आधुनिक युधिष्ठीर

जुना अभिजित's picture
जुना अभिजित in काथ्याकूट
2 Nov 2007 - 8:46 am
गाभा: 

ही बातमी पहा: http://www.esakal.com/esakal/11022007/SpecialnewsF062EE1421.htm

महाभारत आणि रामायण यात एक मूळ फरक सांगीतला जातो. रामायण हे देव, देवाचा अवतार, आयडीयली लोकांनी कसं असायला हवं वगैरे वगैरे रामराज्य वगैरे वगैरे सांगतं आणि महाभारत हे मनुष्य स्वभाव, षडरिपु, असं असताना माणसाच कर्तव्य काय वगैरे सांगतं. कृष्ण तिथे आहे पण तोही कलियुगाला मानतोय.

महाभारत आजही चालू आहे. आणि वरच्य बातमीत गावकर्‍यांनी आधुनिक युधिष्ठीराला ५ हजार अजून द्यायला लावून जुगार्‍यांना पळवून लावले हे कदाचित महाभारताचे फलित असावे. (५ हजार हे फक्त प्रतीक आहे. ही त्या बायकोची किंमत नाही असं मला वाटतं. )

महाभारत आजही लागू आहे. त्यातले प्रसंग थोड्याफार फरकाने घडत असतात. तेव्हा कसं वागायचं, कसं नाही वागायचं याचा परिपाठ महाभारत त्यातल्या प्रसंगातून घालून देतंय.

अवांतरः दुसरी एक बातमी आहे की पाटण्यात आमदाराची पत्रकारांना मारहाण. पण तो विषय जाऊदे. किंवा तोही चालूदे. आपल्याला काय.

अभिजित
भारत को एक मिष्टर इंडीया की जरूरत है|

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

25 Aug 2019 - 11:22 pm | जालिम लोशन

कोण?

जॉनविक्क's picture

26 Aug 2019 - 2:32 pm | जॉनविक्क

पण कृष्ण कसा असेल याची कल्पना आहे