'वचने,प्रतिज्ञा, डार्विन आणि आपण '
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
'वचने, शपथा, डार्विन आणि आपण'
संपुर्ण मानवजमातीत वचन या प्रकाराला प्रचंड महत्व आहे. आपण स्वत: आजवर एकाही वाईल्ड किंवा डोमेस्टिक अॅनीमलला दुसर्या तत्सम प्राण्यास वचन देताना पाहिले नाही.यावरुन हेच सिद्ध होते की प्राणिजातीत वचन देणे घेणे ही प्रथा अजुन सुरु झालेली नाही. कदाचित त्यांच्या नैसर्गिक प्रेरणा त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पुरेशा असतात.
मनुष्य हा मुळातच स्खलनशील असतो, त्यामुळे त्याने स्वत:च्या स्खलनशील प्रव्रुत्तीस आळा घालण्यासाठी वचन हा प्रकार शोधून काढला! कालांतराने वचन देण्याचे तोटे लक्षात आल्यावर ते बळजबरीने घेण्याकडे कल निर्माण झाला. आता मनाविरुद्ध दिलेले वचन पाळणे जीवावर आल्यामुळे ते मोडण्याकडे प्रव्रुत्ती निर्माण झालीँ आणि वचन म्हणजे मोडून खाण्याची विषयवस्तू होऊन राहिली आहे. भारतीय पुढार्यांचा या बाबतीत कुणी अर्थातच हात, तोँड, वा जीभ धरू शकणार नाही हे निव्वळ खरेच आहे.
प्रतिज्ञा, शपथा आणि वचने : अर्थ किरकोळ वेगळा असला तरी समांतर चालतात. उद्देश दिलेला शब्द पाळण्याचाच असतो. राम ,भीष्म ,कर्ण अशा लोकांनी वचनाला प्राणापेक्षा महत्व दिल्यामुळे एकंदरीत प्राणभीरू लोकांची पंचाईत करून ठेवली असली तरी आजही काही लोक वचनाची शान टिकवून आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहेँ. आजच्या वचन दिनी काही (जमल्यास परस्परविरोधी) निष्कर्ष आपण मांडूनच टाकू एकंदरीत।
1) वचन घेण्यापेक्षा देणे अधिक श्रेष्ठ आहे, आणि दिलेले वचन पाळणे म्हणजे निव्वळ ग्रेट!
2) वचन हे मुळात स्वत:वरील अविश्वासातून निर्माण झाले असले तरी त्याचा उद्देश आपण विश्वासार्ह मनुष्य आहोत हे सिद्ध करण्यासाठी असतो; हे म्हणजे इन्टरेष्टिँगच.
3) आपला आणि डार्विनचा मिळून जो सिद्धांत होऊ शकला असता ,त्यानसार
"जी माणसे वचन मोडतात, ती जीवंत राहतात!"
दुर्दवाने आज डार्विन जीवंत नाही, हे त्याचे आणि आपले दुर्दैव. तर ते असो, पण भविष्यात या वचनसिद्धांतास यापुढे खुद्द आपला आणि डार्विनचा सिद्धांत असे संबोधण्यात येईल, याबद्दल आपल्या मनात शंका असण्याचे काही कारण नाहीँ. :)
4) वचन ही मोडण्याची किंवा मोडून खाण्याची विषयवस्तू आहे,
आणखी काय??
आपला विश्वासू, सत्य आणि एकवचनी वगैरे
डॉ.सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद