उकड्लेल्या बटाट्याची भाजी

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
13 Oct 2013 - 2:31 pm

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लाडकी भाजी म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी! करायला सोपी आणि तरीही स्वत:ची विशेष चव राखून असणारी. अशा या भाजीला प्रत्येक पारंपारिक सोह्ळ्यात अग्रणी स्थान असते. कुठल्याही कार्याचं, पूजेचं, प्रसादाचं जेवण असो, ही भाजी दोन भाज्यांपैकी एक भाजी म्ह्णून हमखास असते.

साहित्य:

२-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१ मिरची आणि अर्धा इंच आल्याची पेस्ट
फ़ोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता
मीठ, साखर चविनुसार
खवलेला नारळ व चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

a

कृती :

१. सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावेत. गार झ़ाल्यावर त्याच्या मध्यम आकाराच्या फ़ोडी कराव्यात.
२. एका कढईमध्ये तेल घेउन फ़ोड्णी करावी. त्यात कढीपत्त्याची पाने चुरुन अथवा बारीक चिरुन घालावीत. नंतर आलं मिरची पेस्ट घालावी व छान परतून घ्य़ावी.
३. वरील फ़ोडणीत बटाटयाच्या फ़ोडी घालून मिश्रण चांगले एकत्र करावे. चवीनुसार मीठ व साखर घालून ढवळावे.
४. ४-५ मिनिटांनि गैस बंद करावा व वरून नारळ कोथिंबीर घालावी.

लुसलुशीत पोळी वा फ़ुलक्याबरोबर ताव मारण्यास भाजी तय्यार आहे :)

काही महत्वाचे:
१. बटाटे फार उकडू नयेत. जास्त उकडले तर भाजी गोळट होते. २ शिट्या पुरतील.
२. आल्याचा स्वाद नको असल्यास फक्त मिरचीचे तुकडे घालावेत.

b
c

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2013 - 2:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छायाचित्रही छानच.

-दिलीप बिरुटे

अग्निकोल्हा's picture

13 Oct 2013 - 3:29 pm | अग्निकोल्हा

.

मनीषा's picture

13 Oct 2013 - 8:28 pm | मनीषा

मी पण आज हीच भाजी केली आहे.

मुक्त विहारि's picture

13 Oct 2013 - 9:18 pm | मुक्त विहारि

फोटू....

पैसा's picture

14 Oct 2013 - 10:05 am | पैसा

साधी सोपी चवदार भाजी आणि सुरेख फोटो! पुर्‍यांबरोबर मस्त बेत जमतो. ताटाला रंग आणते आणि दुसरी सुकी भाजी म्हणून झकास! गोव्यात ही भाजी थोडे पाणी घालून पातळसर करतात आणि पुर्‍या/पाव याबरोबर नाश्त्याला खातात आवडीने.

फोटू छान. थोडा लिंबाचा रस घालून अशीच भाजी करते.

बटुची भाजी मला फार फार आवडते. :)

{कारल्याची भाजी देखील आवडीने चाखणारा } ;)

तिसरा फोटो खास आलाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2013 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे

बटाट्याची भाजी खूप आवडते. ते शेवटाचे कोथिंबीर आणि ओले खोबरे ऐकून निर्वाण पावलो आहे... त्याशिवाय या पदार्थाला बटाट्याची भाजी म्हणता येत नाही असा आमचा (?दुर्)आग्रह आहे ;)

तिमा's picture

16 Oct 2013 - 11:40 am | तिमा

आमचा एक नातेवाईक,कळायला लागल्यापासून फक्त हीच भाजी खातो. त्याला दुसरे काहीच आवडत नाही. तरीही इतकी वर्षे त्याला कुठलीही डेफिशियन्सी कशी झाली नाही हे एक आश्चर्य आहे.

प्यारे१'s picture

17 Oct 2013 - 1:31 am | प्यारे१

मस्त.
कांदा उभा चिरुन घातला फोडणीवेळी तर आणखीच बहार!
कधीकधी ताजा हिरवा वाटाणा पण मस्त वेरिएशन देतो. दिसायलाही सु रे ख दिसते भाजी.

दिलिप भोसले's picture

2 Dec 2014 - 10:16 pm | दिलिप भोसले

हि भाजी माझी आवडी भाजी आहे. महाबळेश्वर भागात लाल मातीतील बटाटे अतिशय रुचकर लागतात. आकाराने छोटे व लालसर असतात.