बरेच महिन्यांपासून एका मोठ्या ब्रेकच्या प्रतिक्षेत होतो. कामाच्या वाढ्त्या मापामुळे तो ब्रेक घेणं जमत नव्हतं. मग शेवटी वेळ मिळालाच. कुठे जायचं हा एकच प्रश्न होता. गोवा म्हणावं तर क्रिसमस चा काळ, म्हणजे मुंबईच नाही तर देशभरातून तिथे गर्दीचे लोंढे आलेले असणार, मग कलकलाटापासून लांब जाणं होणारच नाही, त्यामुळे गोवा बाद. कोकणात जाणं शक्य होतं, पण ते इतर वेळी होतच राहतं. मग कुठे? क... कोल्हापूर ! असं लई भारी डेस्टिनेशन सुचलं, शिक्कामोर्तब झालं. कसं जायचं हे आधीच फिक्स होतं.....
मी, बायको आणि एक बॅग असे गाडीत बसलो, आणि स्टार्टर दिला. ऐरोली पास करत असताना मला कुणीतरी नावाने हाक मारली. काचा जराशा खाली केल्या होत्या त्यामुळे ती खणखणीत ऐकूही आली. गाडी बाजूला घेतो तर माझा मित्र, ज्याला मी दोन वर्ष भेटलो नव्हतो, मला हात करत होता. हातात एक बॅग होती. मी विचारलं, ‘कुठे जातोयस? इथे कसा?’ ‘अरे पुण्याला चाललोय परत, शनिवार रविवार इथे आलो होतो. आणि इथे...’ बंद पडलेल्या हिरकणी (म्हणजे एशटी चा एक अवतार) कडे हात दाखवत तो म्हणाला. ’चल म्हटलं चायला कुठे तिष्ठत बसलायस, बरं झालं हाक मारलीस आणि मुख्य म्हणजे ओळखलंस एवढ्या चटकन.’ गप्पांचा स्टॉक इतका होता की पुणं कधी आलं कळलंच नाही. त्याला पुण्याला सोडून पुढे निघालो.
महाबळेश्वर उजवीकडे ५२ किमी असा बोर्ड बघितला. लोचन टू लोचन कम्युनिकेशन अॅण्ड अनुमोदन झालं; आणि मी गाडी उजवीकडे वळवली. आमच्या ट्रिप मधे हा डी-टुअर होता. वाईला गणपतीचं दर्शन घेऊन पुढे महाबळेश्वर ला निघालो. मॅप्रो चं सॅंडविच खायची बायकोला जबर इच्छा झाली, मग मॅप्रोलाच जेवण केलं आणि महाबळेश्वरास एका चांगल्याशा हॉटेलात जाऊन थडकलो. दोन तास वामकुक्षी घेऊन मार्केट मधे फेरफटका करायला बाहेर पडलो. मार्केट फुल्ल गर्दीने भरलेलं होत. पण रंगीबेरंगी स्कार्फ, स्वेटर बघताना मजा येत होती. मक्याचे दाणे, स्ट्रॉबेरी, चरत होतो, फिरत होतो. महाबळेश्वर मधली एक सुपर संध्याकाळ सरत होती.
दुस-या दिवशी ९ वाजता, म्हणजे भल्या पहाटे आम्ही वेण्णा लेकला आलो. थं..ड वारा सुटला होता. पण तरीही स्वेटर घालायचा नव्हता. ती थंडी गरम पोहे आणि चहानेच पळवायची होती. इथे आश्चर्य म्हणजे चहा पोहे मिळायला खूप चालावं लागलं. कारण प्रत्येक स्टॉलवर पावभाजी, डोसा, पॅटिस, सॅंडविच, असेच पदार्थ मिळत होते. एका इसमाने तर चक्क सांगितलं आम्हाला, ‘इदर पोहा उपमा कही नही मिलेगा आपको’. मला मी महाराष्ट्रात आहे का ही शंका वाटायला लागली. पण मग काही फर्लांग आणखी पायपीट केल्यावर एका मावशींची गाडी दिसली, ज्यावर चहा पोहे मिसळ असे पदार्थ मिळत होते. बोटिंग च्या बरोब्बर समोर ती गाडी असते. मग काय विचारता.... आहाहा! काय पोहे, काय तो आलं वाला दणदणीत चहा! खूश; खूप खूश झालो! वा!
पुढे पॉईंट वगैरे बघण्यात आम्हाला काही पॉईंट वाटत नव्हता; त्यामुळे आम्ही महाबळेश्वर सातारा मार्गावरून गाडी सोडली. झाडांची कमान सतत येऊन जाऊन असलेला मेढा घाटातून जाणारा हा रस्ता इतका उत्तम आहे म्हणून सांगू ! की असाच तो चालू रहावा असं वाटत होतं. पण अवघा ५० किलोमीटरचाच तो होता. पुढे साता-यात शिरलो; आणि जेवायला वेळ होता, त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा कडे कूच केलं. उन डोक्यावर आलं होतं खरं; पण तरीही तो बुलंद दरवाजा, त्या सुरेख पाय-या, देऊळ, पडका वाडा बघत आम्ही गडाच्या एका कडेवर आलो. खाली सरळसोट जाणारा कातळ; ज्यावर नजर ठरत नव्हती. इथून नजरेच्या टप्प्याला आव्हान देणारा परिसर दिसत होता. लांबच लांब पसरलेली, पुढे धूसर होत गेलेली शेतं, गावं बघत तिथे उभं राहिलो. घामाच्या चार धारा कपाळावरून ओघळत होत्या आणि त्यातच एक गार वा-याची झुळूक येऊन त्या उन्हातही आम्हाला थंड्ड करून जात होती. हा कॉन्ट्रास्ट काही वेळ अनुभवला; तिथली ती शांतता मनात भरायचा प्रयत्न केला आणि पुन्हा साता-यात उतरलो.
कंदी पेढे, कलाकंद (कुंदा) खरेदी झाली आणि मग कोल्हापूर ची वाट धरली. बॅक टू एन एच फोर. कोल्हापूर च्या वाटेवर कोल्हापूर पासून ३२ किमी वर साई मंगलम नावाचं एक छान हॉटेल आहे. नाश्ता, जेवण, करायला मी नक्की सुचवेन. तिथे फिल्टर कॉफी मारून आम्ही कोल्हापुरात दाखल झालो. क्रिसमस निमित्त इथेही गर्दी होती आणि हॉटेलं फुल होती. तरी, एका ओळखीच्या व्यक्तीने आम्हाला काही हॉटेल्स सुचवली होती, ती चेक करून शेवटी ताराराणी चौकात यात्री निवास मध्ये मुक्काम ठोकला. रात्री जेवायला भेळ हाच मेनू ठेवावा असं डोक्यात आलं. कोल्हापुरात येण्याचं एक मुख्य कारण हेच तर होतं; खादाडी, जिभेचे चोचले. मग मायबोली.कॉम वरील एका धाग्याचा जो रिसर्च केला होता, त्या आधारे राजाभाऊंची ऑल इंडिया स्पेशल भेळ शोधत निघालो. पण दुर्दैवाने राजाभाऊ भेळ बंद होती. ‘राजाभाऊंची तब्येत बरी नाहीये, त्यांना हॉस्पिटल मधे अॅडमिट केलंय’ असं अगदी कळकळीने एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं. ठीक तर मग; शोधत शोधत रंकाळ्याला पोचलो, तिथे प्रति राजाभाऊंची, म्हणजे राजाभाऊ असं लिहीलेल्या एका गाडीवरची भेळ चाखली. पोट भरलं नाही. मग स्टँड जवळ गोकुळ हॉटेल मधे भरलं वांगं आणि भाकरीने ती कसर भरून काढली.
दुस-या दिवशीचा मेनू आदल्या दिवशीच फिक्स केला होता. चलो फडतरे ! चा नारा लावला, आणि फडतरे मिसळ सेंटर च्या दारात रांग लावली. मिसळीसाठी रांगा लागणं, आणि मिसळीच्या पंगती उठणं मी पहिल्यांदा बघत होतो. फार मजा येत होती. माझ्या बायकोला मिसळीच्या तिखट असण्याचं भय होतं. पण तरीही तिखट असेल तर ती तू खायची अशा अटीवर ती आली. आम्ही पंगतीला बसलो. एक भाऊ आले, सगळ्यांच्या ऑर्डर घेऊन गेले. मग ताटं मांडली, मिसळीची भाजी वाढली, मग कट आणला, मग पाव. आणि आम्ही हर हर महादेव करून मिसळीचा घास घेतला. कोल्हापुरी च्या नावाखाली इतरत्र जो जाळ तुमच्या पानात वाढला जातो, त्या संकल्पनेला संपूर्णपणे तडा देणारी ही चविष्ट मिसळ होती. उसळ, त्यात जरासं दही, जरासं फरसाण असलेली ही मिसळ गोडसर अशा त्या स्लाईस ब्रेडबरोबर अजूनच भारी लागत होती. तिचा आस्वाद आम्ही दोघांनीही पुरेपूर घेतला. इथे अनलिमिटेड पातळ भाजी आणि कट तुम्हाला वाढला जातो, ही विशेष बाब आहे. थोडी मिसळ खाऊन झाल्यावर मग मी त्यात आणखी थोडा कट मिसळला. त्या मसालेदारपणामुळे मिसळीची चव अजून वाढली. या मिसळीत काय वेगळं आहे असं विचाराल तर नेमकं सांगता येणार नाही, पण तरीही ती वेगळी आहे हे नक्की. तृप्त झालो आणि तिथून निघालो. कोल्हापुरात जाल तर फडतरे मिसळ चाखाच असं मी प्रत्येकाला सांगेन. इतरही फेमस मिसळ मिळणारी ठिकाणं आहेत, पण हे भारी आहे.
