Skip to main content

थोडं थोडं जगून घे

लेखक वैभवकुमारन यांनी रविवार, 22/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) "गड्या थोडं थोडं जगून घे" किती पळशी पैश्यामागे नको पैश्याचे अरण हे पैश्यावाचून गरीबाची तू शांत झोप ती बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. बघ आकाशी निळे रंग हे बघ पक्ष्यांचे खुले छंद हे एकच पक्षी थव्यातला तो डोळ्यात तुझ्या भरून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. नकोच विचार वयाचा तो नकोच विचार भयाचा तो उरात बालपण भरूनिया तू मनात दंगा करून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. येतील दु:ख असंख्य कधी वाहील डोळी नीर नदी कधीतरी मग अथांग सागर उधाणलेला बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. कधी आनंदाचा पेव फुटता ओठी ओठ हास्य भेटता हसत हसत हसत सगळे डोळे थोडे भरून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. माझे माझे कीती आता हे माझे माझे नको आता हे सरणावरती पडण्याआधी दुसऱ्यासाठी जगून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. वैभव कुलकर्णी
लेखनविषय:

वाचने 1518
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आवडल .