शुभंकरोती
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आमच्या जुन घर १२/१५ खोल्यांचं होत.त्यात २ झोपाळे होते.एक माजघरात मध्यम आकाराचा आणि दुसरा पडवीत पहिल्यापेक्षा मोठा.हा पडवीतला झोपळा मला खूप आवडायचा त्या झोपल्यावर आम्ही सगळे जन एका वेळी मावायचो.त्या झोपल्यावर बसून मोठ्यांदा गाणी म्हणायची,कविता म्हणायच्या हे आमच एक आवडत काम असायचं . त्यातलाच एक महत्वाच काम म्हंजे त्या झोपल्यावर बसून शुभंकरोती म्हणायची .
पु लं च्या 'चितळे मास्तर'या व्यक्तिरेखेत लिहील आहे न कि मुलाला इतर चार मुलांच्यात ढकललं कि ते आपोपाप वाहत जाऊन शाळेला लागायचं.तीच गत लहानपणी आमची होती.कधी आईने हाताला धरून देवापुढे बसून 'म्हण शुभंकरोती'अस नाही केलं.घरातच ती शिस्त होती कि संध्यकाळी देवांपाशी दिवा लावला कि खेळ वगैरे आवरून हात पाय धुवून देवाला नमस्कार करायचा आणि शुभंकरोती म्हणायची.सगळ्या भावंडांबरोबर मलाही ती सवय आपसूक लागली होती . देवाला नमस्कार झाला कि सगाळे झोपाळ्यावर बसायचो.झोपाळा छान लांब आणि रुंद असल्याने त्याच्या दोन्ही बाजूनी आम्ही बसायचो मग शुभंकरोती ने सुरवात होऊन सगळे श्लोक म्हणून व्हायचे.मधूनच आई काकू डोकावून जायच्या कि नित म्हणतायत ना?मस्ती नाही न करत मध्ये.शुभंकरोती झाली कि मग 'मोरया मोरया मी बाल तान्हे 'या श्लोकाने सुरवात होऊन सगळे श्लोक म्हणून व्हायचे.नंतर मग गणपती अथर्वशीर्ष,रामरक्षा,मारुती स्तोत्र आणि विष्णू सह्त्रानाम अस क्रमाने सगळ म्हणून होई.ज्याला येत नसे त्याच ऐकून ऐकून पाठ होई.नंतर मात्र कसोटी चा क्षण असे.कारण एवढा म्हणून होईपर्यंत आई काकू तरी येउन समोर बसत आणि मग पाढे म्हणणे सुरु होई.२ पासून १५ पर्यंतचे पाढे सगळे उत्साहात म्हणत.नंतर मग पुढचे पाढे मात्र उरकून टाकल्यागत भीत भीत म्हणून मोकले व्हायचो.खर तर जसे सगळे श्लोक पाठ झाले होते तसेच सगळे पाढेसुद्धा रोज म्हणून म्हणून पाठ झाले होते.पण मनात भीती बसलेली.हे सगळ म्हणून झाल कि अभ्यासाच्या पाठ केलेल्या कविता म्हणून व्हायच्या.आणि मग उठून घरातल्या सगळ्या मोठ्या माणसाना नमस्कार करायचा .
आज एकत्र कुटुंब नाही.त्यात मी तर परदेशात येउन राहिलेली.माझ्या मुलाला हे सर्व नाही मिळत याची कुठेतरी खंत आहे.त्यामुळे त्याला हात धरून देवासमोर बसून शुभंकरोती म्हण्याला लावते.अजून तो लहान आहे त्यामुळे माझे ऐकतो देवासमोर बसतो. त्याला आरती करायला आवडते पूजा हि आवडीने करतो.मी जे जे करीन ते नित पाहून तस करायला पाहतो.त्यामुळे त्याच्या या वागण्यावर मी खुश आहे .
प्रतिक्रिया
शुभंकरोती नो कॉमेंटस !
पाठांतराला विज्ञानाच्याच दृष्टीकोणातून बघितले पाहीजे
बाप रे!!
मिपा प्रौढ झालेय का माहित नाही...
एकही तरुण रक्ताचा लेखक (१ ते २ अपवाद वगळता)
येथील रॉकर्स जेष्ठ झालेत अन
अवांतर - झोपाळा
उत्कृष्ट विषय आणि उत्तम लेखन !
मस्त. एकदम नॉस्टॅल्जिक झालो.