लहानपणी कधी एखाद्या खूप हुशार आणि उच्चशिक्षित माणसाने बेशिस्त व्यवहार केला की मी "इतका शिकलेला माणूस असे करुच कसे शकतो?!!" असे आश्चर्य व्यक्त करत असे. माझे ते आश्चर्य पाहून आमचे तीर्थरूप म्हणत, "सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं". हे नक्की काय असतं हे तेव्हा ठळकपणे दिसलं नव्हतं, पण अनुभव येत गेले आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट होत गेलं.
पुस्तकं म्हणजे माझा जीव की प्राण. आपल्याला जसं पुस्तकांचं वेड आहे तसं इतरांनाही असावं असं मनापासून वाटणारा आणि आपली पुस्तकं एकेकाळी उत्साहाने इतरांना वाचायला देणारा असा मी. मात्र अनेक वर्षांपूर्वी आलेल्या एका अनुभवाने मला माझं हे धोरण बदलायला लावलं. एकदा एका अत्यंत हुशार नातेवाईक मुलाने एका महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान आलेला ताण घालवायला वाचनासाठी माझ्याकडे काही पुस्तकांची मागणी केली. त्यात शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह असलेलं एक पुस्तक होतं. मी ती पुस्तके आनंदाने दिली. त्याने ती पुस्तके वाचून झाल्यावर परतही केली. बर्याच दिवसांनी शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह दिसल्याने मला त्यातल्या आवडत्या गोष्टी वाचण्याची इच्छा झाली आणि इच्छित पान उघडल्या उघडल्या कपाळावर आठ्या पसरल्या. पुस्तक जवळ जवळ शंभर वर्षाहून जास्त काळापूर्वी लिहीले गेल्याने त्यातले अनेक शब्द व्हिक्टोरियन काळातले आणि त्यामुळेच जरा अनोळखी आणि समजायला कठीण आहेत. म्हणूनच त्या मुलाला शब्दार्थांसाठी शब्दकोशात बघायला लागले असावे. कारण कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारी. काहीही असो. तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि सरसकट सगळ्यांना पुस्तक वाचायला देण्याचं बंद करुन टाकलं.
त्यानंतर गेल्या आठवड्यातलीच गोष्ट. मी हल्ली पुस्तक प्रदर्शन व विक्री अशा गोष्टींपासून लांबच असतो. कारण एकदा आत गेलं की किती वेळ मोडेल आणि खिशाला नक्की किती मोठं भोक पडेल याची शाश्वती नसते. म्हणून मी आता बुकगंगा आणि फ्लिपकार्ट वरुन प्रामुख्याने पुस्तकं मागवतो. अशीच एकदा बुकगंगा वरुन ऑफिसच्या पत्त्यावर पुस्तकं मागवली. ती नेमकी शनिवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आली. बुकगंगावर पैसे आधीच ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे भरून झालेले असल्याने पुस्तके कुरिअरवाल्याने कंपनीच्या सुरक्षारक्षकाजवळ ठेवली. मला सुरक्षारक्षकाचा फोन आला "साहेब, मी शिंदे** बोलतोय. तुमची पुस्तकं आली आहेत. मी ते पॅकेट फोडून त्यातलं सावरकरांचं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचू का? माझी रात्रपाळी असते. तेव्हढाच माझा टाईमपास होईल. तुम्ही ऑफिसला आलात की तुम्हाला परत देतो". आधी त्यांनी माझ्याकडून एक ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतल्याचा अनुभव असल्यानं ते निदान माझी निराशा करणार नाहीत याची खात्री होती, त्यात त्यांनी ही विनंती फारच अजीजीनं केल्यानं मी त्यांना तसं करायला परवानगी दिली. मी सोमवार-मंगळवार गणपतीसाठी सुट्टीवर असल्याने त्यांना पुस्तक वाचायला दोन रात्री आणखी मिळाल्या. तेवढ्या कालावधीत त्यांनी ते वाचून संपवलं आणि मला बुधवारी दिवसपाळीच्या सुरक्षारक्षकाद्वारे ते आणि बाकीची पुस्तकं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून परत केली. पिशवीतून पुस्तकं काढल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 'माझी जन्मठेप' आणि त्याबरोबर आलेल्या दोन अन्य पुस्तकांना वर्तमानपत्राच्या कागदाची अत्यंत व्यवस्थित कव्हरे घातलेली होती! वाचनाची हौस दांडगी असली तरी असं कितीसं शिक्षण झालं असेल त्या वॉचमन काकांचं? पण त्यांनी त्यांच्यातला सुसंस्कृतपणा निष्ठेने जपला होता हे मात्र खरं.
सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं - याचा मात्र नव्याने प्रत्यय आला.
२८.१२.२०१३
मार्गशीर्ष कृ. ११.सफला स्मार्त एकादशी, शके १९३५
--------------------------------------------------------------------------------------
हे आणि ते - १: पाहुणचार --------------------------------------------------------------------------------------
याद्या
10549
प्रतिक्रिया
49
मिसळपाव


प्रतिक्रिया
१००% नंबर वन
लेख मस्तच!
