सखे ,
खर सांगू , आता न खूप हलके वाटतेय! खर तू परत आलीस, यावर विश्वास बसतच नव्हता. का कुणास ठाऊक, तुझ्यात ती पूर्वीची तू दिसत नव्हतीस, आणि ते तू कबुल हि केलेस. एरव्ही माझ्या एका शब्दाला तुझे १० शब्द असायचे पण आज ? चक्क तू ? तूच होतीस ती ? कदाचित माझ्या जागी तू जरी असतीस तरी विश्वास ठेवला नसतास यावर. शांतपणे म्हणालीस तू ‘’ .... मी आता तिला ( माझ्या त्या पूर्वीच्या ) ..... मारून टाकलेय.
आतापर्यंत हळवी, मनमिळाऊ. भावनाप्रधान, पाहिलीस तू मला, पण आज मी त्या माझ्या रुपाला तिलांजली दिलीय .......किती धक्कादायक सुखद धक्का होता तो? तुझा विश्वास बसणार नाही पण मला तू अशीच हवी होतिस. शांत संयमी तितकीच कठोर कारण कधी कधी आपल्या मवाळ आणि साधे वागण्याचा फायदा घेतला जातो आणि तेव्हाच आपण वापरलो जातो. आणि आपल्या भावना, हळवे पण यांचा सरळ खून होतो .....आणि आपल्या समोर राहतात त्या फक्त मानसिक अशांतता आणि एकाकीपणा लाटा पण एक खरे आयुष्यातला.
प्रत्येक अनुभव हवाच कि गाठीला ......खर ना अचानक इतका बदल तुझ्यात आम्हाला कुणालाच अपेक्षित नव्हता, कदाचित तुला पण तो धक्का असेल. का कुणास ठाऊक आपल्या नात्याला पुन्हा एक वेगळी किनार आली, फक्त तो एक विषय वर्ज बाकी सगळ्या विषयांना आपल्या कडे खुले आम चर्चा व्हायच्या. अगदी कोणत्याही ....... आठवतेय तुला एकदा रात्री १२ वाजता तू मला उठवले होतेस , कारण काय तर, तुला सुचत नव्हते काय वाचावे. मला अचानक विचारलेस काय वाचू ? आत्ता झोप हि येत नाही? अन मी पण तेव्हा झोपेत तुला ‘’परवाना’ वाच किव्हा वपू ऎक असे बोललो, आणि मी हि कानात ‘’वपू’’ टाकून ऐकत बसलो, काही लिहित लिहित ..........सकाळपर्यं. अन सकाळी तुझा मेसेज परवाना खतम वाचून ...जवळ जवळ २०० पानाचे खाल्ले होतेस तू एका रात्रीत ,,,, my god आणि सकाळी पेंगत बोलत होतीस ............माझ्या तर कानात भुंगे वाजत होते ..........
अन असा अचानक तुझा आज फोन आला, फोनवर थोडी डिस्टर्ब होतीस, मी विचारले तर काही नाही असेच बोललीस, का कुणास ठाऊक तुझा आवाज जरा वेगळा वाटला .....मी हि काही जास्त नाही बोललो मग, तुझ सगळ गणित मला ठाऊक, जर मनात असेल तर क्षणाचाही विलंब लावत नाहीस बोलायला .....आणि नसेल तर चुप्पी कायम, मला हि जास्त डिवचायला आवडत नाही कुणाला ....त्रास होतो स्वताला आणि समोरच्याला ही.
तुझ वागण राहणे तसे साधेच, काम मात्र अगदी घड्याळाच्या काट्या प्रमाणे, ९ वाजता म्हणजे अगदी शार्प ९ वाजता असायचीस मेस मध्ये ...त्यानंतर मग भटकंती आपली फोनवरची ....आपल्याला बोलायला विषय लागायचा नाहीच, एकदा तर फक्त पु ल देशपांडे आणि त्यांची पात्रे यावर २ तास बोलणे चालू होते. नशीब त्यावेळी मला फोन आला ऑफिस वरून नाहीतर आपण थांबणे शक्य नाव्हते ....बोलायला लागलीस कि अगदी ऐकत राहावे वाटायचे .....लाघवी, सालस आणि तितकेच सभ्य ......मला हेवा वाटायचा.
बारीक सारीक गोष्टीवर भारी लक्ष तुझे ........मी कधी मागे बोललो होतो कि माझ्याकडे एक नाटक आहे जे मुले सादर करू शकतात, मी पण विसरून गेलो होतो, पण त्याची तूच मला आठवण करून दिलीस आज ,नाहीतर मी दुसरे लिहायला बसणार होतो नाटक काही दिवस असेच गेले, माझ्या कामाचा ताण, आणि घरातले वातावरण यामुळे काही दिवस अलिप्त होतो मी सगळ्यांपासून अगदी माझ्या पासूनही, तू बोलत होतीस पण माझे लक्ष त्यात नव्हते, मी फक्त हो ला हो करत होतो ........काय लावले आहेस तू तू एकदम उखडलीस ...अन मी भानावर आलो .................. खरच, सखे?
इतकी बदललीस?
तुझाच
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1081
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया