नावात काय आहे? किंवा नावातच सगळे आहे.
लग्नानंतर काय काय बदलते ? घर, नाव, आडनाव, चाली-रिती , नाती-गोती, अगदी खाण्या-पिण्याच्या पद्धती सुद्धा … बघायला गेलो तर बरच काही ….
गेल्या आठवड्यात ऑफिस ला जात असताना बस मध्ये दोन मुली (कदाचित त्यातील एकीच लग्न-बिग्न ठरले असावे,आणि दुसरी तिला ज्ञानामृत देत असावी- ज्याचा अनुभव तिला असेल कि नाही कुणास ठाऊक ) काही तत्सम बाबींवर चर्चा करत होत्या. त्यातील रंगलेली चर्चा तर फक्त ' लग्ना नंतर नाव बदलावे कि नाही' हीच होती.
असे म्हणतात कि मुलाचे नाव राशी वरून ठेवत नाही कारण लग्न नंतर नाव बदलतच. मला खर तर नाव बदलणे हे काही से पटत नाही, तसेही आडनाव तर बदलतोच न.(न बदलून सांगतो कुणाला) मग नाव बदलण्यात काही शास्त्र , संस्कृती आहे का? सासर च्या माणसांनी त्यांना हवे ते नाव ठेवावे आणि मुलीला ते पसंत आहे कि नाही ह्याची देखील खबर न घ्यावी ? बर निदान मुलीला तरी विचारावे कि बाई ग तुला कोणते नाव मनात आहे का? माझ्या माहितीमध्ये २ मुलींचे आडनाव लग्ना आधी हि तेच आणि लग्न नंतर हि तेच(स्वर्ग सुख च म्हणावे नाई का)
नाव बदलायलाच हवे हे काही मला पटत नाही बुआ . ह्यावर तुमचे मत काय आहे ?
प्रतिक्रिया
मुलीने स्वत:च्या मर्जी खेरीज
च्यायला
तसेही आडनाव तर बदलतोच न.(न
नशीबवान असतात मुली
जे त्यांना मोठेपणी आपला नाव
ते ही खरेच पण मग ते
तर तर