णपणे अडकला आहे.
नाटकाचा शेवट सांगून मी रसभंग करू इच्छित नाही. परंतु हे नाटक फसलेले वाटते. नाटकाची थीम अत्यंत अव्यवहार्य व उथळ आहे. प्रियदर्शन जाधव व मधुरा वेलणकरने चांगले काम केले आहे. परंतु त्यांच्या तुलनेत चिन्मय मांडलेकरचा अभिनय व रंगमंचावरील वावर अतिशय सामान्य व उथळ वाटतो. कोणताही नवरा आपल्या बायकोच्या नकळत तिच्या व्यक्तिगत बाबीचे शूटिंग करून देणे अशक्य आहे. पण या नाटकात ही फँटसी प्रत्यक्षात आणली आहे. प्रेक्षागृहात प्रेक्षकांना दोन दूरदर्शन संचावर कॅमेरा काय टिपत आहे ते बघायला मिळते. नाटकाची कल्पना अभिनव असली तरी या नाटकाची थीम अजिबात पटत नाही. मला हे नाटक अजिबात आवडले नाही. मध्यंतरानंतर तर नाटक बघणे असह्य होते व कधी एकदा शेवट येतो असे वाटत राहते.
संगीत, नेपथ्य व प्रकाशयोजना उत्तम आहे. परंतु हे नाटक अजिबात पटले नाही.
______________________________________________________________________________
प्रतिक्रिया
लेख आवडला.....कारण....
एकंदर परीक्षणावरुन, ना धड
नाटकाची थीम अत्यंत
नाटकात फारच अव्यवहारी मसाला
शक्य आहे हे.
आर्यन वैद्यचा रिअॅलिटी शो
>>> आर्यन वैद्य (former
डोंट टच मी म्हणत मिस्टर इंडीयाच्या श्रीमुखात अशी सणसणीत दिली होत
मस्त परिक्षण.
हेच म्हणतो, थीम छान वाटत आहे.
या नाटकाचा लेखक अस्लम नावाचा
वेगळी थीम
हो
आवडले . धन्यवाद गुरुजी,आता
मध्यंतरानंतर तर नाटक बघणे
+ १
अलीबाबा आणि गांधींच्या
केले
धन्यवाद!