रसिका
गुंतती खुणा गाठती रेशमी धागे
हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे
चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ अवघे
चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे
श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया
चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया
जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया
शोधण्या किनारा लाट हवी उसवाया
प्रेरणा कामना उचंबळाचे कारण
ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण
अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण
दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण
………………… अज्ञात
जबरदस्त विचार !
चन्द्राची "आभा" चांदण्यांचा
मस्त...
झक्कास!