कणेरी मठ हे आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं. कोल्हापूर पासून २० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. इथे सिद्धगिरी महाराजांचा मठ आहे, आणि मातीच्या मूर्तींमधून आपले ऋषिमुनी, महर्षी, आणि तसंच गावातील वेगवेगळी मंडळी, त्यांचे व्यवसाय, गावातील घरं, उत्सव यांच दर्शन घडवणारं एक म्युझियम आहे. इथल्या मातीच्या कलाकृती इतक्या उत्तम आहेत की त्यांचं वर्णन करणं कठीण आहे. सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टी या मूर्तींमधे जिवंत केलेल्या आहेत. विटीदांडू खेळ्णा-या मुलाचा हवेत उडलेला शर्ट, रथ ओढणा-या माणसाच्या चेह-यावरील आवेश, मुलाला घेऊन जत्रेत फिरणा-या आईच्या चेह-यावरचं समाधान, जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणणा-या स्त्रीच्या चेह-यावरील भाव, सगळं निव्वळ कमाल आहे. फोटोग्राफीची परवानगी नसल्याने फोटो मात्र नाहीयेत, पण प्रत्यक्षच बघावी अशी ती गोष्ट आहे.
तिथे फिरायला ३-४ तास लागले. मग परत कोल्हापुरात आलो. चप्पल गल्ली ची वाट धरली. कोल्हापुरी चपलांची खरेदी करणं मस्टच होतं. ती झाली, आणि मग खरी मजा करायचा समय आला. माझ्यासाठी. माझ्यासाठी असं म्हणण्याचं कारण माझी बायको शुद्ध-शाकाहारी आहे. (फार दु:खाची बाब) मग काय, आम्ही तांबडा पांढ-यासाठी प्रसिद्ध अशा ओपल हॉटेलला गेलो. एका टेबलावर सुरक्षित अंतर ठेवून बसलो. आणि मी ऑर्डर दिली.... एक तांबडा पांढरा - स्मॉल. वेटर माझ्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघत उभा राहिला. ‘...मग... मटण नको???’ असा प्रश्न आला. मी तांबडा पांढरा प्रकरण पहिल्यांदाच खात होतो, त्यामुळे ते कसं कशाशी खातात मला काहीही माहित नव्हतं. ‘हवं ना! म्हणजे काय!’ मी चूक सारवून घेत म्हटलं; जणु हा प्रश्नच उद्भवत नाही अशा सुरात. ‘बर. मग एक मटण मसाला, एक तांबडा पांढरा छोटी वाटी आणि चपाती... बरोबर?’ त्याने विचारलं. ‘हो’ उत्साहपूर्वक हातावर हात चोळत मी म्हटलं. पुढे ऑर्डर आली, मी त्या नवीनच चाखलेल्या पण प्रथमानुभवातच माझ्या मनाचा थेट वेध घेतलेल्या चवीत रममाण होतो, बाकी काहीच मला ठाउक नाही.
