विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी
तुझ्या न्यायालयी आता पुन्हा मी हारलो दावा
पुरेसा धूर्त मी नाही, कुठे जमला मला कावा
राज्ये ,तुझी सत्ता, तुझे हे कायदे सारे
अता माझ्याविरोधी तू हवा तो फैसला द्यावा
तुझ्या नावात रे दडला किती संहार हा देवा
अता सारे मवाली हे तुझा बघ बोलती धावा !
जणू की उंट हे सगळे पटावर खेळती युद्धे
कुणी येथे सरळ नाही, कुणी उजवा कुणी डावा !
विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी..
फुलांचा जन्म हा अवघा अता तू वेचुनी न्यावा
प्रतीक्षेतुन या सार्या युगे आली युगे गेली
तुझी वचने, तुझ्या शपथा : भरवसा काय सांगावा
डॉ.सुनील अहिरराव
र्या साठी शिफ्ट आर आणि मग य
विखुरल्या वेदना येथे
अपर्णा अक्षय
शुचि धन्यवाद.