बेबी कॉर्न सिगार्स

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 9:42 am

नमस्कार मंडळी,
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्याची, सुख-समृद्धीची जावो हिच ईश्वर चरणी प्राथर्ना.

तर मंडळी दिवाळीचं खाउन तोंड गोग्गोड झालं कि ही चटपटीत डिश बनवा आणि घरच्या सगळ्यांना खाण्यात जरा वैविध्य द्या.

साहित्यः
१. बेबी कॉर्न - ५ ते ६
२. पिझ्झा सिझनींग - १ चमचा (हे रेडिमेड मिळतं)
३. तिखट - १/२ चमचा
४. लसूण पेस्ट - १/२ चमचा
५. साधं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल - १ चमचा
६. लिंबाचा रस - १ चमचा
७. चवीनुसार मीठ
डिपिंग सॉस साठी:
१. मेयॉनीज - ५ मोठे चमचे (फ्लेवर्ड मेयॉनीज मिळालं तर उत्तम उदा. चिली, गार्लिक, लेमन इ.). मी लेमन फ्लेवरचं घेतलयं
२. बारीक चिरलेला कांदा/लाल-हिरवी सिमला मिरची - प्रत्येकी १/२ मध्यम
३. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २ ते ३ (आवडीनुसार कमी/जास्त)
४. बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे
५. साखर - १/२ चमचा
६. चवीनुसार मीठ
आवरणासाठी:
१. उकडलेले बटाटे - ३ मध्यम (गुठळी न ठेवता नीट मळुन घेणे)
२. आलं-मिरची पेस्ट - १ चमचा
३. बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे
४. कॉर्न फ्लोअर - गरजेप्रमाणे
५. चवीनुसार मीठ
इतरः
१. तळण्यासाठी तेल
२. ब्रेड क्रम्स
३. चाट मसाला (ऑप्शनल)
कॄती:
१. बेबी कॉर्न स्वःच्छ धुवुन उकळत्या पाण्यात एक ३-४ मि. ठेवून लगेच थंड पाण्यात घाला म्हणजे अती शिजणार नाहित
२. डिपिंग सॉससाठी दिलेलं सर्व साहित्य एकत्र करुन फ्रिज मधे थंड होण्यास ठेवा
३. ब्लांच झालेल्या बेबी कॉर्न चे दोन समान भाग करा आणि त्यात पिझ्झा सिझनींग, तिखट, लसुण पेस्ट, ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून बेबी कॉर्नना मॅरीनेट करा
४. अगदी ३ ते ४ मि. मॅरीनेटेड बेबी कॉर्नना एका नॉनस्टिक पॅन मधे शॅलो फ्राय करा (ह्याने लसुणाचा कच्चा वास जाईल)
५. तळण्यासाठी तेल तापत ठेवा
६. एका बाउल मधे आवरणासाठी दिलेलं सर्व साहित्य एकत्र करा. नीट मळलं की तळहातावर थोडासा भाग घेउन चपटा करा (लंबगोलाकार) आणि शॅलो फ्राय केलेलं एक बेबी कॉर्न मधोमध ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन सिगारचा शेप द्या. शक्य होईल तितकं अतिरिक्त बटाटयाचं आवरण बाजुला काढा
७. आता हे सिगार्स ब्रेड क्रम्स मधे घोळवुन गरम तेलात गोल्डन ब्राउन होईस्त तळुन घ्या. जर ब्रेड क्रम्स चिकटले नाही तर आवरणाला बाहेरुन हलकासा तेलाचा हात लावा
८. सिगार्स गरम असतानाच आवडत असल्यास वरुन चाट मसाला भुरभुरा
९. हलके गरम सिगार्स चिल्ड डिपिंग सॉस बरोबर सर्व करा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 2:50 pm | मुक्त विहारि

करणार...

सविता००१'s picture

1 Nov 2013 - 4:58 pm | सविता००१

भारी डिश असतात या मनुष्याच्या. करायलाच लागणार. वाचूनच इतक्या आवडतात... मग करणार तरी काय नं? :(

अगदी फॅन्सी प्रकार दिसतोय. मस्तच!

साती's picture

1 Nov 2013 - 6:21 pm | साती

सही आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 11:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

तोंपासु. नाविन्यपूर्ण प्रकार !

अतिशय निगुतीने केलेली अशी पाककृती…
सिगार मस्तचं दिसताहेत.… चकना म्हणुन जबरदस्त लागतील. ;)

पैसा's picture

2 Nov 2013 - 6:10 am | पैसा

अफलातून आहेत!

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2013 - 1:35 pm | प्रभाकर पेठकर

ब्लांच झालेल्या बेबी कॉर्न चे दोन समान भाग करा

दोन भाग कशाकरता करायचे?

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 4:57 pm | दिपक.कुवेत

कि त्याने मॅरीनेट केलेले बेबी कॉर्न व्यवस्थीत शॅलो फ्राय होतील. त्याशीवाय रोल्स करताना अती फुगीर दिसणार नाहित.

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 4:59 pm | दिपक.कुवेत

हि पाकॄ आवश्यक ते सोपस्कार करुन संपादक मंडळा पर्यंत पोचवल्याबद्दल गणपाचे खुप खुप धन्यवाद.

अरे म्हणजे हे सोने पे सुहागा झालं की.

बाकी, गणपा बरा हाये ना? ;)

अनन्न्या's picture

2 Nov 2013 - 10:13 pm | अनन्न्या

दिवाळीचा फराळ खाऊन सगळे कंटाळले की हा मस्त चवदार प्रकार आहे! सिगारला दुसरे पर्यायी नाव नाही? त्याने चव बदलत नाही म्हणा, पण उगाच!

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2013 - 1:57 am | प्रभाकर पेठकर

सिगारला दुसरे पर्यायी नाव नाही?

बाल-मक्याची कडबोळी.

त्रिवेणी's picture

9 Nov 2013 - 5:37 pm | त्रिवेणी

ही ही ही
अशक्य भारी नाव

दिपक.कुवेत's picture

3 Nov 2013 - 12:04 pm | दिपक.कुवेत

बाल-मक्याचे दांडे!

सुहास झेले's picture

3 Nov 2013 - 7:15 pm | सुहास झेले

जबरीच.... :)

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2013 - 9:23 am | सुधीर कांदळकर

आवडली.

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 1:09 pm | स्पंदना

हा! काहीतरी वेगळ अन खतरनाक चविष्ट दिसतय.
करुन पाहणार.

एस's picture

12 Nov 2013 - 11:51 pm | एस

वर ज्यांनी ज्यांनी करून पाहणार म्हटलंय त्यांचे त्यांचे बेबी कॉर्न सिगार्स चाखून बघणार ;)

इन्दुसुता's picture

18 Nov 2013 - 9:57 am | इन्दुसुता

आधुनिक सिगार आवडले.