तांबडया-पांढ-या रश्श्याच्या त्या मंत्रमुग्धतेत दुसरा दिवस कधी उजाडला कळलंच नाही. सकाळी सकाळी मी एकटाच गंगावेशीत पोचलो. निरसं दूध प्यायचं होतं. तिथे सकाळची लगबग चालू होती. फळवाले आपापल्या गाड्या लावत होते. जुन्या धाटणीच्या घरांच्या खिडक्या हळू हळू उघडत होत्या. दुकानांसमोर झाडलोट चालू होती, कुणी स्कूटर तर कुणी सायकल घेऊन दूध न्यायला येत होतं. कोप-यावरच्या गोठ्यातल्या शेणाचा मंद सुगंध तिथल्या परिसरात दरवळत होता. ते ग्लासभर अमृत प्यायलं आणि मी हॉटेलवर परत आलो. नाश्ता केला. आता आम्हाला पन्हाळा गाठायचा होता. कोल्हापुरातून बाहेर पडलो आणि लांबच लांब शेतजमिनी दिसायला लागल्या. पुढे काही वेळाने सकाळच्या धूसरशा क्षितिजावर डोंगर उगवत गेले आणि आम्ही गाडीने वर थेट चार दरवाज्यातून पन्हाळ्यावर जाऊन पोचलो. तिथे एक गाईड केला, कारण परिसर फार मोठा होता, आणि चुकत चुकत शोधाशोध करायला हा माझा ट्रेक नव्हता. पन्हाळा हे महाराष्ट्रातलं नंबर तीन चं थंड हवेचं ठिकाण आहे - इति गाईड. ‘कसं काय?’ हे मी विचारणार इतक्यात त्याच्या या वक्तव्याचा आधार आम्हाला त्याने सांगितला. की, लोणावळा खंडाळा कोल्हापुरचा पन्हाळा....कुठे कुठे जायाचं हनमुन ला. असं दादा कोंडकेच्या गाण्यात बरं का, त्याने म्हटलंय. म्हणजे म्हणून नंबर तीन....हसू जबरदस्त आवळत मी ‘हं’ म्हटलं. एवढं एक आणि त्याचं सतत ‘या... तुमचा इथं फोटो काढतो’ म्हणत माझा कॅमेरा हाताळणं सोडलं तर मला काहीही खटकत नव्हतं. दोन तास इतिहासाचं ते वैभव बघून, ऐकून आम्ही स्तिमित झालो होतो. त्यातच तिथली ती हॉटेलं, आणि ते बंगले बघून दु:खीही. पण त्याकडे दुर्लक्ष केलं, बाजीप्रभूंच्या त्या विशाल पुतळ्याला, शिवा काशिद च्या पुतळ्याला वंदन केलं आणि कोल्हापुरात परतलो.
मग नवीन पॅलेस बघायला गेलो. ग्रॅंड्युअर... एकच शब्द मला सुचत होता. शान होती ती या लोकांची. बाकी आजकालची श्रीमंती फुसकी वाटते यापुढे. ती दालनं, त्या तलवारी, ते नजराणे, पदकं, ढाली, शिकार केलेले प्राणी, महाल, चांदीच्या कैक वस्तू, सगळं आम्ही आ वासून बघत होतो. ‘आई... शाउ महाराजांचं घर इतकं मोठ्ठं कसं??’ तिथे आलेल्या एका लहान मुलाने त्याच्या आईला प्रश्न केला. नेमका हाच्च प्रश्न नंतर बराच काळ मला पडला होता.
...जनरेशन्स...
त्यानंतर पन्हाळा-रंकाळा यमक जुळवलं. निवांत फेरफटका मारत बसलो, घारींची शिकार न्याहाळत बसलो, रंकाळ्याचा सूर्यास्त कॅमेरात टिपला, आणि हॉटेलवर परत आलो. कोल्हापुरात शाकाहारी जेवायचं असेल तर स्टॅंड च्या जवळ कावळा नाक्याकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर हॉटेल राजपुरुष मस्त आहे बरं का. हमखास आवडण्यासारखं आहे. तिथे कोल्हापुरातलं शेवटचं ‘डिनर’ केलं. मेथी-बेसन, अख्खा मसूर विथ भाकरी. एकदम यो! बेत झाला.
दुस-या दिवशी सकाळी महालक्ष्मी देऊळ गाठलं. देवीचा आशिर्वाद घेऊन परत निघालो. एन एच फोर अगेन. मख्खन रस्ता. ड्रायव्हिंग ची पुरेपूर मजा घेत आम्ही किमी वर किमी कापत होतो. सूर्य अस्ताला यायला लागला होता. हॉर्न चा ठणाणा बंद काचांमधूनही आम्हाला त्रास द्यायला लागला होता. ओव्हरटेक करून जाताना उगाचच लोकं गाडीकडे बघून डोळे वटारायला लागली होती. मुंबईची वेस आम्ही ओलांडली होती.