महाराज, ती त्या नटाची
In reply to लेख मस्तच! by आदूबाळ
नाय हो. युनिवर्सिटीच्या
In reply to महाराज, ती त्या नटाची by आनन्दा
मस्त लेख....
लेख आवडला .
लेख चांगला आहे. वाचून काही
+१
In reply to लेख चांगला आहे. वाचून काही by नगरीनिरंजन
"पुस्तकांवर प्रेम करा" या वाक्याचा काही लोक फिजिकल अर्थ घेतात.मला वाटतं पुस्तकांशी असलेलं आपलं नातं - 'माझी पुस्तकं' वगैरे - बदलतं. मी एके काळी माझ्या संग्रहातल्या पुस्तकांबद्दल जास्त पझेसिव होते. आजकाल 'घेउन जा पाहिजे ते पुस्तक' अशी मी उदार झाले आहे. :-) लेखकाच्या भावना कालांतराने इतक्या टोकदार राहणार नाहीत; किंवा अधिक टोकदार होतील हीही एक शक्यता आहेच. :-)आजकाल 'घेउन जा पाहिजे ते
In reply to +१ by आतिवास
आदूबाळ,
In reply to आजकाल 'घेउन जा पाहिजे ते by आदूबाळ
पुस्तकांमधून मिळणारा आनंद.....
In reply to +१ by आतिवास
पेठकर काका,
In reply to पुस्तकांमधून मिळणारा आनंद..... by प्रभाकर पेठकर
लेख आवडला.
कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या
कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारीत्याने तुमचे पुस्तक व्यवस्थीत हातळले नाही म्हणून राग येणे साहजीक आहे. पण 'बोल्ड'लेलं आवडलं नाही. आम्ही शाळेत असताना आमचे गुरुजी स्वतः आम्हाला असा सल्ला द्यायचे की, कठीण शब्दांचे अर्थ त्याच पानावर लिहीत जा. आम्ही तसेच करायचो. फायदा व्हायचा. (पण ती स्वतःची पुस्तके असायची)पुस्तकप्रेमी पण मालक वैरी......
यांजकडून सप्रेम भेट
लय भारी
In reply to यांजकडून सप्रेम भेट by तिरकीट
वा! अप्रतिम
In reply to यांजकडून सप्रेम भेट by तिरकीट
मुळचे कोकणातले होते (म्हणे)
In reply to वा! अप्रतिम by ज्ञानव
हे काय लिहले आहे? मला तर याचा
असुदे असुदे...अपेक्षितच होते
In reply to हे काय लिहले आहे? मला तर याचा by ग्रेटथिन्कर
हिंदू धर्म अन मोदी व भाजपा व
In reply to हे काय लिहले आहे? मला तर याचा by ग्रेटथिन्कर
(No subject)
In reply to हिंदू धर्म अन मोदी व भाजपा व by बॅटमॅन
उपरोक्त गोष्टींना मी एका
In reply to हिंदू धर्म अन मोदी व भाजपा व by बॅटमॅन
अर्थातच तुम्ही किंमत देता.
In reply to उपरोक्त गोष्टींना मी एका by ग्रेटथिन्कर
बेग टू डिफर.
In reply to अर्थातच तुम्ही किंमत देता. by बॅटमॅन
ओके, पण
In reply to बेग टू डिफर. by आनंदी गोपाळ
छ्या!
In reply to ओके, पण by बॅटमॅन
तुमच्या सत्य व न्याय्य
In reply to छ्या! by आनंदी गोपाळ
जाउ दे.....चालायचंच
In reply to हे काय लिहले आहे? मला तर याचा by ग्रेटथिन्कर
जाउद्याहो. प्रत्येकाचा एक
In reply to हे काय लिहले आहे? मला तर याचा by ग्रेटथिन्कर
नाव
In reply to हे काय लिहले आहे? मला तर याचा by ग्रेटथिन्कर
म्हण
In reply to नाव by विनायक प्रभू
..
In reply to म्हण by आनंदी गोपाळ
वक्रकुंतलाच्या माळा
In reply to .. by विनायक प्रभू
ठ्ठो
In reply to वक्रकुंतलाच्या माळा by अनुप ढेरे
आयला
In reply to हे काय लिहले आहे? मला तर याचा by ग्रेटथिन्कर
पुस्तकांबद्दल असे अनेक वाईट
पुस्तके देणे-घेणे.
पुस्तकांविषयीची आस्था पोहोचली.
अत्यन्त मान्य ...तुरन्त
यावरुन आठवलं...
In reply to अत्यन्त मान्य ...तुरन्त by अत्रन्गि पाउस
शंभर टक्के सहमती पोस्ट च्या
जोशीबुवा आपण चांगले लेखन करु
हे काय लिहले आहे? मला तर याचा
In reply to जोशीबुवा आपण चांगले लेखन करु by ग्रेटथिन्कर
शंका
In reply to हे काय लिहले आहे? मला तर याचा by काळा पहाड
सहमत
आजकालच्या इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटेशनच्या जगात,
उत्तम लेख!