-------------------------------------------------------
तळटीपः कोल्हापूर खादाडी विषयक अगदी सविस्तर आणि पुरेशी माहिती माबो सोडून इतर कुठेही मिळाली नाही. मिपावर असा एखादा धागा म्हणा, किंवा एखादा डेटाबेस तयार झाला तर उपयोगी ठरेल.

वाचने
23012
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान वर्णन. मिपावर कोल्हापूर
झकास भटकंती केलीस रे
मस्त प्रवास...
टाकलेत ना! भरभरून
In reply to मस्त प्रवास... by ब़जरबट्टू
छान लिहिलंय एकदम.
मस्त लिहिलं आहे आणि फोटोही
कधी एकदा जाऊ अस झालय
कोल्हापुर परिसर.
महाबळेश्वरच्या हॉटेल बद्दल
हॉटेल उदय
In reply to महाबळेश्वरच्या हॉटेल बद्दल by त्रिवेणी
खुप खुप धन्यवाद.
In reply to हॉटेल उदय by वेल्लाभट
स्वच्छता....
In reply to हॉटेल उदय by वेल्लाभट
मस्त फोटो
मस्तच
मस्त वर्णन आणि फोटो.
मस्त !!
लेख मस्त ! फोटो दिसत नाहीत...
जब्बरदस्त रहो वेल ला भट!
>>शाहू पॅलेस मधल्या "त्या"
In reply to जब्बरदस्त रहो वेल ला भट! by अत्रुप्त आत्मा
@ काय सांगता काय !! >>>
In reply to >>शाहू पॅलेस मधल्या "त्या" by सूड
मस्त धागा.
अप्रतीम वर्णन आणि दिलखेचक फोटो
अरे हो एक सांगायचच राहिलं
हायला !
छान वर्णन
मस्त प्रवासवर्णन
आमच्या परगण्यात गेला होतात ??
माझा झालाय गणेशा पण वर्णन
उत्तम फोटो आणि वर्णन!
अरेरे!
In reply to उत्तम फोटो आणि वर्णन! by मोदक
आयला....ईश्वर मृतात्म्यास
In reply to अरेरे! by पांथस्थ
भवानी मंडपातल्या भाउंच्या
In reply to आयला....ईश्वर मृतात्म्यास by बॅटमॅन
वाईट बातमी
In reply to अरेरे! by पांथस्थ
MH 09
In reply to उत्तम फोटो आणि वर्णन! by मोदक
कचकचीत लेख. तुमच्यामुळे
मिसळीचा फटु १ लंबर आलाय..
आभार
काय गोड फोटू आलेत! वर्णनही
:)
काय एवढं चांगलं हाय कुल्हापुर
पण रंगीबेरंगी स्कार्फ, स्वेटर
पण रंगीबेरंगी स्कार्फ, स्वेटर बघताना मजा येत होती.वेल्लाभट ,
महाबळेश्वर.
In reply to वेल्लाभट , by सुबोध खरे
+१
In reply to महाबळेश्वर. by प्रभाकर पेठकर
लवासा हे ठिकाण देखील डॅव्हलप
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
येस... धन्यवाद....
In reply to वेल्लाभट , by सुबोध खरे
चिखलदरा भंडारदरा तोरणमाळ
दावणगिरी लोणी डोसा खाल्ला
चांगला तांबडा-पांढरा पद्मा
In reply to दावणगिरी लोणी डोसा खाल्ला by ग्रेटथिन्कर
राजारामपूरी ११ (की १३ व्या?)
In reply to चांगला तांबडा-पांढरा पद्मा by बॅटमॅन
धन्यवाद, वामन सोडून हे अजूनेक
In reply to राजारामपूरी ११ (की १३ व्या?) by मोदक
नाही खाल्ला... समहाऊ त्याच्या
In reply to दावणगिरी लोणी डोसा खाल्ला by ग्रेटथिन्कर
एकदम दिलखुष!
वामन गेस्ट हाउस
लै भारी..नादखुळा..कोल्हापुर..
मस्त!
हो हो... नीट आहे आता. पुणं
In reply to मस्त! by पैसा
फार फार वर्षांपूर्वी बाबांचं
आनंदाचे डोही आनंद तरंग!!!
मस्त सफर...
टेस्टी पांढरा रस्सा ठाण्यात
पुरेपूर कोल्हापूर, घंटाळी,
In reply to टेस्टी पांढरा रस्सा ठाण्यात by टवाळ कार्टा
ठ्यांकु
In reply to पुरेपूर कोल्हापूर, घंटाळी, by वेल्लाभट